Wednesday, 30 November 2011
Tuesday, 29 November 2011
आंबेडकरी चळवळीतील स्त्रियां
आंबेडकरी चळवळीतील स्त्रियां
कुठलाही समाज स्त्री शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. प्लेटो म्हणतो त्याप्रमाणे "राज्याच्या विकासात ५० % वाटा स्त्रियांचा असला पाहिजे. तरच राज्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो." प्लेटो चे हे तत्वज्ञानही बुद्धाच्या संघातून घेतले गेलेले आहे. कुठलीही चळवळ ही स्त्री सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. परंतु वैदिकांच्या संस्कृतीने आणि नंतर निपजलेल्या मनूच्या वर्णाने स्त्रीला तिच्या मुख्य अधिकारापासून वंचित केले होते. १९ व्या शतकाच्या सुरवातीला आलेल्या पुनरुत्थानाच्या चळवळीने स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचा भरकस प्रयत्न केला. सावित्रीच्या रूपाने स्त्री अधिकार प्राप्त करून देण्यासाठी एक मूर्तिकारच उपलब्ध झाला. नंतरच्या काळात बाबासाहेबांच्या रूपाने स्त्रीला स्वतंत्र भारताच्या कायद्याने समानतेचे स्थान दिले. माजी आमदार दमयंती देशभ्रतार, चंद्रिका रामटेके, द्रोपदिबाई दोंदे, जाईबाई नागदिवे, शांता सरोदे, गंगुबाई महान, शांताबाई दाणी, गीताबाई गायकवाड, सीताबाई गायकवाड, भिक्षुणी लक्ष्मीबाई नाईक, काशीताई मांडवधरे, लक्ष्मीबाई वानखेडे, सुलोचनाताई डोंगरे, सुगंधा शेंडे तर अलीकडच्या काळातील रूपाताई बोधी, सुलेखा कुंभारे इ. आंबेडकरी चळवळीत अश्या अनेक स्त्रियांचे योगदान आजपर्यंतच्या आंदोलनात राहिले आहे. परंतु त्या स्त्रिया असल्याने मुख्य प्रवाहात येऊ शकल्या नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की, चळवळीतील पुरुष कार्यकर्त्यांनी त्यांची दखल घेतली नाही. इतकेच नाही तर चळवळी व आंदोलनाच्या अभ्यासकांनी आणि लेखकांनी या स्त्रियांकडे दुर्लक्ष केले. या सर्व घडामोडीत त्या चळवळीतील कार्यकर्त्या स्त्रियांचे नाव इतिहासाच्या पटलावर कोरले गेले नसले तरी त्यांचे योगदान मात्र आजही कायम आहे. आणि येणा-या भविष्यात अश्या स्त्रियांच्या योगदानाची योग्य ती दाखल घेतली जाईल असा ठाम विश्वास आहे.

"गतीचक्र"
प्रा. तुळशीराम झनके, मुंबई यांचा "गतीचक्र" हा काव्यसंग्रह प्रज्ञादीप प्रकाशन, नागपूर कडून लवकरच प्रकाशित होत आहे. येत्या ६ डिसेंबर ला चैत्यभूमी ला हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. प्रा. झनके यांच्या "गतीचक्राला" पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! तुमची प्रत आजच सुरक्षित करा !

जीवन
जीवन
जीवन ज्यांनी पाहीले, ज्यांनी अनुभवले
त्यांनाच विचारतो एक सवाल
जीवनाला नाव द्याल का ?
जीवनाचे कोडे तुम्ही सोडवाल का ?
आयुष्याचे गणितच शिकवून जाते सर्व काही
पटरीवरचे रहाटगाडगे मोडीत काढते सारे काही
छटाकावर चालणा-या दुकानदारीतच विकले जाते सर्व काही
माजरपाट दो-यातून शिवले जाते आयुष्याचे झबले
आणि केविलवाण्या डोळ्यातून आयुष्य गळून पडते
अश्याच उजाड माळरानाला जीवन म्हणायचे का ?
जीवन जगण्यासाठी क्षणोक्षणी मरायचे का ?
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर....

Friday, 25 November 2011
भारत का संविधान
आज २६ नवम्बर...भारतीय संविधान दिन...हर भारतीय नागरिकोंको भारतीय होने का गर्व प्रदान करने वाला एक ऐसा लम्हा...इस भारतीय संविधान दिन की अवसर पर आप सभी देशवासियोंको प्रा. संदीप नंदेश्वर जी की और से ढेर सारी शुभकामनाए और बधाई ! "जय रिपब्लिक भारत"
भारत का संविधान
बदनाम था मै, आज दुनिया में नाम हुआ
गुलाम था मै, आज स्वतंत्रता का गुणगान हुआ
पराया था मै, आज दुनिया ने अपना लिया
कानून था मै, आज संविधान महान हुआ
मै संविधान हूँ इस देश का
आइना हूँ दुनिया की मानवता का
कानून बन कर जीता हूँ हर एक के रग रग में
चलाना सिख लो वरना सामना कर संकटों का
हे मेरे देशवासियों वक्त के पहले ये जान लो
मै समता का चिराग हूँ बुद्ध की इस धरती पर
बाबासाहब की कलम का जीताजागता नमूना हूँ
मै हजारो पीढ़ीयोंके रास्तो का राहगीर बन सकता हूँ
कोशिश मत करना मुझे तोड़ने मरोड़ने की
चिराग हूँ आप सब की रोशन जिंदगी का
२ साल ११ महीने १८ दिन जिस महामानव ने मुझे संजोया है
बाबासाहब है नाम जिसका, शिल्पकार है वो मेरा
उसी की मेहनत का नतीजा हूँ मै
भारत का संविधान हूँ मै.....
भारत का संविधान हूँ मै.....
----प्रा. संदीप नंदेश्वर, नागपुर...८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

थप्पड़
थप्पड़
थप्पड़ की गूंज चारो और सुनाई गई,
अब लगता है हर ससुराल में आग लग गई,
मायके वाले भी कुछ कम नहीं थे,
शरद की राह में वसंत की सारी जिंदगी गुजर गई...
अब तो पुरे बाराती भर भर के आयेंगे,
बैंड बाजा भी साथ लायेंगे...
ढोल पे एक के बजाये बार बार बजायेंगे...
क्योंकी उंगलियों के निशान से सारी कायनात लाल हो गई...
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपुर.

Thursday, 24 November 2011
मानव म्हणून
मानव म्हणून
आयुष्याचा कोळसा करून जगणा-यांनी जगावे खुशाल,
मी तसा जगणार नाही.
जीवनाची राख उधळावी त्यांनी त्यांच्या मातेफिरू जगण्यावर,
मी तसा फिरणार नाही.
जगण्यासाठी माती खाणा-यांनी जगावे कोल्ह्या कुत्र्या सारखे,
मी तसा करणार नाही.
शतका-नु-शतके जे मानव म्हणून जगलेच नाही,
ते मानव बनल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर......
Wednesday, 23 November 2011
सावित्रीच्या भिंतीवर
सावित्रीच्या भिंतीवर
प्लेटोच्या साम्यवादाची कोंडी फोडून
अरस्तुने केले तिला देशासाठी दान
मनूच्या स्मृतीने केले तिला पशुपेक्षा गुलाम
तथागत बुद्धाने दिले तिला संघातून स्थान...
प्लेटोच्या साम्यवादाची कोंडी फोडून
अरस्तुने केले तिला देशासाठी दान
मनूच्या स्मृतीने केले तिला पशुपेक्षा गुलाम
तथागत बुद्धाने दिले तिला संघातून स्थान...
तरीही मनूच्या पायावर लोळून लाचार परंपरेने तर कहरच केला
झोकून दिले चितेवर आणि केले चारित्र्यावर वार
देवदासी बनवून केले चीर हरण, वस्त्रहरण
सुंदरतेवर काळिमा फासावा म्हणून केले केशवपन
रुढीच्या चितेवर कित्त्येक कळ्या अश्याच कोमेजल्या
पुनरुत्थानाची संजीवनी घेऊन मग ती पुढे आली
जोतिबाच्या अंगाखांद्यावर खेळू लागली
सावित्रीच्या भिंतीवर अ ब क ड कोरु लागली
दगड झालेल्या समाजावर रेघाट्या ओढू लागली
परंपरेच्या शेपटीला मुळापासून उपटू लागली
पण तिला तिचे अधिकार देतील तर ते मनुचे औलाद कसले ?
शेवटी हिंदू कोड बिलाने चक्रव्यूह तोडला
तिच्या मनामनातून...
बाबासाहेबांच्या समानतेने,
बुद्धाच्या धम्माने चेहरा दिला
कायद्याच्या पानापानातून...
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर...
Tuesday, 22 November 2011
सत्तेचा लाडू
सत्तेचा लाडू
सत्तेची धार जेव्हा बोथट झाली
खुर्चीची भूक अधिकच वाढली
व्याकूळतेच्या लाचार सत्ताधा-याने
सत्ता विभाजनाचे भोजन दिधले
इथे नाही तर तिथे
पण कुठेतरी सत्तेचा लाडू पत्रावळीत पडेल
याच आशेत सत्तेच्या लाडूसाठी झुंबड उठली
यातच भिका-याचे गणित चुकले
एकसंघ देशाच्या फाटक्या सीमारेषेत
पूर्ण नाही तर तुकड्यासाठी
आवाजी मताने पंगत उठवली
इथूनच पुढे विधानसभा बरखास्त झाली.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.....
सत्तेची धार जेव्हा बोथट झाली
खुर्चीची भूक अधिकच वाढली
व्याकूळतेच्या लाचार सत्ताधा-याने
सत्ता विभाजनाचे भोजन दिधले
इथे नाही तर तिथे
पण कुठेतरी सत्तेचा लाडू पत्रावळीत पडेल
याच आशेत सत्तेच्या लाडूसाठी झुंबड उठली
यातच भिका-याचे गणित चुकले
एकसंघ देशाच्या फाटक्या सीमारेषेत
पूर्ण नाही तर तुकड्यासाठी
आवाजी मताने पंगत उठवली
इथूनच पुढे विधानसभा बरखास्त झाली.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.....
लाचारी
लाचारी
लाचारीचा बुरखा पांघरून
देशातले मोती विदेशी झाले
बुद्धीला गहाण ठेऊन
कशा कशाचे ठेकेदार बनले
निर्बुद्ध साफळ्याला कोट टांगवितांना
शरीराच्या गेंडाधारी चमडीला
बटनाचे नोकदार टोक रुतले
त्यातून वाहणा-या रक्ताचा
परतावा म्हणून
सगळेच पुरस्कार मस्तकावर फोडले.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर....
लाचारीचा बुरखा पांघरून
देशातले मोती विदेशी झाले
बुद्धीला गहाण ठेऊन
कशा कशाचे ठेकेदार बनले
निर्बुद्ध साफळ्याला कोट टांगवितांना
शरीराच्या गेंडाधारी चमडीला
बटनाचे नोकदार टोक रुतले
त्यातून वाहणा-या रक्ताचा
परतावा म्हणून
सगळेच पुरस्कार मस्तकावर फोडले.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर....
Subscribe to:
Posts (Atom)