Thursday 24 November 2011

मानव म्हणून

मानव  म्हणून
आयुष्याचा  कोळसा  करून  जगणा-यांनी  जगावे खुशाल,
मी  तसा  जगणार  नाही.
जीवनाची राख  उधळावी  त्यांनी  त्यांच्या  मातेफिरू  जगण्यावर,
मी  तसा  फिरणार  नाही.
जगण्यासाठी  माती  खाणा-यांनी  जगावे  कोल्ह्या  कुत्र्या  सारखे,
मी  तसा  करणार  नाही.
शतका-नु-शतके जे  मानव  म्हणून  जगलेच  नाही,
ते  मानव  बनल्याशिवाय  मी  स्वस्थ  बसणार  नाही.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर......

No comments:

Post a Comment