Wednesday 23 November 2011

सावित्रीच्या भिंतीवर


सावित्रीच्या भिंतीवर

प्लेटोच्या साम्यवादाची कोंडी फोडून
अरस्तुने केले तिला देशासाठी  दान
मनूच्या स्मृतीने केले तिला पशुपेक्षा गुलाम
तथागत बुद्धाने दिले तिला संघातून स्थान...

तरीही मनूच्या पायावर लोळून लाचार परंपरेने तर कहरच केला
झोकून दिले चितेवर आणि केले चारित्र्यावर वार
देवदासी बनवून केले चीर हरण, वस्त्रहरण
सुंदरतेवर काळिमा फासावा म्हणून केले केशवपन
रुढीच्या चितेवर कित्त्येक कळ्या अश्याच कोमेजल्या

पुनरुत्थानाची संजीवनी घेऊन मग ती पुढे आली
जोतिबाच्या अंगाखांद्यावर खेळू लागली
सावित्रीच्या भिंतीवर कोरु लागली
दगड झालेल्या समाजावर रेघाट्या ओढू लागली
परंपरेच्या शेपटीला मुळापासून उपटू लागली
पण तिला तिचे अधिकार देतील तर ते मनुचे औलाद कसले ?

शेवटी हिंदू कोड बिलाने चक्रव्यूह तोडला
तिच्या मनामनातून...
बाबासाहेबांच्या समानतेने,
बुद्धाच्या धम्माने चेहरा दिला
कायद्याच्या पानापानातून...
---
प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर...

1 comment: