एकत्र पेटून उठा यार हो
गर्दीत माणसांच्या, माणूसच हरवला यार हो
माणुसकीचा दिवा आता, तुम्हीच पेटवा यार हो
स्पर्धेच्या बाजारात, विद्वत्ता पेटली यार हो
टेबलाखालच्या द्रव्याने, माणूसच विझला यार हो
कुठे कुणाची विद्वत्ता, इथे जातच मोजली यार हो
जातीचा निकषच, तुमच्या सरणावर बसला यार हो
खाजगी च्या नावाखाली, तुमचा हिसकला वाटा यार हो
अरे ! मुर्दाडाच्या संगतीने, तुमचा केला घात यार हो
वेळ आहे आजही, भविष्य बनवायची यार हो
स्वार्थ, सत्ता, पैसा टाकून, एकत्र पेटून उठा यार हो
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर...९२२६७३४०९१
No comments:
Post a Comment