जीवन
जीवन ज्यांनी पाहीले, ज्यांनी अनुभवले
त्यांनाच विचारतो एक सवाल
जीवनाला नाव द्याल का ?
जीवनाचे कोडे तुम्ही सोडवाल का ?
आयुष्याचे गणितच शिकवून जाते सर्व काही
पटरीवरचे रहाटगाडगे मोडीत काढते सारे काही
छटाकावर चालणा-या दुकानदारीतच विकले जाते सर्व काही
माजरपाट दो-यातून शिवले जाते आयुष्याचे झबले
आणि केविलवाण्या डोळ्यातून आयुष्य गळून पडते
अश्याच उजाड माळरानाला जीवन म्हणायचे का ?
जीवन जगण्यासाठी क्षणोक्षणी मरायचे का ?
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर....

No comments:
Post a Comment