Thursday 17 November 2011

यश

यश
 
यशाला 
माझ्या पाठीमागे 
यावेच लागेल.

शरीराच्या नसा तुटेपर्यंत 
 मी घेतलेली मेहनत
यशाच्या पाठीमागे
धावणार नाही.

मला
यशाचा पाठलाग
करावा लागणार नाही.

मेहनतीच्या जोडीला केलेली 
प्रयत्नांची पराकाष्ठा 
यशाला पायाशी 
लोळवत राहील. 

माझ्या 
कर्तुत्वाच्या प्रत्येक पावलावर 
यश लोटांगण घालतांना 
दिसून येईल.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर...९२२६७३४०९१ 

1 comment: