Wednesday, 28 December 2016

धम्मदिक्षेचे Event धम्माला व चळवळीलाही धाेकादायक

🙋🏻‍♂ *धम्मदिक्षेचे Event धम्माला व चळवळीलाही धाेकादायक*

🙄 *धम्मदिक्षेच्या Event रूपी राजकारणाने आंबेडकरी चळवळीला धोका संभवू शकतो.*

🙄 *धम्मदिक्षेचे Event साजरे करणे म्हणजे भविष्यात धार्मिक उन्मादाला व धार्मिक द्वेषाला जन्म देणे होय.*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

🙋🏻‍♂ भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना धार्मिक अधिकार बहाल केलेले आहेत. त्यामुळे धर्मपरिवर्तन किंवा धर्म स्विकार हा प्रत्येकाचा व्यक्तीगत मुलभूत अधिकार आहे. त्याचा वापर त्याने स्वच्छेने करावा. परंतु *जेव्हा २००-३०० कुटूंबाच्या धर्मपरिवर्तनाचे Event साजरे केेले जातात व त्या Event च्या यशस्वितेसाठी विजयीमुद्रेत जेव्हा मोठ्या संख्येने समाज उपस्थित होतो, तेव्हा दोन धर्मात तेढ उत्पन्न व्हायला चालना मिळते.*

🙋🏻‍♂ धर्मपरिवर्तनाचा Event साजरा झाला म्हणजे एखादा धर्म मोठा झाला किंवा श्रेष्ठ झाला असे होत नाही. धर्माची तत्वे माणसांना आकर्षित करीत असतात. व *जेव्हा धार्मिक तत्वांचा स्विकार व्यक्ती करतो तेव्हा त्याला त्याच्या धर्मपरिवर्तनाचे Event साजरे करण्याची गरजच पडत नाही. तो Event साजरे न करताही धार्मिक तत्वाचा अंगिकार करून स्वतःच त्या धर्माच्या प्रचार प्रसाराचे काम करायला लागतो. त्याची वर्तणुक हीच त्याच्या धर्मपरिवर्तनाचे प्रतिक बनायला पाहीजे.*

🙋🏻‍♂ काल दि. २५/१२/२०१६ ला नागपूरच्या दिक्षाभूमिवरून काही २००-३०० ओबिसी कुटूंबांनी (म्हणजेच हिंदूंनी) धर्मपरिवर्तन करून बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. या धर्मपरिवर्तनाचा Event केला गेला. (कदाचित राजकारणही केले गेले असे म्हणता येईल.) *४००-५०० लोकांच्या धर्मपरिवर्तन सोहळ्याला हजारो बौद्ध व आंबेडकरी लोक उपस्थित होते हे त्या Event चे फलितच म्हणावे लागेल.*

४००-५०० लोकांच्या धर्मपरिवर्तनाला हजारो आंबेडकरी - बौद्ध लोक या Event ला का उपस्थित होते ? तर याचे कारण एकच की ते ओबिसी होते.(हिंदू होते) कारण Event ची हेडलाईनही तशीच होती. 🙋🏻‍♂ *हा Event साजरा करणाऱ्यांना एकतर चळवळीचे, धम्माचे गांभिर्य नाही. किंवा निव्वळ राजकारणाला बळी पडून हा उत्सव साजरा केला गेला. यात धर्मपरिवर्तन कमी आणि राजकारण अधिक होते असेच खेदाने म्हणावे लागेल.*

🙋🏻‍♂ आजपर्यंत अनेक लोकांनी धर्मपरिवर्तन केले. विविध धर्माच्या व विविध जातीच्या लोकांनी धर्मपरिवर्तन केले. *(धर्मपरिवर्तनानंतर त्यांची बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार किती केला किंवा बौद्ध तत्वे वर्तणुकीत उरविले की नाही यावर न बोललेलेच बरे)* परंतु असे Event साजरे करून धर्मपरिवर्तनाचे सोहळे साजरे व्हायला लागले तर येणाऱ्या काळात धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका संभवतो.

👉🏻 *Event रूपी धर्मपरिवर्तन सोहळ्याने काय साध्य केले ?*
१) ४००-५०० लोक हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात आले. (बुद्धीस्ट झाले असे म्हणता येणार नाही.)
२) या ४००-५०० लोकांना धर्मपरिवर्तन करण्याचे नेतृत्व करणाऱ्या माणसांची सामाजिक-राजकीय उंची वाढली एवढेच.
३) ओबिसी लोक धर्मपरिवर्तन करताहेत हे पाहून त्या सोहळ्याला हजारो बौद्ध - आंबेडकरी बांधव उपस्थित होऊन एक मोठा Event साजरा झाला एवढेच.

👉🏻 *पण या Event रूपी सोहळ्याचे दूरगामी परिणाम काय होतील ?*
१) ४००-५०० किंवा १०००-१५०० ओबिसी लोकांनी धर्मपरिवर्तन केले म्हणून तुम्ही केलेली गर्दी, त्यातून साजरा केला जाणारा उन्माद व त्या सोहळ्याचा प्रचार प्रसार लाखो ओबिसी बांधवांच्या (हिंदूंच्या) भावनांना दुखावणारा झाला तर त्याचे भविष्यावर दुष्परिणाम होतील.
२) कालच्या किंवा उद्याच्या धर्मपरिवर्तन सोहळ्याने आंबेडकरी राजकारण वा आंबेडकरी मतदान वाढेल का ? तर कदापी नाही.
३) तुमच्या या धर्मपरिवर्तन सोहळ्याच्या उन्मादाचा प्रतिपरिणाम इतर लोकांच्या मनात तुमच्याविषयी द्वेष पसरविण्यासाठी प्रस्थापितांकडून केला गेला तर व्यापक आंबेडकरी चळवळीला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.
४) या धर्मपरिवर्तन Event चे नेतृत्व करणाऱ्यांना उद्या चळवळीच्या खरेदी विक्रीचे नेतृत्व दिले जाण्याची दाट शक्यता आहे. ज्याचे परिणाम चळवळीवर होऊ शकतात.

🙋🏻‍♂ *माझा विरोध धर्मपरिवर्तनाला नसून माझा विरोध धर्मपरिवर्तनाचे Even साजरे करण्याला आहे.*

🙏🏻🙋🏻‍♂ *माझा विरोध कशाला ?*
१) माझा विरोध धर्मपरिवर्तनाच्या कार्यक्रमाला Event बनविण्याला आहे.
२) माझा विरोध धर्मपरिवर्तन Event चे नेतृत्व करणाऱ्यांच्या भूमिकेला आहे.
३) माझा विरोध व्यक्तीगत मान्यतेच्या सार्वत्रिक दिखाऊपणाला आहे.
४) माझा विरोध धार्मिक, सामाजिक, राजकीय व चळवळीचे गांभिर्य नसल्याला आहे.
५) माझा विरोध बौद्ध - आंबेडकरी माणसांच्या अतिउत्साहीपणाला आहे.

🙏🏻 *कुठल्याही सामाजिक कृतीचे दुरगामी परिणाम लक्षात घेणे जास्त महत्वाचे असते.*

🙋🏻‍♂💐 *धर्मपरिवर्तन करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे स्वागत ! व पुढील आयुष्यात आपण धम्मतत्वाने वाटचाल करून जीवनाला गतिमान कराल ही मंगलकामना !*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

Thursday, 24 November 2016

सर्व झोल काळा पैसा पांढरा करण्यासाठी...

✍🏻 *नोटाबंदी / Demonetisation / High Denomination Currency हा सर्व झोल काळा पैसा पांढरा करण्यासाठी...*
✍🏻 *____अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

✍🏻 कुठल्याही संवैधानिक मार्गाचा प्रचलित वापर न करता देशातील *जनतेला मुर्ख बनवून १००/५०० च्या नोटा रातोरात बंद करण्यात आल्या. अख्खी लोकशाही अंधारात ठेऊन.* कशासाठी बघा...

*रद्द करण्यात आलेल्या नोटा*
    १००० + ५०० = १५००
*सुरू करण्यात आलेल्या नोटा*
    २००० + ५०० = २५००

*काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचे गणित बघा...*

  सुरू          बंद.            फरक
२५००   -   १५००    =    १०००

✍🏻 १००० रू. अधिकचे बाजारात/अर्थव्यवस्थेत आणल्या गेले. त्यासाठीचे तारण कुठं आहे ? नविन आणि जून्या नोटांमध्ये १००० रू. अधिक का काढल्या गेले ?

✍🏻 *उत्तर :-*

*अगाऊ १००० रू. अर्थव्यवस्थेत आणून बिजेपी, आरएसएस, अदानी, अंबानी यांचा काळा पैसा पांढरा करण्यात आला.*

✍🏻 तुम्ही मात्र नमो नमो करीत काळा पैसा, भ्रष्टाचार यावर बोंबलत बसलात व तिकडे तुम्हाला मुर्ख बनवून तुमचाच पैसा बँकेद्वारे गोळा केला गेला व सर्व काळा पैसा पांढरा केला गेला.

😜 बसा आता "सबका साथ, सबका विकास" बोंबलत हातात हात घेऊन बँकांच्या रांगेत...

🙄 *"उघडा डोळे, बघा निट."* 😳
✍🏻 *____अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

Thursday, 10 November 2016

*ये देश बदल रहा है ! बेवकुफ बन रहा है !*

🚩 *भाजपाईयों (संघीयों) या देशात अनेक गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत, देशहितासाठी, देशविकासासाठी त्या केव्हा बदलणार ?*

💰 *फक्त ५००, १००० च्या नोटा बदलल्याने भ्रष्टाचार, ब्ल्यॉकमनी थांबेल का ?*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

🗣 या देशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कालबाह्यच झाल्या नसून समाजव्यवस्थेसाठी व देशहिताला धोकादायक आहेत. *चलनी नोटांंनी तर फक्त भ्रष्टाचार करून देशाची भौतिक संम्पत्ती धोक्यात आणली पण अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने देशाची भविष्याची चल-अचल, भौतिक-व्यावहारिक, शारिरिक-मानसिक संम्पत्ती संपवू पहात आहेत.* त्या कधी बदलणार आहात ?

🗣 *विदेशात असलेला काळा पैसा ५००, १००० च्या नोटा बदलल्याने परत येणार का ?*
*उत्तर :- नाही* मग स्विस बँकेतला तुमच्या पैशाचे काय करणार आहात ? त्याचा निर्णय अद्याप का घेतला गेला नाही.

*वास्तव :- देशातला सामान्यांचा हक्काचा पैसा काढून बँकात जमा करून तुमच्या स्विस बँकेतल्या ब्ल्यॉकमनी ला व्हाईट करायचे आहे हे सांगा ना मा. मोदी साहेब...*

🗣 *विदेशात जमा असलेल्या ५००, १००० रुपी ला तुम्ही कसे बदलणार हे पण देशवासियांना कळले पाहीजेच ना !* ते अद्याप देशवासियांपासून का लपविण्यात आले आहे. देशाचा नागरिक म्हणून याचे उत्तर मला पाहीजे आहे. व ते उत्तर देणे तुम्हाला बंधनकारक आहे.

*सब गोलमाल है, भाई सब गोलमाल है !*

💰 *विदेशात असलेल्या रूपयाचे गोलमाल (ब्ल्यॉक मनी) कुठे होणार आहे. कारण हा रूपया देशांतर्गत ब्ल्यॉक मनी पेक्षा कित्तेक पट जास्त आहे.*

💰 *करमुक्त (टॅक्स फ्री) असलेला देशभरातल्या मंदीरातील ब्ल्यॉकमनीला सार्वजनिक करणे देशहिताचे व देशविकासाचे मोठे साधन असतांना ते का केले जात नाही.* देशभरातल्या मंदीरातील ५००, १००० च्या नोटांचा ब्ल्यॉकमनी व्हाईट करून परत कुणाकडे सुपूर्द केला जाणार ? हे पण सांगा.

🙏🏻 *कालबाह्य झालेले (विशिष्ठ वर्गातले) पुजारी ज्यांची मंदीरातील ब्ल्यॉकमनीवर परंपरागत मालकी हक्क आहे ते सार्वजनिक करणे देशहिताचे/देशविकासाचे आहे.* तो निर्णय केव्हा होणार. *भ्रष्टाचार मुक्तीचा हा मैलाचा दगड* आपण कधी पार करणार आहात हे देशवासियांना कळू द्या.

🇮🇳 *देशहीत/देशविकास, भष्टाचार मुक्ती तुमच्यापासून सुरू व्हायला पाहीजे होती ती सामान्य नागरिकांपासून का सुरू केली गेली ?* सामान्य देशवासियांना वेठीस धरून तुम्ही *जैसे थे* कसे काय राहणार ? *मंदीर, पुजारी, दान, स्विस बँक या तुमच्या ब्ल्यॉक मनी उत्पन्न स्त्रोतांना तुम्ही कधी सोडणार/तोडणार/बदलणार ?*

🎤 *ये देश बदल रहा है ! बेवकुफ बन रहा है !* 🇮🇳

*या देशातील मंदीर, पुजारी, देव-देवता, संस्कृती, जाती, धर्म, विचार जेव्हा बदलतील तेव्हा ५००, १००० कालबाह्य ठरविण्याची वेळ येऊन नव्या ५००, २००० च्या छपाईवर सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार नाही.*

*अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून या निर्णयाचे (भ्रष्टाचार व ब्ल्यॉकमनी) १०% सकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतांना मलाही दिसून येतात. परंतु त्याच अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ९० % ची चिंता जास्त सतावतेय. हा निर्णय १०० % ब्ल्यॉकमनी निर्मुलनाचा निश्चितच नाही.*

म्हणूनच म्हणतो.....
🎤 *ये देश बदल रहा है ! बेवकुफ बन रहा है !* 🇮🇳

🙏🏻 *चलो जड से बदलाव की तरफ बढते है ! न की डालियों से जड की तरफ ! बदलाव नही होगा साहाब !*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...
*टिप :- मै किसी भी मंदीर, ईश्वर, देव, धर्म का विरोध नही करता, क्योकी दोष उनका नही दोष मानसिकता और प्रकृती/संस्कृती का है !*

Thursday, 27 October 2016

*RSS तरूण होत आहे व आंबेडकरी चळवळ म्हातारी*

😳 *RSS तरूण होत आहे व आंबेडकरी चळवळ म्हातारी* ☺

🚩 भारतात दोन विचारधारा क्रांती व प्रतिक्रांतीच्या पथदर्शक आहेत.
       👉🏻 *आंबेडकरी चळवळ क्रांतीच्या मार्गावर चालणारी* तर
       👉🏻 *RSS प्रतिक्रांतीच्या दिशेने सातत्यपूर्ण मार्गक्रमण करणारी*

🚩RSS ला इथली संविधानिक लोकशाहीची, स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाची *व्यवस्था उध्वस्त करायची आहे* व त्या दिशेने ते पाऊले टाकत आहेत.
👉🏻तर दुसरीकडे...
🇪🇺 आंबेडकरी चळवळीला स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाचे संवर्धन, पालनपोषण व संरक्षण करणारी *संविधानिक लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवायची आहे.* असे असतांनाही ही चळवळ गर्तेत अडकली आहे.

👉🏻 *एकीकडे*...
🚩RSS च्या शाखा वाढत आहेत. वाढणाऱ्या शाखांमध्ये तरूणाईचा भरणा होत आहे. *तरूणांना आकर्षित करून RSS पुढच्या प्रतिक्रांतीच्या ५०-६० वर्षाची तजविज आजच करून ठेवीत आहे.*

👉🏻 तर *दुसरीकडे...*
🇪🇺आंबेडकरी चळवळ काही मोजक्या वय संपत चाललेल्या लोकांपर्यंत मर्यादीत होत चालली आहे. *तरूणाईला आकर्षित करणारा कृतिकार्यक्रम आंबेडकरी चळवळीच्या म्होरक्यांकडे दिसून येत नाही.*

✍🏻 *कुठल्याही संघटनेचे वय वाढत असतांनाच तरूणाईच्या बळावर त्या संघटनेचे आयुष्य दुप्पटीने वाढत जात असते. पण तरूणाईपासून दूर जाणारे संघटन प्रौढावस्थेत म्हातारे होत जाते.*

✍🏻 क्रांतीला प्रतिक्रांतीसोबतचे शितयुद्ध जिंकायचे आहे. त्यासाठी *क्रांतीच्या नायक शिलेदारांची ही जबाबदारी आहे की आंबेडकरी चळवळीत उपकार म्हणून कार्य करण्यापेक्षा जबाबदारी म्हणून कार्याला लागा.*

✍🏻 प्रतिक्रांतीवर मात करायची असेल तर शिस्त व संयम पाळायला शिका. *एखादी कृती करून समाजमन जिंकले की लगेच नायक होण्याची महत्वाकांक्षा बाळगू नका.* व लगेच आंबेडकरी चळवळीचे स्वाभिमानी नेतृत्व करणाऱ्यांवर प्रश्नांकित वयल निर्माण करू नका. *तुम्ही एका जबाबदारीचे निर्वहन करून चळवळीत आपले योगदान दिले. असेच प्रत्येकाने आपआपली जबाबदारी म्हणून आंबेडकरी चळवळीत योगदान दिले तरच ही चळवळीचे आयुष्य चिरकाळ टिकेल.*

✍🏻 मोर्चे काढली, चार माणंस जमवली म्हणजे चळवळ चालत नसते. तत्कालीन मुद्यांवर लढणे म्हणजेच चळवळ नव्हे. तर *तत्कालीन मुद्यांवरील लढ्याचा भविष्यावर दूरगामी परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन संयमी लढ्याची आखणी करणे चळवळीच्या शिलेदारांचे काम आहे.*

🙏🏻👉🏻 *आंबेडकरी चळवळीतल्या व परिवर्तनवादी आंदोलनातल्या माझ्या तरूण मित्रांनो...*👉🏻

🗣 *शत्रु जेव्हा स्वतःचे शक्तीप्रदर्शन करीत असतो तेव्हा त्याच्या शक्तीप्रदर्शनाची चिकीत्सा करून तो वेळ चिंतनात घालवायचा असतो.* हे युद्धनितीचे साधे व सोपे नियम आहे.
🗣 *शत्रुंचे शक्तीप्रदर्शन व तुमचेही शक्तीप्रदर्शन दोन्ही एकसाथ, एकाचवेळी सुरू असेल तर त्याला युद्ध असेच म्हणतात.* शक्तीप्रदर्शनाची कीतीही नावे बदलली तरीही....
🗣 ज्या गोष्टींच्या संरक्षणासाठी तुम्ही तुमचे शक्तीप्रदर्शन कराल त्याच गोष्टीच्या विरोधात शत्रु जनमत तयार करीत असतो हे लक्षात घ्या. *आज ज्याच्या सन्मानार्थ तुम्ही शक्तीप्रदर्शनाला तयार आहात तेच उद्धस्त करण्यासाठी उद्याचे मोर्चे निघाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.*
🗣 *शत्रु तरूण होत आहे. तुम्हीही नवी उमेद जागवा. शस्त्राने नव्हे अस्त्राने सज्ज व्हा. शक्तीप्रदर्शनासाठी नाही तर नितीने सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी...*

🙏🏻🇪🇺 मित्रांनो, निती ओळखा, कृती ओळखा, चाल ओळखा, चिंतन करा, जबाबदारी घ्या. तुम्ही नेहमीच शक्तीप्रदर्शन करीत आला आहात. *हा काळ चिंतनाचा आहे, तो चिंतनात घालवा. व नव्या दमाने, नव्या उमेदीने, नव्या नितीने सज्ज व्हा !*
✍🏻___*अॅड.डॉ. संदीप नंदेश्वर...*

Tuesday, 25 October 2016

मोर्चा व गर्दीच्या निमित्ताने...

🙏🏻🇪🇺 *मोर्चा व गर्दीच्या निमित्ताने...*🇪🇺🙏🏻

मोर्चाच्या निमित्ताने गर्दी होत आहे व त्यामुळे समाज संघटीत होत आहे ही आशादायक व सकारात्मक म्हणून स्वागतार्ह बाब म्हणता येईल.
                 🙏🏻 *पण* 🙏🏻      
   
🙏🏻 *गर्दी संघटीतपणाच्या भावनेतून होत असेल तर योग्य अन्यथा असुरक्षित भावनेच्या भरावर गर्दीत सुरक्षितता शोधण्यासाठी माणसं सामिल होत असतील तर कसायाच्या कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या कळपाचा भाग होऊन स्वतःचा खात्मा करून घेण्यात काहीच अर्थ नाही.*

🙏🏻 *गर्दीला वैचारिक बैठक नसेल, गर्दीला पुर्णकालीन सेनापती नसेल तर गर्दी ही कळपात परावर्तित होते. व कळपात कुणीही सुरक्षित राहू शकत नाही. गर्दीला राजकीय व सामाजिक शहाणपण देता येत नसेल तर गर्दीत चेंगराचेंगरी होऊन भविष्यात या गर्दीतील सामिलांची हाणी मात्र नक्कीच आहे.*

🙏🏻 मोर्चे काढा तो तुमचा अधिकार आहे. गर्दीही करा तोही तुमचा अधिकार आहे. पण *गर्दीत सहभागी होण्याआधी किंवा गर्दी जमविण्याआधी मोर्चातील विषयावर याआधी एकतरी दिवस कधी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काम केले का हे स्वतःला विचारा. पिडीतांना, अन्यायग्रस्तांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी कधी पुढाकार घेतला आहे का ? ते तपासा. किंवा त्यावर थातूरमातूर कधीतरी अभ्यास तरी केला का ? हेही तपासा. व्यक्तीगत जबाबदारी टाळून सामुहिक जबाबदारीत सहभागी होणे पराभवाचे लक्षण आहे.*

🙏🏻 *ज्या समाजातील व्यक्ती व्यक्तीगत जबाबदारी समजून सतत ईतरांसाठी कार्यरत असतो तो समाज कधीही पराभूत होऊ शकत नाही. सामुहीक जबाबदारीचे निर्वाहण व्यक्तिगत जबाबदारीच्या निर्वाहणातूनच पुर्ण करता येते.*

👉🏻🚩 *इतरांच्या कळपांना पाहून* 🇪🇺 *तुम्हीही कळप बनवायला लागले* तर घात होण्याची संभावना शतप्रतिशत आहे. कारण 🚩 *त्यांचा कळप* राजकीय व सामाजिक शहाणपणाने ओतप्रोत आहे. तर 🇪🇺 *तुमचा कळप* राजकीय व सामाजिक शहाणपणापासून कोसो दूर आहे.

        🙏🏻 *राजकीय व सामाजिक शहाणपणा गर्दीतील माणसांना देता येतो का ते बघा*

           🙏🏻 *विचार करा !* 🙏🏻
✍🏻___*अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

Monday, 17 October 2016

मोर्चे काढायचे असतील तर नक्की काढा !

🌹 *बंधूंनो* 🌹
🗣🏃🏃🏃 *मोर्चे काढायचे असतील तर नक्की काढा !* 🏃🏃🏃
                  🙏🏻 *पण* 🙏🏻
*या प्रश्नांची उत्तरे देता येईल का ते बघा !*
*___अॅड.डॉ. संदीप नंदेश्वर*

🇪🇺 *तुमच्या मोर्चा काढल्याने गावातला माणुस सुरक्षित होत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुमचा मोर्चा काढल्याने गावातील जातीय भेदभाव, जातीय तणाव, व जातीच्या आधारे होणारा अन्याय अत्याचार थांबत असेल  व जातीभेद वाढणार नसेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुमचा मोर्चा काढल्याने जातीअंत होणार असेल व जात संपणार असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुमचा मोर्चा काढल्याने व त्यात वाढलेल्या गर्दीने माणुस व समाज, देश, सरकार, सत्ता, सत्ताधारी बदलत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही मोर्चा काढल्याने सरकार तुमच्या हिताचे तात्पुरते निर्णय न घेता कायमस्वरूपी निर्णय घेऊन तुम्हाला न्याय देणार असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही मोर्चा काढल्याने गावातला तणाव मावळत असेल व अन्यायग्रस्ताला न्याय मिळत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही मोर्चा काढल्याने माणसांच्या भौतिक व व्यावहारीक आयुष्यात बदल होत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही काढत असलेल्या मोर्चाने गावातला सामान्या माणुस सुरक्षित होत असेल किंवा मोर्चानंतर त्याला सुरक्षितता देण्यास तुम्ही सक्षम असाल तर मोर्चा नक्की काढा !*

🇪🇺 *तुम्ही मोर्चा काढल्याने सामाजिक विषमता नष्ट होत असेल तर मोर्चा नक्की काढा !*

---पण *तुमच्या मोर्चाने यातले काहीच होत नसेल किंवा होतांना दिसून येत नसेल तर मोर्चा कशासाठी ?*

👉🏻 *जातीय तणाव वाढविण्यासाठी...*
👉🏻 *जातीची ताकत व संख्या दाखविण्यासाठी...*
👉🏻 *जातीय भावना व प्रेरणा घट्ट करण्यासाठी...*
👉🏻 *कुणाचे तरी राजकारण फोफावण्यासाठी...*
👉🏻 *कुणीतरी आखलेल्या षडयंत्राला पुर्णत्वास नेण्यासाठी...*
👉🏻 *गावातल्या सामान्य माणसाला असुरक्षित करण्यासाठी...*
👉🏻 *मोर्चाची भावनिक गर्दी दाखवून पुढचे व्यैयक्तिक राजकीय लाभ घेण्यासाठी...*

🙏🏻 *बघा बंधूंनो यातले तुम्हाला काही उत्तर देता येईल का ?*

🇪🇺🙏🏻👉🏻 *काही कृतींचे परिणाम लगेच दिसून येत नाही पण दूरगामी परिणाम करून जातात. जाती, असुरक्षितता, अन्याय, अत्याचार, भेदभाव मजबूत व घट्ट करून जातात.*

   🙏🏻 *बघा एकदा विचार करून !* 🙏🏻
___*अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...*

Friday, 14 October 2016

*कुठल्याही प्रतिमोर्चाला भारिप बहूजन महासंघाचा पाठींबा नाही.*

*कुठल्याही प्रतिमोर्चाला भारिप बहूजन महासंघाचा पाठींबा नाही.*
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

*मा. बाळासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आव्हानानुसार कुठल्याही प्रतिमोर्चाला भारिप बहूजन महासंघाचा किंवा कुठल्याही जबाबदार कार्यकर्त्यांचा पाठींबा नाही.*

महाराष्ट्रात काही ठिकाणी अॅट्रोसिटी समर्थनाच्या नावाखाली प्रतिमोर्चे काढले जात आहेत. *हे मुकमोर्चे किंवा प्रतिमोर्चे दोन समाजात सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणिवपुर्वक काढले जात आहेत असा आमचा आरोप आहे.*

*दि. १६/१०/२०१६ ला निघणाऱ्या नांदेड येथील प्रतिमोर्चाला भारिपचा विरोध आहे.* स्वतःला भारिपचे कार्यकर्ते म्हणविणारे काही कार्यकर्ते या मोर्चात किंवा आयोजनात सहभागी होत असतील तर त्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही असे आम्ही जाहीर करीत आहोत.

महाराष्ट्रात जे काही अट्रोसिटी समर्थनाच्या नावाखाली प्रतिमोर्चे निघत आहेत किंवा आयोजित आहेत ते *सर्व प्रतिमोर्चे भाजप च्या अनुसूचित जाती जमाती सेल व राम'दास आठ'वले यांच्या कार्यकर्त्यांकडून आयोजित व प्रायोजित आहेत अशा प्रकारची ठोस माहीती आमच्यापर्यंत आलेली आहे. या मोर्चांना आर्थिक पाठबळही उपरोक्त पक्ष संघटनांकडून पुरविला जात आहे असा आमचा आरोप आहे.*

*दोन समाजात तेढ निर्माण करून अराजकता पसरविण्याचे कारस्थान आरएसएस ने रचलेले आहे.* व त्याला वास्तवात उतरविण्यासाठी *दलित समाजातील आपल्यातीलच पण त्यांच्या गळाला लागलेले भाजप अनुसूचित जाती-जमाती सेल व राम'दास आठ'वले यांचे कार्यकर्ते हाताशी घेऊन आरएसएस हे काम करीत आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.*

तरी *भारिप बहूजन महासंघाच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे की, समाजाने प्रस्थावित/आयोजित प्रतिमोर्चाला बळी पडू नये व त्यात सामिल होऊ नये. समाजाने शांतता पाळावी व आपली क्रयशक्तीचा व्यय करू नये.* असे आव्हाहन करण्यात येत आहे.

*तरी कृपया आयोजित/नियोजित/प्रस्तावित प्रतिमोर्चे थांबवावे.*

सरकार विरोधात मोर्चे काढायचेच असतील तर...
*१) अनुसूचित जाती-जमातींना तसेच ओबिसी वर्गाला दिलेल्या आरक्षणाचा बॅकलॉग (अनुशेष) त्वरीत भरून काढण्यात यावा यासाठी...*
*२) शेतकरी आत्महत्यांना रोखण्यासाठी सरकारने शेतकरी विमा व एप्रिल महिण्यात (हंगाम सुरू होण्याआधी) शेती कसण्यासाठी ६०% सबसिडी लोन सर्व अल्पभूदारक शेतकऱ्यांना द्यावे व त्यासाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करावी यासाठी...*
*३) दलित व अल्पसंख्यक संरक्षण आयोगाची त्वरीत स्थापना करून या आयोगावर फक्त त्याच प्रवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घ्यावे यासाठी...*
*४) व इतर अन्य महत्वपुर्ण विषय...*
इ. अशा महत्वपुर्ण विषयावर मोर्चे काढावेत. पण *अॅट्रोसिटी समर्थन मोर्चाच्या नावाखाली आरएसएस च्या षडयंत्राला बळी पडू नका.*

*शांतता पाळा व शांतता राखा. अराजकता माजवू पाहणाऱ्या शक्तींना प्रतिउत्तर न देता शांतता हीच एक मोठी चपराक ठरेल.*

               🌹 *आपला* 🌹
       *___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर*
           *भारिप बहूजन महासंघ*

Tuesday, 27 September 2016

महाराष्ट्रात निघत असलेले "मराठा मुक मोर्चे" उद्याच्या महाराष्ट्रातील सत्तेसाठी.

🚩 *महाराष्ट्रात निघत असलेले "मराठा मुक मोर्चे" उद्याच्या महाराष्ट्रातील सत्तेसाठी.*
__अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर

🚩 *भाजप (BJP) + राष्ट्रवादी = पुढील महाराष्ट्राची सत्ता.* 🚩

🚩 *शरद पवारांची राष्ट्रवादी व मोहन भागवतांची भाजपा यांच्या संगनमतातून व प्रायोजकत्वातून* हल्ली महाराष्ट्रात मराठा समाजाचे मुक मोर्चे निघत आहेत. *कोपर्डी बलात्कार प्रकरण किंवा अट्रोसिटी किंवा आरक्षण* या विषयाच्या पाठीमागे जे काही चालले ते संपुर्ण राजकारण आहे.  व या राजकीय षडयंत्राला सामान्य मराठा समाज बांधव बळी पडत आहे.

येणाऱ्या नजीकच्या काळात *महाष्ट्रातील सवतींची (भाजप+शिवसेना) सरकार कोसळणार आहे.* सत्तेवर आल्यापासून या दोन्ही पक्षात *सवतीमत्सर* सुरू झालेला आहे. *"तुझं माझं जमेना, पण तुझ्या वाचून करमेना."* या म्हणीप्रमाणे सध्या महाराष्ट्रात भाजप-सेनेची सत्ता सुरू आहे. *या सत्तेचा अंत जवळ आहे. व पुढील सत्तेची गणितं मांडण्यासाठी मराठा मूक मोर्चे निघत आहेत.*

🚩--- *या सवतींमध्ये (भाजप+सेना) भांडण लावणारा मराठ्यांचा महा-पुरूष शरद पवार आहे. परत सत्तेत येण्यासाठी ही सर्व उठाठेव मराठ्यांच्या नकळत सुरू आहे.* 🚩

🚩 महाराष्ट्रात सातत्याने मागच्या ५० वर्षात सत्तेवर असलेला मराठा समाज आज सत्तेपासून बाहेर जाताच समाजाच्या मागासलेपणाची आठवण होऊन रस्त्यावर उतरतो, व इतक्या मोठ्या प्रमाणात उतरतो; हे समिकरण आकलनापलिकडचे आहे. पण सत्तेपासून दूर राहू न शकलेला मराठा पुढारी या मोर्चाच्या पाठीमागून पुढील काळात सत्तेवर येण्यासाठीची तयारी करतोय. *मराठा सत्तेवर असतांना मागील ५० वर्षात मराठा समाजाच्या मागासलेपणाची जाणिव एकदाही का झाली नाही ?* हा साधा प्रश्न मराठ्यांनी त्यांच्या सत्ताधारी पुढाऱ्यांना विचारावा. सर्व पितळ उघडे पडेल. हे नक्की.

🚩 *भाजप+राष्ट्रवादी यांची पुढील काळाची हातमिळवणी झालेली आहे.* याची कुणकुण शिवसेनेला लागताच मुखपत्र सामनातून जी कॉर्टूनद्वारे उपरोधीक टिका मराठ्यांच्या मूक मोर्चावर करण्यात आली. त्यातून सर्व काही स्पष्ट होते. तर दुसरीकडे शरद पवार ही सर्व खेळी घडवून आणतोय. हे सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास असणाऱ्यांना कळून येईल.  *मराठा मूक मोर्चे सरकार विरोधी नाहीत."* हे सांगून याचा प्रत्यक्ष परिचय महाराष्ट्रातील भाजपच्या मंत्र्यांनी आधीच दिलेले आहे.

🚩 *मराठा समाजाच्या मागासलेपणावर निघणारे मोर्चे सरकार विरोधी नाहीत तर मग मागणी कशासाठी व मोर्चे कशासाठी ? मराठा समाजाची मागणी कुणाकडे ?*

🚩 *लोकशाहीत समाज रस्त्यावर येतो तो सरकारच्या विरोधात जाऊन सरकारकडून मागणी पुर्ण करण्यासाठीच. पण हल्ली निघणारे मराठा मूक मोर्चे सरकारच्या विरोधातील नाहीत तर मग सरकार प्रायोजित मराठ्यांचे हे लाखोंची गर्दी दाखविणारे मोर्चे कुणाच्या विरोधात व कुणाकडून मागणी पुर्ण करून घेण्यासाठी निघत आहेत ? याचा खुलासा कोण करेल. ?*

____ मराठा मूक मोर्चाच्या पाठीमागून एका दगडात अनेक पक्षी मारण्याच्या बेतात असलेली भाजप + राष्ट्रवादी यांच्या छूप्या पण तेवढ्याच स्पष्ट युतीतून आम्हाला तो खुलासा झालेला आहे.

१) *भाजप-सेनेत भांडण लावून राष्ट्रवादीने सेेनेला एकटे पाडले. त्यातून सेनेची त्रेधातिरपट उडाली. व युती तुटण्याच्या मार्गावर येऊन ठेपली.*

२) *सेनेसोबत युती तोडून भाजप ची राष्ट्रवादी सोबत येणाऱ्या काळात युती होईल. व येणाऱ्या लवकरच्याच काळात महाराष्ट्रात भाजप + राष्ट्रवादीचे सरकार स्थापनेचे गणीतं मांडले जातील. व या भाजप + राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनाला आजचे मराठ्यांचे मूकमोर्चे फायदेशिर ठरतील.* यातून...
         🚩 *शिवसेनेचा मराठा मतदार हिसकावला जाईल. व शिवसेनेचा "जय शिवराय" "जय रामजीकी" करेल.*
         🚩 *शिवसेना कैचीत सापडून उरले सुरले मराठ्यांचे पालकत्व गमावून बसेल.*

३) *बलात्कार, खोटे गून्हे, अॅट्रोसिटी, आरक्षण या सारख्या मुद्यांवर लक्ष विचलीत करून मागासवर्गियांमध्ये (ओबिसी + एस सी + एस टी) दुफळी माजवून अंतर्गत यादवी निर्माण करायची आहे.*

४) *जातीय भावना दृढ करून आरएसएस ने आखलेल्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला पुर्णत्वास नेण्यासाठी आरएसएस च्या स्वयंसेवकांकडून हे मराठा मोर्चे संचालित केले जात आहेत. व त्याला मराठा समाजातील राजकीय पुढाऱ्यांनी हातमिळवणी केली आहे.*

५) *मराठा समाजाच्या मागासवर्गिय मागासलेल्या घटकांच्या उत्थानासाठी हे आंदोलन नसून मराठा समाजाच्या भावनिक प्रश्नांचा व त्यामागच्या भूमिकेचा सौदा करून सत्तेवर पून्हा विराजमान होण्यासाठी हा सर्व खटाटोप चाललेला आहे. सत्तेसाठी समाज रस्त्यावर उतरविला जात आहे.*

🚩🇪🇺 *बांधवानो...*

🚩 *मराठा बांधवांनो तुमच्या राजकीय पुढाऱ्यांच्या छुप्या अजेंड्याला लवकर ओळखून वेळीच सावध व्हा ! व आरएसएस च्या दावणीला समाजाला बांधण्याच्या पुढाऱ्यांच्या डावाला हाणून पाडा.*

🇪🇺 *दलित मागासवर्गिय बांधवांनो अॅट्रोसिटी, आरक्षण यासारखे मराठा मोर्चाचे विषय घेऊन तुम्हाला भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत प्रतिमोर्चे न काढता शांत रहा. तुमचे संरक्षण व अधिकार कुणीच काढून घेऊ शकत नाही.*
🇪🇺 *शांत राहून सामाजिक सलोखा तुम्ही टिकवून ठेऊ शकता हे मराठा बांधवांना दाखवून द्या.*
🇪🇺🚩 *मराठा व दलित या दोन मागासवर्गिय घटकांना वेगळे पाडण्याचा आरएसएस व सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांचा डाव हाणून पाडा. आम्ही एकसंघ आहोत हा संदेश द्या.*

🚩🚩 *मराठा मूक मोर्चाच्या मागून भाजप + राष्ट्रवादीची चाललेली सत्तेची व राजकारणाची खेळी डावासहीत हाणून पाडूयात !* त्यासाठी मराठा व दलित समाजाने आपसात सामंजस्य टिकवून ठेवावे ही विनंती.
____अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...
🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩
*हा संदेश प्रत्येक मराठा व दलित मागासवर्गिय बांधवांपर्यंत पोहचवा.*
🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺🚩🇪🇺

Saturday, 27 August 2016

भारत के दलितों की एकता का परिचय कब होगा ?

✍🏻 *भारत के दलितों की एकता का परिचय कब होगा ?*✍🏻

✍🏻*मद्रास, दादरी, हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, ऊणा हुआ ! रोहीत मारा गया, अखलाख मारा गया, कनैय्या जेल गया, आंबेडकर भवन उध्वस्त हूआ और ऊणा मे गोमाता भक्तों ने दलितों का खून बहाया !* आंदोलन हूआ, सडके जाम हूई, आक्रोश किया गया, चिखा गया, चिल्लाया गया, मुंबई और ऊणा की सडको पे जनसैलाब उतरा ! कभी दलितों के आक्रोश की बातें हूई, तो कभी दलितों के अत्याचारो पे बहस हुई ! *मा. प्रकाश आंबेडकर सामने आए ! आवाज उठाई तो आगाज हूआ ! कनैय्या और जिग्नेश मेवानी हिरो बने !* उम्मीद की लकीरे तुफानी सैलाब बनते देख *दलित एकता* की बाते की गई ! हैद्राबाद, यु.पी., गूजरात, दिल्ली, महाराष्ट्र चारो और *समता और स्वतंत्रता* की आवाज गूंज उठी ! पर ये सब अचानक बंद कैसे हूआ ? एकता की श्रुंखला क्यो नही बनी ? किस कडी को कैसे जोडू ? किस कडी ने कोताही बरती ? और अचानक एकता की बनती हूई श्रुंखला बिखरने क्यो लगी ?

✍🏻 क्या कनैय्या, जिग्नेश या हम जैसो की उम्र मे दरार आयी ? या हमारी युवा उर्जा से बनती परिवर्तन की नई धाराए उम्रदराज के अविश्वास मे खो गई ? और कितने त्याग और समर्पण को नांपा जाएगा ? *सत्ता और राजनिती हमारा खून चुँस रही है, और धर्म और जाती हमारी साँसे छिन रही है !* फिर भी देश के *दलित एकता* की कडी जूडने का नाम नही ले रही, और हमारे खून को चुँसने वाली सत्ता और राजनिती अपने हाथो में लेकर जर्जर हूए समाज मे न्याय की प्रस्थापना को लेकर गंभीरता नही दिखाई दे रही !

✍🏻 *परिवर्तन का आगाज अभिजन समाज से नही बल्की बंजर समाज से किया जाता है !* आज यही बंजर समाज परिवर्तन की क्रांती के लिए तय्यार हो रहा है, पर एकसाथ न आने का डर भी सता रहा है ! सुना था की लढते लढते ही हम सत्ता पा सकते है, पर यहॉ हम सालों से लढ रहे है पर सत्ता से कोसों दूर रहकर ! एकता की श्रुंखला न बनाते हूए तुकडो तुकडो मे शक्ती का संचयन नही हो पाएगा !

*हमें सोचना होगा !*

✍🏻 फिर कोई अखलाख या रोहीत मरने ना पाए, फिर कोई कनैय्या, जिग्नेश या हम जैसो की जवानी की उर्जा बर्बाद न होने पाए ! फिर कोई सिर्फ गुजरात, युपी, हैद्राबाद, मुंबई या दिल्ली ना कह पाए ! फिर किसी दलित पर होने वाला अत्याचार सिमाओं मे बंधने ना पाए ! होने वाला हर आंदोलन *भारत* का आंदोलन हो ! होने वाले परिवर्तन की क्रांती *भारत* की क्रांती हो ! दलित चेतना और एकता न की गूजरात, महाराष्ट्र, यु.पी. या आंध्र की हो बल्की समुचें *भारत* की हो ! आपकों इन कडीयों को जोडना होगा और *भारत के दलितों की एकता* का आगाज कर संघटीतता का परिचय देना होगा ! हम राह मे है, इंतजार मे है, उस श्रुंखला की कडी बनने में विश्वास रखते है !
✍🏻___*अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर*___✍🏻

Tuesday, 26 July 2016

आंबेडकर भवन" : भावना, भावनिकता की कायदा*

🇪🇺 *"आंबेडकर भवन" : भावना, भावनिकता की कायदा* 🇪🇺

🇪🇺✍🏻 *आम्ही कुणाचे बेगडी, सत्तेचे, पैशाचे की काय'द्याचे* ? 🇪🇺

✍🏻 आंबेडकर भवन प्रकरणात ज्यांना जनभावनेला साथ देता आली नाही. चळवळीच्या अस्मितेसाठी जे जनतेच्या सोबत राहू शकले नाही. असे *काही सदगृहस्थ (महाभाग) "कायदा" पुढे करून आंबेडकरी जनतेमध्ये संभ्रम पसरवित आहेत. ऐनकेन प्रकारे आंबेडकर भवन प्रकरणातून सत्तेच्या (आरएसएस) व त्यांच्या हस्तकांच्या विरोधात आंबेडकरी चळवळीत तयार झालेला आक्रोश त्यांना "कायदा" हे गोंडस नाव पुढे करून थांबवायचा आहे.* आंबेडकर भवन मध्यरात्री पाडतांना यांचा "कायदा" कुठे गेला होता ? बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस हा ऐतिहासिक ठेवा जमिनदोस्त करतांना व त्यावर हातोडा मारतांना यांचा "कायदा" कुठे गेला होता ? *आजकाल आंबेडकर विरोधकांची (आंबेडकरी परिवेशात फिरणारे) सकाळ, दुपार, संध्याकाळ कायद्यानेच व्हायला लागली. हे हल्ली कायद्याची चटणी, कायद्याची पोळी, कायद्याचा झूणका, कायद्याचा पाणी रात्रीबेरात्री बाटलीतून पीऊ लागलेत.* अशीच काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. हे सर्व करतांना यांना कायदाही निट समजत नाही. *सर्वसामान्य आंबेडकरी जनतेने मात्र या संभ्रमातून बाहेर पडावे. व आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेशी, अस्तित्वाशी आपल्या भावना आणखी घट्ट करावे.* ✍🏻

✍🏻 मुळात "कायदा" मोडून आंबेडकर भवन उध्वस्त करण्यात आले. "कायदा" हातात घेऊन समाजाच्या/चळवळीच्या ऐतिहासिक पाऊलखुणा पुसायचा प्रयत्न केला गेला. कायद्याला न जूमानता पैशाच्या व अधिकारपदाच्या गुर्मित वावरणाऱ्यांनी पब्लिक पॉपर्टीवर हल्ला चढविला. आम्हाला कायद्याचा धाक नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व कृत्याबद्दल कायद्यानेच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहीजे अशी अपेक्षा असतांना कायद्यानेच त्यांना पाठीशीही घातले. या सर्व परिस्थितीत *मध्यरात्री पोलिस प्रशासनाचा कायदा पोलिस स्टेशन मध्ये बंदद्वार 'मुन्नी बदनाम हूई' खेळत होता. तर सरकारचा कायदा मध्यरात्री "ऑन ड्युडी...पांडे की सिटी" वाजवित होता. आता कायद्याचे "आता वाजले की १२.००" असतांना जनतेने निर्णय घेऊन 'आंबेडकर भवन' उभारायचे ठरवले तर लगेच यांचा "कायदा" फुगडी घालायला लागला.* मग *१९ जूलै ला मुंबईच्या रस्त्यावर आंबेडकरी जनतेचा आलेला महापूर हा "कायद्या" चे बोला व "कायद्या"ने वागा. हे सांगायसाठीच उतरला होता. सोबतच ज्या जनतेच्या भावनांवर रत्नाकर व साथीदारांनी जो बूलडोजर चालविला होता त्याच भावना सोबत घेऊन तो रस्त्यावर होता. व आजही आंबेडकर भवनाशी त्याच भावना घेऊन तो सोबत आहे.* तुमच्या "काय'द्याचे" काटेरी मुकूट तो भावनेने लाथाडतोय एवढेच.

✍🏻 *समाज हा भावनाशिल आहे व तो राहील. कारण माणूस हाच मुळात भावनाशिल आहे. ज्याला भावना नाही तो माणूस नाही.* परंतु आंबेडकर भवन प्रकरणात एकीकडे भावनाशिल झालेल्या समाजाला कायद्याने बांधण्याचा प्रयत्न काही भावनाहीन माणसं करतांना दिसतात. *आंबेडकर भवन प्रकरणात भावनिक होऊ नका, असे सल्ले देणाऱ्या* या जनावरांना भावना काय असतात व कायदे काय असतात हे समजावून सांगावेच लागेल. *त्यासाठी काही टेस्ट :-*

1⃣ दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर संपुर्ण देशात आंदोलने उभी झाली. कायदा असतांना जनतेने भावूक होऊन आपल्या तिव्र भावना प्रदर्शित केल्या. देशातील जनता एका भगिनीसाठी भावनिक झाली. या भावना इतक्या तिव्र होत्या की, जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकारलाही झुकावे लागले. *"निर्भया" प्रकरणात भावनेचा महापूर इतका होता की, कायदा करावा लागला. कायदा बदलावा लागला. निर्भया नावाने विविध योजना काढाव्या लागल्या. निर्भया नावाने वेगवेगळे प्रयोग करावे लागले.* जनतेला भावनिक होऊ नका म्हणून सांगणारे याचे उत्तर देतील का की, *कायदा असतांना तेव्हा आंदोलन का करावे लागले ? कायदा असतांना कायदा का बदलावा लागला ? बलात्काराची पहिली घटना नसतांना जनता कायद्यावर विश्वास न ठेवता इतकी भावनिक का झाली ? अन्य योजना कार्यान्वित असतांना "निर्भया" नावाने नव्या योजना का काढाव्या लागल्या ? ही भावनिकता नव्हती का ? कायदा असतांना भावनिकतेला का महत्व देण्यात आले ?* कायद्याचा कुत्रा चावलेल्या अ-भावनिक जनावरांना याचे उत्तर देता येईल का ?

2⃣ नुकताच कोपर्डी बलात्कार प्रकरणात भावनिक आंदोलन सुरू झाले आहे. सर्व जनतेच्या भावना पिडीत भगिनिला व तिच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी तिव्र आहेत. पण त्याहीपेक्षा आरोपींना फासावर लटकविण्यासाठी जनतेच्या भावना अधिक तिव्र आहेत. *कायदा आहे. आरोप सिद्ध झाल्यावर कायद्याने आरोपींना शिक्षा होईलही. परंतु आरोप सिद्ध होण्याआधीच आरोपीला फासावर लटकविण्याची मागणी ही कायदा आहे की भावनिकता ? मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना कोपर्डी गावाला भेट देऊन पिडीत परिवाराची सांत्वना करता येते. पण मा. अॅड. प्रकाश आंबेडकरांना तिथे जाण्यापासून थांबविले जाते. हा कायदा आहे की भावनिकता ? मुख्यमंत्र्याला किंवा इतरांना कायदा लागत नाही मात्र प्रकाश आंबेडकरांना कायदा लागतो. हा कायदा आहे की भावनिकता ? खुद्द मा. मुख्यमंत्री महोदय कोपर्डी घटनेतील आरोपींना फासावर लटकवू. फाशीची शिक्षा देऊ. असे म्हणतात. मग आरोप सिद्ध न होताही मा. मुख्यमंत्री महोदय फाशीची गोष्ट कायद्याच्या आधारे करतात की भावनिकतेच्या ? मुख्यमंत्र्यांना कायद्यापेक्षा भावनिकता महत्वपुर्ण का वाटली ?*

✍🏻 वरील दोन्हीही उदाहरणात भावनिकतेने कायद्यावर मात केली हे स्पष्ट दिसून येते. *जीथे समाजाच्या अस्तित्वाशी जुळलेल्या भावनेचा व भावनिकतेचा प्रश्न उपस्थित होतो तीथे चार पाऊले मागे राहून कायदा जनभावनेला सलाम ठोकतो.* आंबेडकर भवन प्रकरणात कायदा व भावनिकता दोन्हीही जनतेच्या बाजूनेच आहेत. किंवा आंबेडकर भवन पाडणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांच्याच बाजूने आहेत. परंतु *कायद्याचा कुत्रा चावलेल्यांना "आंबेडकर भवन" मुद्यावर भावनिकता केली जात आहे. असे सांगून आंबेडकर भवन पाडणाऱ्यांच्या कृतीचे समर्थन करायचे आहे.* सर्वसामान्य जनतेला अञानात ठेऊन आंबेडकरी चळवळीला संपविण्यासाठी सरकार प्रायोजित गुलाम दलालांना पाठीशी घालायचे आहे. व त्यामागून *आरएसएस* चे छुपे कारस्थान यशस्वी करायचे आहे.

✍🏻 त्यामुळे *"आंबेडकर भवन" प्रकरणात कायद्याने समाजाला किती न्याय मिळेल वा न मिळेल हे आताच सांगता येणार नाही. परंतु हे प्रकरण आंबेडकरी जनतेच्या भावनेने व भावनिकतेने आम्हाला जिंकावेच लागणार आहे.* "काय'द्याचा" बळगा पुढे करून आंबेडकरी समाजाची भावनिकता संपविण्याचा प्रयत्न केला जाईल. संभ्रम निर्माण केला जाईल. अशावेळी आंबेडकरद्रोह्यांशी लढतांना आंबेडकरी समाजाची ही परिक्षा राहील. *"आंबेडकर भवन" प्रकरण आंबेडकरी समाज भावनिकतेने जिंकू शकला नाही तर पुढील काळात समाजावर होणारे अन्याय अत्याचार असेच कायद्याने दाबले जातील.* त्यामुळे *"आंबेडकर भवन" प्रकरणात आपण (समाजाने) उचलून धरलेली सत्याची बाजू व त्यामागची भावनिकता तशीच तिव्र ठेऊन ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. तुमची भावनिकता निस्सीम ठेऊन कायद्यालाही तुमच्या बाजूला उभे करावे लागेल. कायद्यानेही जिंकू आणि अस्मितेनेही जिंकू.*
___🏃🏻अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...🏃🏻🇪🇺

Saturday, 23 July 2016

लढाई संपली किंवा कुणीतरी लढाई जिंकली असा गैरसमज कुणी करून घेऊ नये.

✍🏻 *न्यायालयातून बेल मिळणे म्हणजे आरोपमुक्त किंवा दोषमुक्त होणे नव्हे.*🏃🏻

👹 *आंबेडकर द्रोह्यांनो व समाजद्रोह्यांनो आंबेडकर भवन प्रकरणात दोषींना न्यायालयाने बेल दिली (अटकपुर्व जामिन दिला) याचा अर्थ न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त किंवा दोषमुक्त केले असे होत नाही.*👹

✍🏻 आंबेडकर भवन प्रकरणात ४ आरोपींना खालच्या कोर्टाने अटकपुर्व जामिन मंजूर केला आहे. त्यामुळे रत्नाकर गायकवाड व त्याचे पाठीराखे काही समाजद्रोही व काही वकील मंडळी जणू काही आरोपी आरोपमुक्त झाले. दोषमुक्त झाले. अशा आविर्भावात येऊन प्रकरण दडपण्याचा व जनउद्रेकाला शमविण्याचा वायफळ प्रयत्न करीत आहेत. परंतु हे करीत असतांना कायद्याच्या अल्पञानाने स्वतःच तोंडघषी पडून समाजातली आपली दारे बंद करीत आहेत. *हे सर्व बुजगावणे सरकारी दलाल आहेत हेच सिद्ध करीत आहेत.*

✍🏻 *एखाद्या आरोपात एखाद्या आरोपीला जामिन देणे किंवा न देणे हा न्यायालयाचा Discretionary Power आहे.* बहूतांश हा अधिकार वापरतांना न्यायालय पोलिसांनी केलेल्या तपासात *(Report & Investigation)* काय आलेले आहे हे पाहून निर्णय घेत असतो. क्रिमीनल प्रॅक्टीस मध्ये सहसा आम्ही वकील मंडळी पोलिस *Investigation च्या Loopholes* चा लाभ घेऊन आरोपींना जामिन मिळवून देत असतो.  त्यामुळे खालच्या न्यायालयाने आंबेडकर भवन प्रकरणात ४ आरोपींना जामिन दिला आहे याचा अर्थ पोलिस तपासात काहीतरी हलगर्जी करण्यात आलेली दिसून येते. यात सरकार व पोलिस प्रशासन जबाबदार धरता येईल. *सुरवातीपासूनच सरकार व पोलिस प्रशासनाची या प्रकरणात भुमिका ही संशयास्पद होती. हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे.* त्याचा अपेक्षित परिणाम अपेक्षेप्रमाणेच झाला व ४ आरोपींना अटकपूर्व जामिन मंजूर झाला.

✍🏻 महत्वाची बाब या जामिन प्रकरणात ही सुद्धा आहे की, कोर्टाने आरोपींना जामिन देतांना दुःख ही व्यक्त केले आहे. तसेच काही मर्यादा *(Limitations)* ही घालून दिल्या आहेत. आरोपींना आंबेडकर भवन परिसरात जाण्यास न्यायालयाने बंधन घातले आहे. या बाबी लक्षात घेतल्या तर *न्यायालयापुढे या प्रकरणाची दाहकता होती. जनभावना, जनप्रक्षोभ न्यायालयाच्या निदर्शनात होता. असे असतांनाही नाराजी व्यक्त करून न्यायालयाने जामिन मंजूर का केला ? हा संशोधनाचा विषय राहील.* त्यामुळे मा. न्यायालयाचा आदर राखून कुठेतरी शासकीय स्तरावरून या सर्व प्रकरणाला दडपण्याचा शिस्तबद्ध प्रयत्न होतो आहे हे उघडपणे दिसून येते.

✍🏻 आज सकाळी मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत या विषयावर चर्चा झाली तेव्हा आंबेडकर भवन प्रकरणापेक्षा बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस या ऐतिहासिक धरोहरेला ऊध्वस्त केले जाणे हा अक्षम्य गून्हा आहे. परंतु न्यायालयाने त्याकडे दुर्लक्ष का केले हा चिंतेचा विषय होता. न्यायालयाने जामिन मंजूर करतांना त्याची *Intensity* लक्षात घेतली नाही. हे खेदाने म्हणावे लागते. *तरीसुद्धा सरकार या जामिनाच्या विरोधात उच्च न्यायालयात जामिन रद्द करण्यासाठी केव्हा अर्ज करते. व त्यामागे काय भूमिका घेते याकडे लक्ष ठेऊन आहोत.* मुख्यमंत्री २८ तारखेला उच्च न्यायालयात जामिन रद्द करण्यासाठी अर्ज करून चांगल्यात चांगल्या सरकारी वकिलामार्फत मा. उच्च न्यायालयात जामिनाला विरोध करतील अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या सोबतीला आम्ही आमचे क्रिमीनल पॅक्टीस मधील दिग्गज वकीलांची टिम उच्च न्यायालयात सरकारी पक्षाला सहाय्य करण्यासाठी देणार आहोत. *त्यामुळे लढाई संपली किंवा कुणीतरी लढाई जिंकली असा गैरसमज कुणी करून घेऊ नये.*

✍🏻 खालच्या कोर्टाने काही लोकांना जामिन मंजूर केला असला तरी कायद्याने तिथेच हे प्रकरण थांबत नाही. *आरएसएस प्रणित सरकार व सत्ता आंबेडकरी आंदोलनाला दडपूण काढण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावेल. हेही तेवढेच सत्य आहे. १९ जूलै ला मुंबईत आंबेडकरवाद्यांचा पाहीलेला उग्र रूप शमविण्याचा व कायदाप्रेमी आंबेडकरवाद्यांना न्यायालयाचे निर्णय पुढे करून कायद्यानेच गूमराह करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे सुद्धा वास्तव राहील.* परंतु न्यायिक लढाई आम्ही लढत राहू. सत्ता आमच्या न्यायिक लढाईला कितीही कमजोर करण्याचा प्रयत्न करील तरी सुद्धा आम्ही लढत राहू. पुर्वाश्रमिचे न्यायिक अनुभव लक्षात ठेवून.

✍🏻 या सर्व प्रकरणात महत्वाचे हे आहे की, न्यायालयीन कोर्टात आरोपींना जामिन मिळाला असला तरी जनतेच्या न्यायालयात आरोपींना जामिन मिळणे अशक्य व असंभव आहे. *मुळात आंबेडकर भवन व बूद्धभूषण प्रिटींग प्रेस ज्या आंबेडकरद्रोह्यांनी व गद्दारांनी उध्वस्त केली त्या गद्दारांचा निर्णय कायद्याने प्रस्थापित न्यायालयाचा नव्हे तर समाजाच्या, जनतेच्या न्यायालयाचा आहे. कारण हा हल्ला आंबेडकरी अस्मितेवरचा, अस्तित्वावरचा व आंबेडकरी ऐतिहासिक धरोहरेवरचा आहे. त्याला उध्वस्त करण्यासंबंधीचा आहे. १९ जूलै च्या मोर्चाने जनतेच्या न्यायालयाने त्यांचा निर्णय आरोपींविरोधात दिलेला आहे. कायद्याने प्रस्थापित न्यायालयाचे निर्णय त्यापुढे गौण ठरते. कारण शेवटी जनतेच्या न्यायालयाने घेतलेले निर्णय कायद्यात रूपांतरीत होऊन न्यायालयीन कामकाजाचा भाग ठरीत असते.*

✍🏻 *मा. न्यायालयाच्या निर्णय मान्य करून आता हा आंबेडकर भवन प्रकरणातील आरोपींविरोधातला खटला दूहेरी न्यायालयात चालविला जाणार आहे. एकीकडे कायद्याने प्रस्थापित न्यायालयात खटला चालेल तर दूसरीकडे आंबेडकरी समाजाच्या जनतेच्या न्यायालयात हा खटला चालेले. तसेही आंबेडकरी जनतेच्या न्यायालयाने १९ जूलै ला या खटल्यातला पहीला निर्णय घेऊन ३० जूलै पासून श्रमदानातून आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिटींग प्रेस परत उभारली जाईल असा निर्णय घेतलेला आहे.*

✍🏻 एका जनतेच्या न्यायालयाचा निर्णय झालेला आहे. दुसऱ्या कायद्याच्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची प्रतिक्षा राहील. *परंतू जनतेच्या न्यायालयाने रत्नाकर गायकवाड, बोगस ट्रस्टी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या समाजद्रोही आंबेडकर विरोधकांना समाजातून बेदखल करण्याचा निर्णय लाखो जनसमुहाच्या साक्षीने १९ जुलै ला घेतला आहे. तोच अांबेडकरी चळवळीसाठी अंतिम निर्णय आहे. व राहील.*
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

*आंबेडकरी चळवळीने नेतृत्वाची गरज सिद्ध केली.*

🇪🇺 *१९ जुलै च्या महामोर्चाने आंबेडकरी चळवळीला काय दिले.* 🇪🇺

🙏 *आंबेडकरी चळवळीने नेतृत्वाची गरज सिद्ध केली.* 🙏

🏃🏻 *१९ जुलै २०१६ ला झालेल्या मुंबई येथील मोर्चाने आंबेडकरी चळवळीसाठी नेतृत्वाची आवश्यकता व ते भक्कम नेतृत्व असेल तर त्याची उपयुक्तता सिद्ध केली.* 🏃🏻

✍🏻 आंबेडकरी चळवळीने नेतृत्व स्विकारावे. एक नेतृत्व निवडावे. नेतृत्वाशिवाय आंबेडकरी चळवळ उभारी घेणार नाही. *नेतृत्वाचे टोळके घेऊन आंबेडकरी चळवळ ध्येय गाठू शकणार नाही.* एक नेतृत्व स्विकारूनच आंबेडकरी चळवळ गतवैभव प्राप्त करू शकते. हे मागील ४-५ वर्षात मी सातत्याने मांडत होतो. लिहीत होतो. सांगत होतो. ती मांडणी १९ जूलै च्या मोर्चाने अगदी लिलया अधोरेखीत केली. हे मान्य करावे लागेल.

✍🏻 १९ जुलै ला झालेला मोर्चा हा वरकरणी सर्वपक्षीय व एकंदरीतच आंबेडकरी चळवळीचा मोर्चा होता. मी त्या मोर्चाला संयुक्त म्हणणार नाही. परंतु सुरवातीपासून (मोर्चाची घोषणा झाल्यापासूनच) या मोर्चाचे नेतृत्व मा. अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर करणार हे निश्चित होते. हा मोर्चा एका आंबेडकरी नेतृत्वात निघालेला मोर्चा होता. मा. बाळासाहेब आंबेडकर नेतृत्व करणार म्हणून त्यावर अपेक्षेप्रमाणे 👹 विरोधकांनी (आंबेडकरी चळवळीच्या विरोधकांनी) खलही केला. पण शेवटी नेतृत्वाचा निर्णय मोर्चात सहभागी झालेल्यांनी घेऊन चळवळीपुढे एक आदर्श निर्माण केला. नैसर्गिक आपत्तीमुळे (पावसामुळे) जे सहभागी (शारिरिकदृष्ट्या) होऊ शकले नाही. परंतु मानसिकरित्या त्यांनीही नेतृत्वावर विश्वास टाकून नेतृत्व निवडले. जे व्यक्तीगत कारणाने ईच्छा असतांनाही मोर्चात सहभागी होऊ शकले नाही. परंतु त्यांनीही चळवळीचे नेतृत्व मान्य केले. त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या 5⃣ ५ लाख लोकांनीच नव्हे तर जे सहभागी होऊ शकले नाही त्या दुप्पट लोकांनी सुद्धा चळवळीचे नेतृत्व स्विकारले. असे म्हणण्यास हरकत नाही. शिवाय काठावर बसून तमाशा पाहणाऱ्यांनीही १९ जुलैच्या मोर्चाच्या यशस्विततेनंतर नेतृत्वाची महती लक्षात घेऊन स्वतःचे मतपरिवर्तन करू लागले. ही संपुर्ण संख्या लक्षात घेतली तर आंबेडकरी चळवळ भविष्यात भक्कम नेतृत्वाच्या पाठीशी उभी होऊन मोठी भरारी घेऊ शकते व फार मोठा बदल घडवून आणू शकते. हे सिद्ध केले.  *निर्विवाद ते नेतृत्व मा. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांचे होते.* ही आंबेडकरी चळवळीसाठी जमेची बाजू ठरली हे मान्य करावे लागेल.

✍🏻 *आंबेडकरी अस्मिता शाबूत आहेत. आंबेडकरी चळवळीचा लढाऊ बाणा जिवंत आहे. रस्त्यावरच्या लढाया आम्ही संपविल्या नाही. आंबेडकरी चळवळ तीच्यावर होणाऱ्या आक्रमणांना तोंड देणे विसरली नाही. आंबेडकरी चळवळ हीच इथल्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेऊन व्यवस्थेला नियंत्रित करू शकते.* हे १९ जूलै च्या मोर्चाने सिद्ध केले. मध्यंतरीच्या काळात गावगुंड नेतृत्वाच्या टोळक्यांनी प्रभावित होऊन चळवळीने आपली प्रभावशिलता गमावलेली होती. ती *चळवळीची प्रभावशिलता मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरी चळवळीतील नेतृत्वाने परत मिळवली.* निमित्त ठरले ते "आंबेडकर भवन". शेवटी चळवळीच्या केंद्रबिंदूवर झालेला आंबेडकरद्रोह्यांचा तो लढा होता.

✍🏻 आंदोलन केले. मोर्चा निघाला. यशस्वी झाला. निकाल काय येईल. पॉसिटीव्ह की निगेटिव्ह ? याचा विचार आंबेडकरी चळवळ कधीच करू शकत नाही. *लढणे व आंदोलनात्मक राहणे हेच आंबेडकरी चळवळीचे त्रिकालाबाधित्व आहे. आंबेडकर चळवळीची तीच उर्जा आहे. ही उर्जा साठवून ठेवता येणार नाही. ती प्रवाहीत राहण्यातच तीची प्रभावशिलता आहे.* हे इथल्या राजकारण्यापासून ते बुद्धिवंतापर्यंत सर्वांनी ओळखले पाहीजे.

✍🏻 १९ जुलै च्या मोर्चाने आंबेडकरी चळवळीचे नेतृत्वच सिद्ध केले नाही तर आंबेडकरी विचारांच्या विरोधात असलेल्या हितशत्रूंपासून ते थेट शत्रुंपर्यंत आपल्या एकजूट शक्तीचा संदेश दिला. *शिवाय कुठलिही अनुचित घटना घडू न देता बुद्धाची शांती व करूणा अंगी असल्याचा प्रत्ययही दिला. वेळप्रसंगी लढाईच्या रणांगणात रक्तपिपासू सत्तेचा गळा आवळण्याची धमकही दाखवून दिली.*

✍🏻 आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना जामिन मिळेल न मिळेल. *कारण राजकीय व्यवस्थेपासून न्यायालयीन व्यवस्थेपर्यंत सर्वच क्षेत्र आंबेडकरी चळवळीसाठी पुर्णतः पोषक नाही.* परंतू आंबेडकरी चळवळीच्या १९ जुलै च्या लढ्याने व्यवस्थेला हादरा देऊन आंबेडकर भवन पाडणाऱ्यांच्या मनात धडकी भरली हे निश्चित. *आंबेडकर भवन पाडणाऱ्यांची व त्यांनी पाठीशी घालून समर्थन करणारांची समाजात मोकळे फिरण्याची दारे बंद झाली हे निश्चित.* सोबतच स्वाभिमानी चळवळ व तिचे केंद्रबिंदू श्रमदानातून व सामाजिक योगदानातून पूनःश्च उभारण्याचा घेण्यात आलेला निर्णय अनेकांच्या छुप्या स्वार्थी उद्धिष्टांना नस्तनाबूत करून उरात धडकी भरवून गेला. व खंबीर अशा *मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाची नेतृत्व क्षमता सिद्ध करून गेला.*

✍🏻 मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या ३५ वर्षाच्या राजकीय वाटचालीत राजकीय यशाबरोबर सामाजिक यशाला पुनःश्च सिद्ध केेले. *आंबेडकरी चळवळीत फक्त राजकीय वाटचाल राजकीय हेतूने न करता सामाजिक आंदोलनातून आंबेडकरी चळवळ ध्येयाप्रति घेऊन जाता येते हे मा. बाळासाहेब आंबेडकरांनी मागील ३५ वर्षाच्या कालखंडात दिलेल्या सामाजिक लढ्यातून सिद्ध केले. त्याचीच प्रचिती १९ जुलै च्या मोर्चाने पुन्हा आंबेडकरी चळवळीपुढे आली.* व आंबेडकरी चळवळीची व्यापकता परत दृष्टीपथात आली.

✍🏻 १९ जुलै ला झालेल्या मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकजूट झालेल्या आंबेडकरी चळवळीने ही उर्जा पुढील चळवळीच्या मार्गक्रमणात लावावी. शांत बसून चालणार नाही. *कारण रात्रही वैऱ्याची आहे आणि दिवसही वैऱ्याचा आहे.* त्यामुळे *डोळ्यात तेल घालून जागते रहो चा नारा आंबेडकरी चळवळीला द्यावा लागणार आहे.* आज *मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या* नेतृत्वावर ठेवलेला *विश्वास* पुढील काळात तसाच ठेऊन तो वृद्धिंगत करीत जावा लागणार आहे. आंबेडकरी चळवळीने स्विकारलेले *मा. बाळासाहेब आंबेडकरांचे* नेतृत्व समाजापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही आता कार्यकर्त्यांपासून ते नोकरदारांपर्यंत तर साहित्यिकांपासून ते बुद्धिवंतांपर्यंत सर्वांची आहे. आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. *आंबेडकरी चळवळ पुढील काळात मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात फलद्रुप होईल या आशावादासह थांबतो.*
___✍🏻अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

सरकारचा व मिडीयाचा पून्हा एकदा नाकर्तेपणा

💐 अभिनंदन 💐 आंबेडकर भवन प्रकरणी सरकार व व्यवस्थेला हादरविण्यात योगदान देणाऱ्या सर्वांचे... 💐 अभिनंदन 💐

👹 सरकारचा व मिडीयाचा पून्हा एकदा नाकर्तेपणा 👹

✍🏻मुंबईतून थेट - आंबेडकर भवन प्रकरणी आज मा. अॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व भिमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वात भव्य हल्लाबोल मोर्चा विधानभवन मुंबईवर काढण्यात आला. अक्षरशः धो-धो पावसात 3⃣ ३ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाने मुंबई ची लाईफलाईन राणीबाग, भायखडा ते सिएसटी, मुंबई 5⃣ ५.०० तास भिमसैनिकांच्या आक्रोशाने बंद होती.

✍🏻या हल्लाबोल महामोर्चाचा रोष सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष होता. तसेच आंबेडकर चळवळीच्या नावावर तयार झालेले व पडद्यामागून आंबेडकरी चळवळीला उध्वस्त करू पाहणारे "अस्तिनितले निखारे" रत्नाकर व अन्य बोगस ट्रस्टी व त्यांचे पाठीराखे यांना या मोर्चाने थोबाडात चपराक हाणली. थोडीशी जरी लाज या लोकांनी टिकवून ठेवली असेल तर मोर्चात सहभागी आंबेडकरप्रेमींच्या तिव्र भावना लक्षात घेऊन व्यावसायीक व आर्थिक दुकानदाऱ्या बंद पाडाव्या. अन्यथा हाच संयमी आंबेडकरप्रेमी यांची लाईफलाईन बंद पाडू शकतो हे आज त्याने सिद्ध केले.

✍🏻आज लाखो लोकांच्या साक्षीने मा. प्रकाश आंबेडकरांच्या आदेशाने ३० जूलै पासून श्रमदानातून "आंबेडकर भवन" पुन्हा एकदा उभारले जाईल ही घोषणाही झाली. रत्नाकर व अवैध ट्रस्टी व त्यांचे पाठीराखे आता या आंबेडकरप्रेमींना श्रमदानातून आंबेडकर भवन पुन्हा नव्याने उभारतांना कुठली जेसीबी व पोकलँड घेऊन आडवे येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

✍🏻अतिषय शिस्तबद्ध लाखो आंबेडकरप्रेमींच्या उपस्थितीने झालेल्या आजच्या महामोर्च्याची इथल्या मिडीयाने पाहीजे तशी दखल न घेता परत एकदा आपली सत्ताधारीधार्जिणी मानसिकता सिद्ध केली. 3⃣ ३ लाखांच्या वर लोकांनी सहभाग घेतलेल्या या ऐतिहासिक मोर्चाला सर्वदूर समाजात व सत्ताधारी सरकारपर्यंत ही बातमी व आक्रोश पोहचायला पाहीजे होता तो पोहचला नाही. महाराष्ट १ या चँनल व्यतिरिक्त अन्य चँनलनी या मोर्चाची पाहीजे तशी दखल घेतली नाही. पण मुंबई याची साक्षीदार राहीली. या ऐतिहासिक मोर्चात सहभागी झालेले तमाम आंबेडकरप्रेमी साक्षीदार ठरले.

✍🏻मित्रांनो या ऐतिहासिक मोर्चानंतर आपली सर्व आंबेडकर प्रेमींची जबाबदारी वाढलेली आहे. यावर पुढील येणाऱ्या काळात ती पार पाडावी लागेल.
1⃣आंबेडकरी चळवळ पुढील काळात सर्वसमावेशक बनवायची असेल, आंबेडकरी चळवळीचे गतवैभव व अन्यायी, असमानतावादी सत्ताधाऱ्यांविरोधातील आक्रमकता टिकवून ठेवायची असेल तर आंबेडकरी परिवारातून आलेले वैचारिक नेतृत्वाखाली चळवळीने एकत्र व्हावे.
2⃣हल्लीच्या काळात चळवळीवर वाढलेले हल्ले थांबवायचे असेल तर आंबेडकर परिवाराच्या पाठीशी आपण सर्व आंबेडकरप्रेमींनी आजच्या महामोर्चासारखेच उभे रहावे लागेल.
3⃣तुम्ही कितीही माणसे रस्त्यावर उतरवा, कितीही आक्रोश दाखवा. परंतू मिडीया तुम्हाला समाजापर्यंत तुमचा आवाज पोहचू देणार नाही हे आज परत एकदा सिद्ध झाले. तेव्हा चळवळीने व आंबेडकरप्रेमींनी याला गांभिर्याने घेऊन जोपर्यंत आंबेडकरी चळवळ सत्तेची सुत्र हातात घेत नाही तोपर्यंत हा मिडीया तुमचा न्याय आवाज जनतेपर्यंत पोहचविणार नाही. त्यामुळे बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात चळवळीचे राजकीय व सत्तेची सुत्र मांडावे लागतील.
4⃣हा रस्त्यावरचा आक्रोश मतपेट्यांतून जोपर्यंत संघटीत रूप घेणार नाही तोपर्यंत आंबेडकरी चळवळ भविष्याची दिशा घेऊ शकणार नाही. मिडीया चा प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आज आपण बघतो. पण आंबेडकरी चळवळ जनतेचा मुख्यमंत्री आजच्या ऐतिहासिक मोर्चाच्या एकजूटीसारखाच देऊ शकतो हा विश्वास चळवळीत निर्माण व्हावा. तो विश्वास आपण निर्माण करावा.
5⃣आंबेडकर भवन परत एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने ३० जूलै नंतर उभे होईल व तेच पुढील आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू राहील. त्यासाठी आपण आजच प्रण करूयात.

✍🏻एकंदरीतच आपल्या सर्वाच्या साक्षीने आजचा हल्लाबोल महामोर्चा ऐतिहासिक झाला. मुंबई हादरली. सरकार हादरले. पोलिस प्रशासन हादरले. आंबेडकर विरोधिही हादरले व संपले. आजचा हाच मोर्चा पुढील काळात आंबेडकरी चळवळीला व आपल्या सर्वांना आंबेडकरी चळवळीत काम करायला उर्जा पुरवित राहील. हा विश्वास आहे. आंबेडकरी चळवळ परत एकदा आंबेडकर भवनातून उभारी घेईल हा विश्वासही निर्माण झाला.

🙏💐🌹 आपण सर्व साक्षीदारांचे आजच्या सफलतेचे मनपुर्वक अभिनंदन ! 🙏
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर....

Saturday, 4 June 2016

अ-राजकीय आंबेडकरी आतंकवादी : कोण व कसे ? Non-Political Ambedarites are more dangerous for Society.

अ-राजकीय आंबेडकरी आतंकवादी : कोण व कसे ?
Non-Political Ambedarites are more dangerous for Society.

(टिप : मी भारिप बहूजन महासंघाचा एक राजकीय कार्यकर्ता म्हणूनच हे लिहीतोय.)

कायम स्वतःला अराजकीय म्हणवून घेणाऱ्या आंबेडकरवाद्यांनी या समाजाला व पर्यायाने आंबेडकरी चळवळीला रसातळाला नेले आहे. व निवडणूकीच्या काळात याच अराजकीय आतंकवाद्यांनी (व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळे) निवडणूकीच्या काळात सौदेबाजी केली. काहींनी केली नसेल तर राजकीय भूमिकेअभावी व राजकीय भूमिका न घेता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रस्थापित राजकीय पक्षांनाच (कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बिजेपी, मनसे) मदत केली आहे. व समाजाची एकगठ्ठा मते विखूरल्या गेली. त्यामुळे समाज व चळवळ रसातळाला जाऊन राजकीय प्रभावशून्य बनली. अशा सर्व अ-राजकीयांना मी जेव्हा "आंबेडकरी आतंकवादी" म्हटले तर तिर काळजात खूपसल्यागत यांची अवस्था झाली आहे. व ते तळपू लागलेत. माझ्यावर टिका करू लागलेत. आम्ही आतंकवादी कसे हे विचारू लागलेत. त्यामुळे अशा सर्वांना उत्तर देऊन येणाऱ्या पिडीला अ-राजकीय आतंकवादी होण्यापासून वाचविणे मी माझे कर्तव्य समझतो.

भाग - १

आतंकवादी ही संकल्पना सामाजिक द्रोह व समाजविरोधी कृत्य करणारा, सामाजिक अस्थिरता या संबंधाने समकक्ष वापरली जाते. कुणाला हे अभिप्रेत नसेल तरी मी त्या अनुषंगाने ती संकल्पना वापरतोय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक लोकशाही अभिप्रेत होती. परंतु राजकीय लोकशाही संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाने संविधान सभेने स्विकारली व या देशातील जनतेने अंगिकृत केली. त्यामुळे देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित झाली. परंतु सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी राजकीय लोकशाहीचा योग्य वापर झाला तरच सामाजिक लोकशाही प्रस्थापित होईल ही डॉ. बाबासाहेबांसोबतच संविधानकारांचीही अपेक्षा होती. पर्यायाने राजकीय लोकशाहीतूनच सामाजिक लोकशाहीचा मार्ग प्रशस्त करता येईल. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांनीच राजकीय अभावशून्यतेने राजकीय लोकशाही स्विकारली नाही असेच म्हणावे लागेल. त्यामुळे आंबेडकरी समाजाचा राजकीय प्रभाव १९७० पासून संपूष्टात आल्यागत झाला आहे.

राजकीय लोकशाही म्हणजे काय हे सुद्धा स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्याची काही मुलभूत अंगे आहे. ती पुढीलप्रमाणे...
१) प्रौढ मताधिकार (मतदानाचा अधिकार) : वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मतदानाचा संविधानिक अधिकार.

२) राजकीय पक्ष : विशिष्ट विचारधारा व विचारसरणी अंगिकृत करून समान हितसंबंध जोपासणाऱ्या लोकांचा समूह जो न्याय हक्कासाठी स्वतःचे राजकीय प्रतिनिधित्व करू ईच्छितो व एक विशिष्ट विचारधारा विचारसरणी हा त्यांच्या राजकीय वाटचालीचा व लढ्याचा स्थायिभाव असतो. सत्तेत प्रतिनिधित्व मिळविणे हा उद्देश सोबत घेऊन सत्ताधाऱ्यांवर राजकीय दबावगट निर्माण करून राजकीय प्रभाव पाडीत असतो.

३) राजकीय नेतृत्व : विशिष्ट विचारधारा व विचारसरणीने वाटचाल करणाऱ्या राजकीय पक्षाला राजकीय नेतृत्व लागते. जे नेतृत्व त्या पक्षाच्या विचारधारेला अनुसरून समाजाच्या न्याय व हक्कासाठी सत्ताधाऱ्यांशी लढत असते. हे नेतृत्व तत्कालिन काळातील जिवंत व्यक्तीच करीत असतो. भूतकाळात होऊन गेलेला नेता नाही.

४) राजकीय सहभागित्व : देशातला प्रत्येक नागरिक ज्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केलीत व कायदेशिर मतदार बनला आहे अशा प्रत्येकच नागरिकांचे राजकीय सहभागित्व. निवडणूकांच्या काळात त्यांची राजकीय सक्रीयता, राजकीय भूमिका व राजकीय ईच्छाशक्ती राजकीय लोकशाहीत महत्वपूर्ण असते.

मतदानाला जातांना त्याचे हितसंबंध जोपासणारा विचार, त्या विचारांवर चालणारा / असणारा व निर्माण झालेला पक्ष, व त्या पक्षाचे नेतृत्व करणारा नेता व त्या पक्ष व नेतृत्वाने दिलेला उमेदवार हा विचार त्याच्या मनात असतो. राजकीय लोकशाहीत बिनढोक व अविवेकी, अविचारी मतदार हा कधीही धोकादायकच असतो. कारण लोकशाहीत सत्ता व सत्तेची ध्येयधोरणे व्यक्तीच्या हातात राहत नसून पक्षाच्या हातात असतात पर्यायाने त्या पक्षाच्या मुळाशी असणारी विचारधारा सत्ता व सत्तेच्या ध्येयधोरणाला प्रभावित करीत असतात. (उदा. २०१४ ला भारतात स्थापन झालेली मोदी, भाजप, संघ, हिंदुत्ववादी सत्ता)

या किमान राजकिय लोकशाहीच्या परिमाणाच्या चौकटीत आंबेडकरी विचार, आंबेडकरी संस्था, संघटना, मंडळे व आंबेडकरी समाज यांच्या राजकीय सहभागित्वाचा विचार करून आपल्याला उत्तरे मिळू शकतील. सांसदीय लोकशाहीत कुठलाही नागरीक हा अ-राजकीय राहू शकतो का ? याचे उत्तर मिळेल. अराजकीयत्व हे लोकशाहीला लागलेली किड आहे नव्हे तो लोकशाहीत केलेला द्रोह नाही का ? यातूनच पुढे आंबेडकरी अ-राजकीय आतंकवादी समोर येतील. स्पष्टही होतील.
____अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

अ-राजकीय आंबेडकरी आतंकवादी : कोण व कसे ?

भाग - २

हल्ली आंबेडकरी समाजात अ-राजकीय म्हणवून घेणे भूषणावह बनले आहे. नव्हे "अ-राजकीय" असणे एखादा पुरस्कारक्षम बिरूद बनले आहे. "आम्ही अ-राजकीय", "आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही.", "आम्ही कुठल्याही गटाचे नाही.", "आम्ही राजकीय नाही.", "अमके-तमके काम राजकीय नाही; सामाजिक आहे. म्हणून तुम्ही आमच्या सोबत या, सहकार्य करा, मदत करा." हे हल्ली मोठ्या गर्वाने सांगितले जाते. इतकेच नाही तर अशा लोकांना निष्ठावंत, सच्चे व हाडाचे आंबेडकरी समजले जाते. इतकेच नव्हे तर समाजात अशा अ-राजकीयांना राजकीय माणसांपेक्षा मान, सन्मानही जास्त मिळतो.  व समाज राजकीय प्रवाहापासून दूर फेकला जातो. ज्याचा प्रत्यक्ष लाभ प्रस्तापित राजकीय पक्ष घेतांना दिसून येतात. या देशातला उर्जावान आंबेडकरी समाज अतिषय महत्वाच्या लक्षापासून दूर जाणे हेच सत्तेवर येण्याचे सुत्र इतर राजकीय पक्षांनी तयार केले आहे. हे इतर पक्ष या अ-राजकीयांना उर्जा (पैसा) पुरवितात. इतकेच काय तर या स्वतःला अ-राजकीय म्हणविणाऱ्या आंबेडकरी लोकांना सामाजिक कार्याच्या नावाखाली कार्यक्रम घ्यायला पैसाही सत्ताधारी व प्रस्तापित पक्ष पुरवित असतात. "जितका अ-राजकीय आंबेडकरी व्यक्ती, संघटन, संस्था, मंडळ इ. तितका इतर राजकीय पक्षांत त्याचा भाव (किंमत = चळवळीला व समाजाला विकण्याची) जास्त." हे जणू वास्तवागत कोरलेले आहे. आमचेे अनुभव तर असे की, कुठलाच अ-राजकीय संस्था, संघटना व मंडळाचा किंवा व्यक्तीचा सो-कॉल्ड सामाजिक कार्यक्रम इतर पक्षांच्या पैशाशिवाय होतच नाही. इतर पक्षांकडून तो पैसा घेता यावा म्हणूनच हे सामाजिक कार्यक्रम होतात अन्यथा एकही कार्यक्रम होतांना दिसला नसता. बरं, याची परतफेड काय तर निवडणूक आली की भाऊ, दादा, साहेब आमची मतं तुम्हालाच. देतात का देत नाही हा भाग वेगळाच. कारण पैसा सगळ्यांकडून घ्यायचा असतो.

दुसरे असे की या सर्व अ-राजकीय माणसांची, संस्था, संघटना, मंडळांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. पण समाजकार्याचा आव इतका की यांनी यांची अख्खी संपत्तीच समाजाच्या उत्थानासाठी घालविली. वास्तवात काय तर साध्या बाजूच्या माणसाचे राशन कार्ड पण कधी काढून दिलेले नसेल व नाही कधी एखाद्या सरकारी दप्तरामध्ये जाऊन त्याला न्याय मिळवून दिला असेल. समाज तर दूरच राहीला. पण हेच सारे अ-राजकीय लोक प्रबोधनाच्या नावाने बोंबा ठोकून आंबेडकरी राजकीय नेत्यांवर व आंबेडकरी पक्षांवर आगपाखड करतील. नेतृत्वाविषयी व आंबेडकरी पक्षांविषयी तिरस्कार व द्वेष निर्माण करण्यात ही सर्व अ-राजकीय मंडळी पटाईत असतात. "आम्हीच तेवढी आंबेडकरी चळवळ (मुळातली वळवळ) चालवतो." "आमच्यामुळेच आंबेडकरी चळवळ टिकून आहे." "राजकारण्यांनी घात केला. गटातटात विभागले." "हा पक्ष असा, तो पक्ष तसा, हा नेता असा, तो नेता तसा." हे यांचे नेहमीचे प्रवचन. मात्र समाजावर किंवा समाजातल्या एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर यांना भाजला पापडही मोडता येत नाही. तेव्हा राजकीय नेत्यांची आठवण येते. कारण प्रशासनावर व सत्तेवर या अ-राजकीयांचा प्रभाव शून्य. जेमतेम आर्थिक परिस्थिती असणारे हे तमाम अ-राजकीय अल्पावधीतच अ-राजकीय समाजसेवेतून मालदार कसे होतात ? याची उदाहरणे तुमच्या आजूबाजूलाच सापडतील. मग समाजाला राजकीय प्रभावशून्य बनविणाऱ्या या अशा बेगडी अ-राजकीय आंबेडकवाद्यांना आतंकवादी नाही तर काय म्हणायचे.

या अ-राजकीयांना आम्ही कधी विचारले आहे का की त्याने निवडणूकांमध्ये कुणाला मदत केली ? कुणाला मतदान केले ? कुठली भूमिका वठविली ? कुठल्या पक्षाचा प्रचार केला ? किमान हे अ-राजकीय चालवित असलेल्या संघटनांच्या सदस्यांना कुठल्या पक्षाला मतदान करायला लावले ? त्यांनी स्वतःहा कोणत्या पक्षाला मतदान केले ? ज्या पक्षाला मतदान केले तो पक्ष आंबेडकरी विचारांचा होता का ? तो पक्ष आंबेडकरी होता का ? याचे उत्तर १००% शंभर टक्के नकारार्थी येतील. मग हे अ-राजकीय कसले आंबेडकरवादी ? शत्रुपक्षांना देशाच्या सत्तेवर येण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे हे आंबेडकरी असू शकतात का ? हे कसले आंबेडकरी हे तर समाजात अराजकता माजविणारे अ-राजकीय आंबेडकरी आतंकवादीच. या अ-राजकीय आतंकवाद्यांपासून आंबेडकरी चळवळीने सावध होणे गरजेचे नव्हे काळाची गरज आहे.
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर....

अ-राजकीय आंबेडकरी आतंकवादी :  कोण व कसे ?

भाग - ३

आज आंबेडकरी चळवळ व्यापक होत चालली आहे. देशातल्या सत्ताधारी विचारसरणीने जी परिस्थिती देशांतर्गत निर्माण केली त्या परिस्थितीला तोंड देत असतांना भारतातील लोकशाही व लोकशाहीने सर्व नागरिकांना दिलेली सुरक्षीतता कायम ठेवण्यासाठी देशातला तरूण वर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पर्याय म्हणून पाहतो आहे. कन्हैय्या असो की मॉर्क्सवादी विद्यार्थि संघटना आपल्या भूतकाळातील अपयशाचे शल्य झूगारून आंबेडकरी विचारांना हाताशी घेऊन सत्ताधारी विचारसरणीच्या (हिंदूत्ववादी) विरूद्ध रस्त्यावर येऊन लढतो आहे. सह्रदयाने त्यांचे स्वागत आंबेडकरी चळवळीने करणे अपेक्षीत आहे. मिडीया ट्रायल, आताच का पुळका ईत्यादी ईत्यादी विसरून. या लढ्याचे व चळवळीचे नेतृत्व शिफ्ट होतोय का की नाही ही भिती न बाळगता.

 कारण अॅड. प्रकाश आंबेडकर अगदी २०१२ पासून बदलणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेऊन आरएसएस व हिंदूत्ववाद्यांविरूद्ध लढत आहेत. अगदी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणविस यांच्या सरकारी (हिंदूत्वप्रणीत) ध्येयधोरणाच्या विरोधात प्रकाश आंबेडकर लढत होते. ईतक्यात हैद्राबादचे रोहीत वेमुला प्रकरण घडले व त्याचबरोबर दिल्लीचे जेएनयु प्रकरण घडले. याही प्रकरणात अगदी सुरवातीलाच उडी घेऊन प्रकाश आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना आश्वस्थ केले. कॉग्रेस असो वा अन्य पक्ष असो किंवा सो कॉल्ड आंबेडकरी नेते व पक्ष सरकारी बिळात दडून बसले असतांना प्रकाश आंबेडकरांनी एकहाती मोर्चा सांभाळला. मुंबई व दिल्लीतील तरूणाईच्या मोर्चाने त्यांचे नेतृत्व सिद्धही केले. परंतू तरूणाईचा बदलता चेहरा लक्षात घेऊन स्वतःचे नेतृत्व पूढे न करता नव्या तरूणांना या सरकार विरोधातल्या लढाईचे नेतृत्व करायची संधी प्रकाश आंबेडकरांनी दिली. परंतू इतक्या व्यापक होत जाणाऱ्या लढ्यात व आंबेडकरी चळवळीची व्यापकता वाढत असतांनादेखील काही अ-राजकीय आंबेडकरवाद्यांनी सत्ताधारी मानसिकतेचे (हिंदूत्ववादी) बळी पडून कन्हैय्याच्या आंदोलनाला व एकूणच त्याला पाठींबा देणाऱ्यांच्या विरोधात संशयकल्लोळ निर्माण केला.

विरोध करणाऱ्यांत सारेचे सारे स्वतःला अ-राजकीय म्हणविणारेच होते व आहेत. ज्यांना राजकीय भूमिका नाही, ज्यांना राजकीय समज नाही अशांनीच हा संशयकल्लोळ निर्माण केला. कुठलाही राजकीय कार्यकर्ता कन्हैय्या वा पाठींबा देणाऱ्यांच्या विरोधात नव्हता. विरोधात होता व आहे तो बिजेपी आरएसएस व त्यांच्या समर्थनातील पक्ष संघटना व हा सो कॉल्ड अ-राजकीय आंबेडकरी. ज्याला देशांतर्गत राजकीय घडामोडीची जाण नाही. सर्व राजकीय पक्ष एकजूट होऊन बिजेपी आरएसएस शासनाच्या विरोधात उभे होत असतांना हेच अ-राजकीय आंबेडकरी बिजेपी आरएसएस व तत्सम संघटनांनी जो मोर्चा उघडायला पाहीजे होता तो यांनीच उघडला. मग हे आंबेडकरी चळवळीच्या विरोधात जाऊन विद्वत्ता व संशयकल्लोळ माजवून आंबेडकरी मांडलिकत्व स्विकारणारे अ-राजकीय आंबेडकरी आतंकवादी नाहीत का ?

परिस्थितीला हेरून चळवळ चालविली गेली तर ती सर्वव्यापक होईल. विचारांचे मांडलिकत्व स्वतःकडेच ठेऊन विचाराची व चळवळीची सर्वव्यापकता संपविणारे हे सारेच अ-राजकीय का दिसून येतात ? याचे कारण राजकीय अद्न्यान हेच आहे. अ-राजकीय म्हणून बुद्धीभेद करणारे यांना कुठल्या संद्न्येत बसवायचे हा विचार आपणच करायचा आहे. माझ्या दृष्टीने हे आंतकवाद्यांपेक्षा कमी नाहीत.

आंबेडकरी माणसाला स्वतःला अ-राजकीय म्हणविण्यात गर्व व अभिमान का वाटावा ? हा चिंतनाचा विषय आहे. जिथे बाबासाहेब आंबेडकर इथल्या राजकीय व्यवस्थेला मार्गदर्शक ठरतात. आंबेडकरी विचार सत्तेला पर्यायी व मार्गदर्शक वाटतात. भारतीय नागरिकांना राजकीय बदलाचा व शासकीय ध्येयधोरणाचा पर्याय म्हणून आंबेडकरी विचार पर्यायी व जवळचे वाटतात. तिथे आंबेडकरी अनु़यायी म्हणविणारे अ-राजकीय माणसे, संस्था, संघटना, मंडळे आंबेडकरी कसे असू शकतात. कुठेतरी, काहीतरी आमचे चुकतेय. राजकीय निर्णयक्षमता पंगू झालीय याचेच हे द्योतक नाही का ? ही परिस्थिती कुणी निर्माण केली असेल तर ती इथल्या स्वतःला आंबेडकरी म्हणविणाऱ्या भाषणकार, प्रबोधनकार, गायक, नोकरदार, लेखक, कवी व सो कॉल्ड समाजसेवकांनी व संस्था, संघटना, मंडळे चालविणाऱ्या तमाम अ-राजकीयांनीच केली आहे. कधीच कुठलीही ठाम राजकीय भूमिका न घेणाऱ्यांनी ही परिस्थिती निर्माण केली असे म्हणणे काय गैर आहे. यावर निरपेक्ष भावनेतून विचार व्हावा.
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

अ-राजकीय आंबेडकरी आतंकवादी : कोण व कसे ?

भाग - ४

राजकीय भूमिका घेणे म्हणजे राजकीय पक्षात काम करणे किंवा त्या पक्षाचा सदस्य असणेच असे नव्हे. तर कुठल्यातरी राजकीय विचारांची व त्या विचारधारेवर चालणाऱ्या पक्षाची बांधिलकी स्विकारून ती विचारधारा व तो पक्ष जनमानसात प्रसारित व प्रचारीत करून मतदार व लोकशाहीतील नागरिक या नात्याने मतदान पेटीतून त्या विचाराची राजकीय ताकद निर्माण करणे होय. एखादा पक्ष स्विकारत असतांना त्या पक्षाच्या उत्पत्तीमागे असणारी विचारधारा आपण स्विकारीत असतो. व तीच आपली राजकीय भूमिका म्हणुन पुढे येते. याच परिमाण सुत्राचा आधारे लोकशाहीचे बळकटीकरण होऊ शकते.

आम्ही त्या प्रत्येकच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करतो ज्यांनी एखादा राजकीय पक्ष, नेतृत्व व विचारधारा स्विकारली आहे. निदान लोकशाहीतील नागरिक असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. मग ते भाजपचे कार्यकर्ते असोत वा कॉग्रेसचे कार्यकर्ते असोत. त्यांची राजकीय भूमिका ते सिद्ध करीत आहेत. व जनमानसात पोहचवित आहेत. स्वतःला आंबेडकरी म्हणविणाऱ्या परंतु बिजेपी, शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी व अन्य राजकीय पक्षात काम करणाऱ्यांचे व त्यांच्या हितसंबंधीयांचेही आम्ही  स्वागत करतो. परंतु त्यांनी समाजाला गफलत मध्ये न ठेवता स्पष्टपणे समाजासमोर मांडावे की आम्ही त्या पक्षाच्या विचारधारेला स्विकारले आहे. फक्त तो पक्ष स्विकारला विचारधारा स्विकारली नाही असे आठवले स्टॉईलने समाजाला फसवू नये. अ-राजकीय व अपक्षीय लोकांपेक्षा इतर पक्षीयांसोबत काम करणारे कधीही चांगले. कारण त्यांचे राजकीय शिक्षण त्यातून होत जाते. व राजकीय प्रगल्भता आली की समाजाला कधीतरी ते उपयोगी ठरतातच. परंतू अ-राजकीय व अपक्षीय हे समाजाला नेहमीसाठीच धोकादायक. लोकशाहीत वावरणाऱ्या समाजाला तर जास्तच धोकादायक आहे.

आंबेडकरी चळवळीतील राजकारणाचे तिनतेरा वाजले. फाटाफूट झाली. गटबाजी झाली. अशा सबबी पुढे करणारे अ-राजकीय नेमके विरोधी पक्षांच्या हातातील बाहूले आहेत हे ओळखावे. समाजाला भ्रमित करून विरोधी पक्षाला लाभ पोहचविणारे आहेत हे समजावे. जो व्यक्ती स्वतःला आंबेडकरी म्हणवितो त्या प्रत्येकच व्यक्तीचा राजकीय अंग असायलाच पाहीचे. राजकीय अंग नसलेला आंबेडकरी असूच शकत नाही. तो आंबेडकरी मुखवटा घेतलेला बहूरूपी आहे हे लक्षात घ्यावे. या देशाला लोकशाही शासनव्यवस्था व सांसदीय स्वरूप देणाऱ्या बाबासाहेबांना मानणारा माणूस (मतदार) अ-राजकीय कसा राहू शकतो ? हा बुद्धीभेद करणाऱ्यांना आंबेडकरी तरुणांनी वेळीच ओळखले पाहीजे. व यांचा बुद्धीभेद संपवून चळवळीची होणारी हानी थांबविली पाहीजे.

आंबेडकरी समाज गटातटात का विभागला असा प्रश्न करून काही लोक बुद्धीची दिवाळे काढतात. या लोकांनी चळवळीचा अभ्यास करावा. संपूर्ण आंबेडकरी समाज गटातटात विभागला हे साफ खोटे आहे. गटातटात विभागलेला समाज १०% असेल तर इतर विरोधी पक्षीयांसोबत काम करणारा ९०% आहे. हे तपासायचा सोपा मार्ग आहे. या महाराष्ट्रात ३ करोड च्या जवळपास आंबेडकरी मतदान आहे. सर्व आंबेडकरी गट-तट-पक्ष यांना मिळणाऱ्या मतदानाची बेरीज केली तरी ती १० ते १५ लाखाच्या वर जात नाही. मग उरलेले आंबेडकरी मतदान कुठे गेले ? याचे स्वतःला अ-राजकीय म्हणविणारे समाजापूढे उत्तर देतील का ? की यांनीच हे उर्वरित मतदान आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना व नेतृत्वांना शिव्या देऊन अन्य पक्षांकडे वळते केले हे सांगतील का ? हे विचारण्याची वेळ आता समाजापुढे आली आहे.

ही इतकी मोठी तफावत असण्याला जबाबदार हा स्वतःला अ-राजकीय म्हणणारा व राजकीय भूमिका न घेणारा नोकरदार, प्रबोधनकार, लेखक, कवि, गायक, भाषणकार आहे. कारण हा समाजात आपली भूमिका मांडत असतांना आंबेडकरी राजकीय पक्षाची वा नेतृत्वाची भूमिका न मांडता शेखचिल्लीसारखे स्वप्नवत राजकीय पक्षाची भूमिका मांडतो. जसेकाही राजकीय पक्ष कसा असावा, त्याने काय करावे, कुठली भूमिका घ्यावी, नेता कसा असावा, त्याने काय करावे, कसे वागावे इ. ईत्यादी जणू स्वयंम् बाबासाहेब रोज यांच्या कानात येऊन सांगतात. ही शेखचिल्लीची स्वप्न रंगविणारे व स्वतःला अ-राजकीय म्हणविणारे आतंकवाद्यांपेक्षा कमी नाहीत. ज्यांनी अख्खा समाज वेठीस धरला. व समाजाला राजकीय प्रभावशून्य बनविले. अधिक काळ गप्प राहीलात तर सत्तेवर बसलेली विचारधारा तुम्हाला कायमची संपवून टाकेल. याचा गांभिर्याने विचार व्हावा.
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर....

अ-राजकीय आंबेडकरी आतंकवादी : कोण व कसे ?

भाग - ५

अ-राजकीय असणाऱ्यांत मोठी संख्या ही शिक्षित वर्ग, नौकरदार, भाषणकार, साहित्यकार, प्रबोधनकार, लेखक, कवी, व पोटभरू समाजसेवक यांची आहे. काही अपवाद वगळता या सर्व वर्गाने कधीही राजकीय भूमिका घेतली नाही व समाजासमोर मांडली नाही. प्रत्येकजण आपापल्या पोटापाण्याची सोय पाहू लागला. हाच वर्ग आहे जो स्वतःला प्रति-आंबेडकर समजून समाजाला विचलीत करीत राहीला. सातत्याने समाजात संभ्रमावस्था निर्माण करीत राहीला. व समाजात राजकीय नैराश्य पसरवून आपली भूक भागवू लागला. त्यातले काही...

१) नौकरदार : हा वर्ग नोकरी पेशात वावरणारा, महिन्याकाठी पगार घेणारा, समाजात मान सन्मानाने जगणारा. ज्यात बाबू पासून अधिकाऱ्यांपर्यंत ते प्रोफेसर पासून ते शिक्षकांपर्यंत तर डॉक्टर, वकील, इंजिनिअर पर्यंत. यांचा आंबेडकरीझम प्रमोशन, बदल्या पर्यंतच. समाजातला क्रिम वर्ग पण स्वतःच्या निश्चित कप्प्यात जगणारा. ठोस सामाजिक व राजकीय भूमिका यांच्या पाचविला कधीच पूजत नाही. समाजात बाबासाहेब आम्हीच वाचला असे दाखवून लोकांकडून मानसन्मान मिळवून घेणे हाच यांचा परमोधर्म, परंतू सत्ताधारी, राजकीय पक्षांत अतिषय जूगाळू म्हणून प्रसिद्ध. यांना बाबासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या पक्षात काम करा म्हटले की आम्हाला राजकारण करता येत नाही. पक्षाचे काम करता येत नाही. हे ठेवलेले उत्तर. कुठल्या कायद्याने तुम्हाला राजकीय काम करता येत नाही ? हे विचारले तर निरूत्तर. या देशाच्या संविधानाने राजकीय अधिकार दिले असतांना यांना राजकीय भूमिका न घेणे ही पळवाट आहे. कुठल्याही नौकरदार माणसाला कुठलाही कायदा राजकीय भूमिका घेण्यापासून रोखू शकत नाही. फक्त निवडणूक काळात प्रचार सभेतून राजकीय प्रचार प्रतिनिधित्व कायद्याने करता येत नाही. अन्य काळात समाजात तुम्ही तुमची राजकीय भूमिका घेऊन समाजाला मार्गदर्शन करू शकता. पण आजपर्यंत हे असे कधी करतांना दिसले नाही. निवृत्त झाले की लगेच यांना चळवळीचा कळवळा येतो व आपली मतं समाजावर थोपू पाहतात. हे अ-राजकीय या चळवळीची पिछेहाट होण्यात कारणीभूत नाहीत का ?

२) प्रबोधनकार : हा एक विचित्र वर्ग. यांची स्वतःची काही भूमिकाच नाही. सरड्यासारखा रंग बदलणारा वर्ग. जिथे बोलवाल तिथे जाऊन त्या पक्षाचे व नेतृत्वाचे गूणगाण करेल. यांना ६०-७० ते १ लाखाशी मतलब. आम्ही आंबेडकरी आहोत व आमची काही निश्चित राजकीय भूमिका असावी असे यांना कधी वाटलेच नाही. पोटापाण्यासाठी सर्वच पक्षांशी जवळीक साधून असलेला हा वर्ग. यांनी बाबासाहेबांची राजकीय भूमिका तत्कालिन परिस्थितीत कधी मांडलिच नाही. नको त्या गोष्टी समाजात मांडून चळवळीची अब्रु चव्हाट्यावर मांडण्यात यांना असूरी आनंद मिळाला. टाळ्यांचा गजरात यांनी तो आनंद घेतला. पण समाज चळवळीपासून व राजकारणापासून निराश बनत चालला याचे यांना देणेघेणेच नाही.

कालपरवाची गोष्ट भद्रावतीला सभा होती व सभेनंतर प्रकाशनाथ पाटणकरांचा प्रबोधनाचा कार्यक्रम. स्टेजवर प्रकाशनाथ माझ्या बाजूला येऊन बसलेत. मी त्यांना सहज म्हटले साहेब ते, "घे न् लेका अध्यक्ष पदाचा फायदा" व "भिम के लकते जिगर, आधे इधर, आधे उधर" हे गाणे बंद पाडलेत आम्ही. या गाण्यावर मुले तुफान नाचतात व समाजाची, चळवळी अब्रु चव्हाट्यावर येते. त्यापेक्षा समाजाला एक पक्ष, एक नेतृत्वाची भूमिका देणारे एखादे गाणे लिहा." आमचे साहेब लगेच चिडले व म्हणाले, "कुणी बंद पाडले ते गाणे. माझ्या बापाने लिहीले होते ते." हे सांगतांना किती गर्व व अभिमान. पण त्या गाण्यांनी चळवळीचे किती मोठे नुकसान केले याची तिळमात्र चिंता नाही. हीच परिस्थिती जवळपास सर्वच प्रबोधनकारांची. काय धडा घेतोय या अ-राजकीय प्रबोधनकारांकडून ? आहेत का हे आंबेडकरी ? यांना विचारांशी व समाजाच्या राजकीय खच्चिकरणाशी काही संबंध नाही. कुठे स्विकारली यांनी लोकशाही, संविधान व बाबासाहेब ?

३) लेखक, कवि, साहीत्यकार, भाषणकार : समाजाचे दुःख, वेदना शब्दांकीत करणारा हा वर्ग. नावलौकीक मिळविण्यासाठी हपापलेला. पण राजकीय शून्य. यांच्या साहीत्यात आंबेडकरी राजकारण कुठेच नाही. नव्हे आंबेडकरी राजकारण हा याच्या साहीत्याचा विषयच बनला नाही. स्वतःला अ-राजकीय म्हणवून घेण्यात धन्यता मानणारा. समाजावर आपली मते लादणारा. फक्त यांनीच बाबासाहेब वाचला व हेच बाबासाहेब मांडू शकतात, लिहू शकतात या मक्तेदारीत वावरणारा. बाबासाहेबांना जे कळले नाही ते फक्त यांनाच कळले अशा आविर्भावात जगणारा. राजकारण आमचे क्षेत्र नाही आम्ही साहित्यिक असे म्हणून राजकीय जबाबदारीपासून स्वतः दूर पळणारा व समाजातही राजकीय नैराश्य निर्माण करणारा. मात्र पुरस्कारांसाठी राजकारणी व सत्ताधाऱ्यांच्या पायघड्या पडणारा. आंबेडकरी माणसांना व समाजाला अराजकीय बनविण्यात यांचा मोठा हात राहीलेला आहे.

या सर्व वर्गाने आपआपली जबाबदारी निश्चित पार पाडली असती व राजकीय भूमिका घेऊन काम केले असते तर आंबेडकरी राजकारण सत्तास्थानावर दिसले असते. समाजकारण, अर्थकारण, साहित्यकारण या सोबतच राजकारण घेऊन चालले असते तर आंबेडकरी राजकारणाला एक वेगळे वळण प्राप्त झाले असते. पण यांनी राजकीय अस्पृश्यता पाळली. तेही फक्त आंबेडकरी पक्ष व नेतृत्वांच्या राजकारणाच्या बाबतीत. एकंदरीच आंबेडकरी राजकारणाच्या बाबतीतच. परंतू इतर प्रस्तापित राजकीय पक्षांशी यांनी आपली मैत्री मात्र घट्ट ठेवली. अशा बेगळी आंबेडकरवाद्यांचे बुरखे फाडूनच आंबेडकरी राजकारणाला मजबूत करता येईल. अन्यथा हीच माणसे समाजाच्या दुःखाचे, अन्याय, अत्याचाराचे भांडवल करून चळवळीला संपवतील. अशाप्रकारे समाजाला, चळवळीला व विचारांना संपविणाऱ्यांना अ-राजकीय आतंकवादी नाही तर काय म्हणायचे ? आजच्या तरूण पिढीला हे चळवळीचे बुजगावणे आेळखून मार्ग काढावा लागेल एवढे लक्षात घ्या.
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

अ-राजकीय आंबेडकरी आतंकवादी : कोण व कसे ?

भाग - ६

आंबेडकरी समाजाचे राजकीय शिक्षण झालेले नाही असा आरोप करणे चुकीचे नाही. आंबेडकरी चळवळ सामाजिकतेच्या नादात मुख्य प्रवाहापासून भरकटत गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक लढा १९३५ च्या नंतर राजकीय लढ्यात रूपांतरीत झाला हे अनेकांना अजूनही कळलेले दिसत नाही. संविधाननिर्मितीनंतर तर बाबासाहेबांनी सर्व लढे हे राजकीय पातळीवरूनच लढलेले दिसून येतात. सामाजिक लढ्यालाही त्यांनी राजकीय पटलावर नेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याला कारण होते कायद्यांचा वापर व लोकशाही व्यवस्था. त्यांच्यानंतर १९७० पर्यंत आंबेडकरी चळवळीचे सामाजिक लढे राजकीय पटलावर राजकीय नेतृत्वांच्या माध्यमातून लढले गेले. परंतू त्यानंतर कांशीराम आणि आरएसएस च्या प्रादू्र्भावाने चळवळीला राजकीय मरगळ येण्यास सुरवात झाली. आरएसएस च्या कार्यप्रणालीचे दाखले देऊन राजकीय आंबेडकरी चळवळीला सामाजिकतेच्या नावाखाली संपविण्यात आले. सामाजिकतेचा प्रादूर्भाव १५ वर्षात इतका वाढला की आरएसएस ने १९८४ च्या आसपास भाजप व बिएसपी (बसपा) या दोन राजकीय पक्षांची एकाचवेळी निर्मिती केली. व कांशीरामला उत्तरप्रदेशात सहकार्य करून मोठे करून सत्तेपर्यंत नेले. व ईथेच आंबेडकरी चळवळ सामाजिक व राजकीय अशा दोन भागात स्पष्टपणे विभागली गेली. राजकीय नैराश्य पराकोटीला गेले. व आंबेडकरी चळवळीत अ-राजकीय आंबेडकरी आतंकवादी तयार होण्यास सुरवात झाली.

आजही सामाजिकतेचा हूंदका मारणारे सारेच अ-राजकीय त्याच्या सामाजिकतेला न्याय्य ठरविण्यासाठी आरएसएस ची उदाहरणे देतांना दिसतात. आरएसएस सारखे आंबेडकरी चळवळीने काम करावे असे म्हणणारे आंबेडकरी नसून आरएसएस प्रभावित आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. कारण आरएसएस ज्यांच्यासाठी काम करते त्या प्रस्तापीत समाजाची सर्वांगिण परिस्थिती व आंबेडकरी समाजाची सर्वांगीण परिस्थिती यात मोठा फरक आहे. एक समाज सर्वसम्पन्न आहे तर दुसरा साधनहीन. हे वास्तव आहे. डॉ. बाबासाहेबांनी सामान्य तळागाळातल्या बहूजन वर्गाला लोकशाही व संविधान त्यांच्या उत्थानाचे साधन सांगितले आहे. हे साधन वापरण्याचा एकमेव मार्ग राजकारणातून जातो हेच या अ-राजकीयांनी जाणिवपूर्वक विसरलेत. व चळवळीतील सामान्य लोकांत संभ्रम निर्माण केला. किती ही या अ-राजकीयांच्या बुद्धीची दिवाळखोरी.

काही अ-राजकीय बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्था संघटनांचे दाखले देतात. मात्र अराजकीय राहूनच. रिपब्लिकन पक्ष, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा या संघटनांचे दाखले देऊन गळा काढणारे अनेक आहेत. पण या तिन्ही संस्थांचे संचालन कसे करायचे हे कुणीच सांगत नाही. जे समता सैनिक दल व बौद्ध महासभा राजकीय नेतृत्वात काम करतात त्यांच्याविषयी काहीही म्हणणे नाही. कारण निदान त्यांनी राजकीय नेतृत्व स्विकारले असल्याने ते राजकीय आहेत. पण काही समता सैनिक दल, बौद्ध महासभा व गल्लिबोळातल्या बौद्धपंचायती ज्यांना राजकीय चेहरा नाही अशा अ-राजकीय संघटना या आंबेडकरी चळवळीतल्या आतंकवादी संघटनाच आहेत. राजकीय नेतृत्वाशिवाय या संघटनांनी कुठली क्रांती केली याचा सोशल ऑडीट केले तर लक्षात येईल की हे अजूनही शून्यातच आहेत. परंतू राजकीय नेतृत्वाला मात्र शहाणपण शिकवायला सर्वात पूढे. यातले काही महाभाग तर इतके पुढे गेलेले की यांना समता सैनिक दल म्हणजे दुसरी आरएसएस बनवायची आहे. जी रिपब्लिकन पक्षाला व नेत्यांना आपल्या अधिपत्याखाली ठेवेल. हे सांगतिल तो आदेश रिपब्लिकन नेत्यांनी पाळावा. निवडणूक काळात या कुठे असतात ? हे कुणालाच दिसत नाही. अशा या पंगू संघटना आंबेडकरी चळवळीचे मांडलिकत्व करू शकतात का ? याचा विचार येणाऱ्या तरूण आंबेडकरी पिढीने करावा व ही अ-राजकीय मरगळ दूर करावी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरी चळवळ व आंबेडकरी विचारांचा सर्वव्यापी विचार न झाल्याने संविधान व सांसदीय लोकशाही आंबेडकरी समाजात रूढ होऊ शकली नाही. त्यातून निर्माण होणारी राजकीय भूमिका तयार होऊ शकली नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे सामाजिक, आर्थिक व राजकीय भूमिका व आंदोलने इप्सित ध्येय अद्यापही गाठू शकलेले नाही. राजकारण, राजकीय पक्ष, राजकीय नेतृत्व नाकारून पूढील २०० वर्षही या समाजाला इतरांची बरोबरी करता येणार नाही. लोकशाही व संविधान यांच्या सिद्धांत व व्यवहारात मोठा फरक आहे. सैद्धांतिक लोकशाही व संविधानाने या समाजाला उद्धीष्ट गाठता येणारे नाही. कायम या समाजाला सत्ताधाऱ्यांवर निर्भर रहावे लागेल. हे मी राज्यशास्त्राचा व कायद्याचा विद्यार्थि व अभ्यासक या नात्याने हमखास सांगू शकतो. त्यामुळे व्यावहारीक लोकशाही व संविधानाशिवाय या समाजाला विकास साध्य करता येणार नाही. व्यावहारिक लोकशाही व संविधानाचा वापर समाजोद्धारासाठी करायचा असेल तर राजकारणाशिवाय, एक पक्ष, एक विचार, एक नेतृत्व याशिवाय पर्याय नाही. राजकीय भूमिका घेऊनच आम्ही आपला समाजोद्धार करू शकतो या निर्णयापर्यंत आम्हाला यावेच लागेल.

आम्ही लोकशाही देशाचे नागरिक आहोत हे न विसरता राजकीय भूमिका घ्याविच लागेल. राजकीय भूमिका किंवा राजकारण नाकारणे म्हणजे मतदार असण्याचा व मतदानाचा अधिकार नाकारणे. मताधिकार नाकारणे म्हणजे लोकशाही व संविधान नाकारणे. व हे नाकारणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाकारणे होय. हे स्पष्टपणे तमाम अ-राजकीय मान्य करतील का ? राजकीय भूमिका घेतल्याशिवाय आता तरणोपाय नाही. कुठलाही राजकीय पक्ष, नेतृत्व का असेना, कुठलीही का असेना पण प्रत्येकाने एक राजकीय भूमिका घेऊन समाजापुढे, आपल्या कार्यक्षेत्रात, आपल्या वलयाभोवती रेटून धरावी. एवढीच एक भाबडी इच्छा. एकदिवस आंबेडकरी चळवळ राजकिय रित्या सक्षम दिसेल. फक्त हे करीत असतांना आंबेडकरी विचार, त्या विचारांवर चालणारे वर्तमान नेतृत्व व पक्ष यांचा परिपूर्ण अभ्यास करून. (कुणीच नाही अशी आगीची शेकोटी न पेटविता) कॉग्रेस, बिजेपी निवडली तरी चालेल पण स्वतःच्या निवडीवर समाजात ठाम रहा एवढेच. आंबेडकरी पक्ष व नेतृत्व तुम्हाला नक्की सापडेल. व तुमची राजकीय भूमिका देखील तयार होईल. असा आशावाद आहे. जर एवढे स्पष्ट करूनही आपण राजकीय भूमिका घेण्यात अक्षम ठरत असू तर आम्ही "अ-राजकीय आंबेडकरी आतंकवादीच."

___टिप : सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असतांना आलेल्या अनुभवातली ही निरिक्षणे आपल्या पूढे मांडलित. सर्वांना लगेच पटणार नाही. पण कालांतराने नक्कीच पटेल. व परिवर्तनाला सुरवात होईल.
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर....
🔛जागृतिचा अग्नि तेवत ठेवा.🔛

Thursday, 26 May 2016

🌹🌹🌹"मार्क्सवाद किंवा गांधीवाद हा आंबेडकरवादाचा कायमचा शत्रू नाही."🌹🌹🌹

🌹🌹🌹"मार्क्सवाद किंवा गांधीवाद हा आंबेडकरवादाचा कायमचा शत्रू नाही."🌹🌹🌹

🙏आंबेडकरवादी, मॉर्क्सवादी व गांधीवादी अनुयायांनी एकदा जरूर वाचावे व पुढे प्रत्येक अनुयायांपर्यंत पाठवावे ही विनंती.🙏

डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत काही तत्कालिन प्रसंगी गांधींशी व मार्क्सवाद्यांशी मुद्यांवर संघर्ष केला असेल. त्या संघर्षाला तात्विक वा वैचारिक न समजता तो व्यावहारिक व भारतीय समाजव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वसमावेशी अंमलबजावणीसाठीचा तो संघर्ष होता असे मी समझतो. तेव्हाच्या सामाजिक व राजकीय व्यवस्थेत व आजच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. तेव्हा गांधींचा संघर्ष राजकीय होता तर मार्क्सवाद्यांचा संघर्ष आर्थिक होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा सामाजिक, आर्थिक व राजकीय अशा तिन्ही पातळ्यांवरचा होता. म्हणूनही कदाचित या तिन्ही विचारात एकवाक्यता दिसून येत नव्हती व क्वचितप्रसंगी खटके उडायचे. पण डॉ. बाबासाहेबांना या देशाचे संविधान बनविण्याची संधी उपलब्ध झाल्याने या तिन्ही विचारातला संघर्ष त्यांनी संविधानाच्या माध्यमातून कायमचा मिटविला असे मी मानतो.

परंतु अनुयायांच्या (आंबेडकरवादी, मार्क्सवादी, गांधीवादी) हे लक्षात न आल्याने मागच्या ६५ वर्षात या विचारधारांमधला संघर्ष त्यांच्या त्यांच्या अनुयायांनी कायम ठेवला. हा विचारधारांमधला संघर्ष अनुयायांमधल्या संघर्षापर्यंत पोहचला व पराकोटीला गेला. ज्यामुळे सर्वसमावेशक समाजकारण, अर्थकारण, राजकारण तिन्ही विचारधारेच्या अनुयायांना करता आले नाही. ही वास्तविकता मान्य करावी लागेल. आंबेडकरवादी सामाजिकरण व राजकारणात लढत राहीले. तर मार्क्सवादी अर्थकारणासाठी लढत राहीले, तर तिकडे गांधीवादी फक्त सत्तेसाठी व सत्ता टिकविण्यासाठी राजकारण करीत राहीले. चूक प्रत्येकाकडून झाली आहे. दुर्लक्ष प्रत्येकाकडून झालेले आहे. व त्याचा लाभ आरएसएस ने घेऊन बिजेपी च्या रूपाने अगदी अल्पावधीतच एकहाती सत्ता मिळवून सगळ्याच मान्यतांना संपविण्याचा चंग बांधलेला आहे. हे आपण लक्षात घेणार आहोत का ? आरएसएस चे उधाणलेले घोडे व बिजेपीचे सैराटलेले सांड आम्हाला थांबवायचे असतील तर तिन्ही विचारधारांना मंथन करण्याची गरज आहे.

आज मार्क्सवादी शेवटच्या घटका मोजित आहेत. गांधीवादी सत्तेच्या मग्रुरीतून बाहेर पडायला लागले आहेत. कॉग्रेस मुक्त भारताच्या नाऱ्याने गांधीवाद्यांनी नांग्या टाकायला सुरवात केली आहे. तर इकडे आंबेडकरवादी दिशाहीन व भरकटलेल्या अवस्थेत स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत आहेत. तरीही तिन्ही आपल्यातला संघर्ष मिटवायला तयार नाहीत. त्यातही काही दिडशहाणे अनुयायी हा संघर्ष वारंवार पुढे करू पाहात आहेत. यांना वेळीच आवर घालायचा की नाही हा प्रश्न आज चळवळीपुढे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोहीया, डांगे, जोशी यांना लिहीेलेले पत्र आठवा. त्यांनी सर्वसमावेशकतेची घेतलेली भूमिका आठवा. त्यांनी भविष्यातल्या धोक्याला किती चपखल ओळखले होते ते आठवा. व सर्वसमावेशकतेची कास धरा. आज सुवर्णसंधी तुमच्या दारात येऊन ठेपली आहे. प्रत्येकांचा संघर्ष अस्तित्वाचा झालेला आहे. हीच वेळ आहे. व काळही पूरक आहे.

आज मार्क्सवादी नेतृत्वाच्या शोधात आहेत पण राष्ट्रीय पातळीवर सर्वसमावेशक नेतृत्व सापडत नाही. गांधीवादी घराणेशाहीच्या पाठीशी उभे असतांना घराण्यात देशातील जनतेला अपिल होईल असे नेतृत्व दिसत नाही. त्यामुळे नेतृत्वासाठी अंतर्गत संघर्ष अधूनमधून पुढे येतोच. तर इकडे आंबेडकरवाद्यांना नेतृत्वहीन बनविण्यात प्रतिगामी यशस्वी झाले आहेत. नेतृत्वाविषयीचा पराकोटीचा तिरस्कार आंबेडकरवाद्यांमध्ये दृढ बनविला गेला आहे. अशा परिस्थितीत अॅड. प्रकाश आंबेडकर (घराणेशाहीला बाजूला ठेऊन) सर्वव्यापक व सर्वसमावेशक भूमिका घेत आहेत. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संकल्पलेली १९५४ मधील भूमिका घेऊन. बिहार राज्यातल्या निवडणूका जिंकण्यात व नितीश कुमारची सत्ता बसविण्यात अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका महत्वाची राहीलेली आहे. अनेकांना हे माहीत नसेल. पण हे वास्तव आहे.  गांधीवादी असो, मॉर्क्सवादी असो वा इकडे आंबेडकरवादी असो, कुणीही त्यांच्या भूमिकेच्या विरोधात जातांना दिसत नाहीत. त्यांच्या भूमिकेच्या समर्थनातच आजतरी वरील सर्वच अनुयायी पाठीशी आहेत.

अशा परिस्थितीत आपआपसातील संघर्ष बाजूला सारून एकत्र येऊन कॉमन मिनिमम प्रोग्राम हाताशी धरून आरएसएस ते उधाणलेले घोडे व बिजेपीचे बेलगाम सैराटलेले सांड आपल्याला रोखता येतील. इतिहासातला संघर्ष वर्तमानात चुरगाळत राहीलात तर फक्त जखमच (ईजा) हातात येईल. ईतिहासातल्या जखमा भरून निघाल्या आहेत. त्यांना कृपा करून परत जिवंत करू नका किंवा जिवंत ठेवण्याचाही प्रयत्न करू नका. नवा काळ व भविष्याचा इतिहास परत एकदा तुमची वाट बघत आहे. एकत्र येऊन संवैधानिक राजकीय लढाईला सज्ज व्हा. आपल्या सर्वांचे सेनापतित्व अॅड. प्रकाश आंबेडकर हे करतील की अन्य कोण करेल हे हल्लीच न ठरवता कॉमन मिनिमम प्रोग्राम बिहारच्या धर्तीवर पून्हा आखण्याची गरज आहे.

भविष्यात पून्हा आंबेडकरवादी, गांधीवादी व मार्क्सवादी असा संघर्ष उभा राहणार नाही किंवा तसा संघर्ष त्यांच्या अनुयायांकडून उभा केला जाणार नाही या अपेक्षेत....
___आपलाच____
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर....
________भारिप_______
👉🙏हा मॅसेज प्रत्येक आंबेडकरवादी, गांधीवादी व मॉर्क्सवादी अनुयायांपर्यंत पोहचवा व फॉरवर्ड करून नव्या भारताच्या भविष्याला हातभार लावा.👈🙏

Sunday, 20 March 2016

देश अराजकतेच्या दिशेने..."बोलो गर्व से हम देशद्रोही है"



देश अराजकतेच्या दिशेने..."बोलो गर्व से हम देशद्रोही है"

हिंदुत्ववादी, आरएसएस, बिजेपीच अराजकतावादीे प्रयोग यशस्वी होतील की नाही याची पर्वा न करता त्यांनी शंखनाद केला. देशातील साऱ्या पुरोगाम्यांना बाजूला सारून हिंदूत्ववाद्यांना एकत्र करण्याचा प्रयोग केला. देशातील वेगळा विचार करणारे सर्व पूरोगामी देशोद्रोही ठरविण्याचा प्रयोग केला. व पूरोगाम्यांची शक्तीही विभागली. जेएनयू मधील कन्हैय्या चे कथीत देशद्रोही प्रकरण पुढे आणले. मुळात हैद्राबाद मधील रोहीत वेमुला प्रकरणाचा दूसरा टप्पा जेएनयू मधून त्यांनी पूढे रेटला. व अतिशय शिताफीने रोहीत प्रकरणातील आंदोलनकर्त्यांमध्ये रोहीत प्रकरणाला दडपण्यासाठी कन्हैय्या जेएनयू प्रकरण पुढे केले असा प्रचार व प्रसार केला. या प्रचाराला बळी पडून रोहीत आंदोलनकर्त्यांत संभ्रम तयार होऊन कन्हैय्या प्रकरणाला ते रोहीत प्रकरणाशी कनेक्ट न करता जेएनयू प्रकरणातून अलिप्त राहीले. त्यांची ही अलिप्तता पून्हा आरएसएस व बिजेपी ला लाभदायक ठरली. या दोन्ही प्रकरणातील काही तार्कीक मुद्दे समजून प्रतिक्रांती ला समजून घेतल्याशिवाय आंदोलन पूढे रेटता येणार नाही.
१) रोहीत खून प्रकरणाने सरकारी दडपशाही पूढे आली. विद्यार्थी तरूण वर्ग सरकारच्या विरोधात रस्त्यावर आला. त्याला विचलीत करण्याचा प्रयत्न केला गेला.
२) रोहीत व कन्हैय्या (हैद्राबाद व जेएनयू) दोन्ही प्रकरणात देशद्रोही कार्यवाह्या असा समान धागा पकडण्यात आला.
३) रोहीत प्रकरणात देशद्रोही कार्यवाह्या सिद्ध करता आल्या नाही म्हणून रोहीतच्या खूनाच्या विरोधात सरकारच्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या जेएनयू तील स्कॉलर आंबेडकरी व मॉर्क्सवादी विद्यार्थ्यांच्या माथी देशविरोधी नारे मारून त्यांना देशद्रोही कसे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला.
४) दलित, मुस्लीम यांना देशद्रोही ठरविण्यासोबतच मॉर्क्सवादी व आंबेडकरवादी विचारांनाही देशद्रोही ठरविण्याचा व तशी मानसिकता तयार करण्याचा प्रयोग झाला.
५) सरकारी निर्णय व कार्यवाह्यांच्या विरोधात जाणारे देशद्रोही व अन्य देशभक्त असा भेद रचला गेला.
६) थंड झालेल्या एबीविपी ला सक्रीय  करून मद्रास, हैद्राबाद, दिल्ली येथे नेतृत्वाची संधी दिली. त्याच्यात जहाल हिंदूत्ववाद निर्माण करून विद्यार्थी व तरूण वर्गाला पुढच्या सामाजिक लढाईत उतरविले गेले.
७) मिडीया व तत्सम माध्यमातून रोहीत, कन्हैय्या प्रकरणाचा निषेध करणाऱ्या तमाम नेत्यांना, कार्यकर्त्यांना, विचारकांना देशविरोधी म्हणून देशासमोर मांडले गेले.
८) रोहीत व कन्हैय्या प्रकरणाला वेगवेगळे करून समविचारी कार्यकर्त्यांमध्ये उघड फूट पाडण्यात आली.
९) देशहिताच्या नावावर वैचारीक स्वातंत्र्याची गळचेपी करून अघोषीत आणिबाणी लावली गेली आहे.
१०) पुढल्या काही वर्षात आरएसएस व भाजपला जे काही करायचे आहे त्याचा प्राथमिक प्रयोग व मानसिकीकरणाला सुरवात केली गेली.
११) पुढील काळातील षडयंत्राची पार्श्वभूमी तयार करून आराखडा आखण्यात आला आहे. इ. इ.
      पुढील काळात अनेक गोष्टी पुढे येतील. अशा परिस्थितीत पुरोगामी कार्यकर्त्यांना विनंती आहे की रोहीत व कन्हैय्या प्रकरणाला वेगवेगळे न समजता एकत्रीत लढले पाहीजे. रोहीत प्रकरणाच्या पार्श्वभूमिवरच कनैय्या प्रकरण निर्माण केले गेले आहे. सद्या सोशल मिडीया वरून वायरल होणाऱ्या विडीयो वरून याची सत्यता पडताळून पाहता येईल. रोहीत प्रकरण व त्याविषयीचे आंदोलन कन्हैय्याच्या त्या सर्व विडायोमधून दिसत आहे. त्यामुळे षडयंत्र ओळखून संघटीत लढाईला सज्ज रहा. आता तर या सरकारने ठरविलेल्या सर्वच देशद्रोह्यांना न्यायालयाने निर्दोश ठरविले आहे.

🔛🔛🔛दि. २३ फेब्रूवारी २०१६ ला दिल्लीला झालेल्या मोर्चात मा. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्नात मोठ्या संख्येने तरूण सहभागी झाला व  या सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात ताकत निर्माण केली. ही ताकत टिकवून ठेवा कारण परत एकदा राष्ट्रवादाचा सूर आळवला जात आहे. सावधान व्हा !🔛🔛
दि. २०/०३/२०१६
...अँड. डॉ. संदीप नंदेश्वर...

Saturday, 19 March 2016

शेतकरी व सामान्य माणसांनी फसविणारा अर्थसंकल्प

💸💸शेतकरी व सामान्य माणसांनी फसविणारा अर्थसंकल्प💸💸
...🌟Adv. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर

💸महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करून शेतकरी व सामान्य माणसांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. व शेतकरी व सामान्य माणसांच्या तोंडाला पाने पूसली.💸

💸💸२५,००० कोटी शेतकऱ्यांसाठी, ७८५० कोटी सिंचनासाठी, २००० कोटी शेततळ्यांसाठी, १,००० कोटी पिक विमा योजनेसाठी इ. आकडे फुगवून मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी आत्महत्या कशा थांबतील यावर कुठलाही विचार झालेला नाही. सावकारी जाचातून शेतकरी कसा मुक्त होईल याचाही विचार झालेला नाही. एकंदरीतच शेतकऱ्यांचे दुःख वाऱ्यावर ठेऊन या सरकारच्या अर्थसंकल्पाचा फुगा फूटला आहे.💸💸

💸💸💸सामाजिक न्याय व शिक्षण याविषयी हा अर्थसंकल्प निराश करणाराच नव्हे तर सरकारची सामाजिक न्याय व मागासवर्गिय विद्यार्थ्यांविषयी दूजाभाव करणारी मानसिकता सिद्ध करणारा ठरलेला आहे. ४०५ कोटी रू. फक्त मागासवर्गिय व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तरतूद करून मागासवर्गिय विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले. फक्त ४०५ कोटी रू. ची तरतूद राज्यातील ८०% समाजातील विद्यार्थ्यांसाठी करून मागासवर्गिय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत नकारात्मकताच या सरकारने दाखविली आहे. गरज नसतांना १७० करोड जन्मशताब्दी वर्षासाठी उधळण्याची गरज नव्हती त्याएेवजी आमदार निधीतून तो खर्च करण्यास बाध्य करून हेच १७० कोटी रू. मागासवर्गिय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केले असते तर अधिक स्वागतार्ह ठरले असते.💸💸💸

💸💸💸💸अंगणवाडी सेविकांना २ लाख रू. जिवन विमा व २ लाख रू. अपघात विमा दिला तशीच तरतूद शेतकऱ्यांसाठी केली असती तर बरे झाले असते. पण त्यावर हा अर्थसंकल्प व सरकार गप्प आहे. उलट तसे न करता या सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास मोकळे सोडले आहे.💸💸💸💸

💸💸💸💸💸मराठवाडा व विदर्भातील उद्योगांना २००० कोटी रू. तरतूद केली परंतू मागासवर्गिय उद्योगांच्या तोंडावर पाने पूसली आहेत. विदर्भाच्या नावाने केलेली ही तरतूद प्रत्यक्षात कधीच खर्च केली जात नाही. विदर्भातील ज्या उद्योगांनी सरकारकडे आधीच मागणी केली आहे. त्या उद्योगांबाबत हा अर्थसंकल्प काहीच बोलायला तयार नाही.
🌟विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याबाबतही या अर्थसंकल्पात काहीच नाही.
🌟तसेच या सरकारने सामाजिक न्याय तर वाऱ्यावरच सोडले आहे.
🌟भाकड जनावरांच्या संगोपनावर केलेली १८ कोटी ६३ लाख रू. केलेली तरतूद स्वतःहून ओढवून घेतलेली उधळपट्टी आहे. त्यापेक्षा गोहत्या बंदीच उठवली असती तर १८ कोटी ६३ लाख वाचविता आले असते.
🌟शेतकऱ्यांना पैसे कमी पडणार नाही. असे म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का ?
🌟फक्त १० कोटी रू. महीला सक्षमीकरणासाठी तरतूद करून महीलांनासुद्धा या सरकारने सापत्नुक वागणूक दिली आहे.

💸💸💸एकंदरीतच ही अर्थसंकल्प अंधारात चाचपडत जाऊन कुठेतरी धडपडत जाऊन आपटला आहे. अविवेकी, दिशाहीन, अदूरदर्शी असाच हा अर्थसंकल्प आहे असेच म्हणता येईल.💸💸💸
...🌟Adv. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर🌟

Saturday, 13 February 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता (Dr. B. R. Ambedkar & Secularism)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता
(Dr. B. R. Ambedkar & Secularism)

भारताच्या संविधानकारांनी या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी पाहिलेले स्वप्न व त्यासाठी घेतलेली मेहनत पराकोटीची होती. धर्म, भेद, भाषा, संस्कृती मध्ये विभागलेल्या प्रदेशाला एक राष्ट्र म्हणून एकरूप बनविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. व संविधानकारांनी ते आव्हान लीलया पेलून या देशाला जगातील सर्वोत्तम असे संविधान दिले. हे संविधान तयार करीत असतांना संविधान सभेत अनेक वादविवादाचे प्रसंग निर्माण झाले, भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील “धर्मनिरपेक्ष व समाजवाद” या संकल्पनांचा समावेश करण्यावरून झालेली चर्चा व असे अनेक उदाहरणे देता येतील. परंतु त्यातूनही सर्वोत्तम निकष बाहेर पडून या देशाचे संविधान तयार झाले.  
धर्मनिरपेक्ष हा शब्द हल्लीचा अतिशय वादाचा मुद्दा ठरला आहे. हल्लीची सरकार आणि त्या सरकारच्या पाठीमागे असलेली आरएसएस या शब्दाला कडाडून विरोध करतांना दिसून येत आहे. संसदेमध्येही यावर वादळी चर्चा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत "धर्मनिरपेक्ष" या शब्दाला केलेल्या विरोधाचे दाखले पण देण्यात आले. परंतू त्यामागील त्यांच्या भूमिकेकडे जाणिपूर्वक दुर्लक्ष केल्या गेले. नुकत्याच २६ नोव्हेबर ला साजरा करण्यात आलेल्या संविधान दिनानिमित्त सरकारतर्फे संविधानाची प्रस्ताविका पेपरमधल्या जाहीरातीतून प्रसिद्ध करण्यात आली. त्यात राज्य सरकार व केंद्र सरकारने जाणिवपूर्वक "धर्मनिरपेक्ष" या शब्दाऐवजी "पंथनिरपेक्ष" या शब्दाचा वापर केला. तर काही ठिकाणी “धर्मनिरपेक्ष व समाजवादी” हे दोन शब्द वगळून मूळ संविधानाची प्रस्थाविका प्रकाशित करण्यात आली. यावरून सरकारचा धर्मनिरपेक्षतेविषयीचा हेतू आपल्या लक्षात येतो. आरएसएस ला प्रस्थापित सरकारच्या माध्यमातून भारताला हिंदू राष्ट्र घोषीत करायचे आहे असे दिसून येते. परंतु प्रस्ताविकेतील "धर्मनिरपेक्ष" हा शब्द त्यांच्या हिंदू राष्ट्र निर्मितीच्या मार्गातील अडथळा ठरतो आहे. या वास्तव परिस्थितीला लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मनिरपेक्षता हा विषय गांभिर्यपूर्वक लक्षात घेणे गरजेचे आहे.
15th November 1949 in the constituent assembly prof. K. T. Shah moved a resolution for include ‘secular federal socialist’ in article 1 of constitution. Prof. K.T. Shah wants “union shall be a federal, secular, socialist Union of states.”
15 नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेत प्रो. के. टी. शहा यांनी धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे दोन शब्द अंतर्भुत करण्यासाठी ठराव मांडला. प्रो. के. टी. शहा म्हणतात, K.T. Shah Said, “…as it is, in suggesting this amendment, I am anxious to point out that this is not only a statement of fact as it exists, but also embodies an aspiration which it is hoped will be soon realized.  The amendment tries to add three words to the descriptions of our state or union : that is to say, the new union shall be a federal, secular, socialist union of states.”  Further “…as regards the secular character of the state, we have been told time and again from every platform, that ours is a secular state.  If that is true, if that holds good, I do not see why the term could not be added or inserted in the constitution itself, once again, to guard against any possibility of misunderstanding or misapprehension.  The term ‘secular’, I agree, does not find place necessarily in constitutions on which ours seems to have been modelled.  But every constitution is framed in the background of the people concerned.  The mere fact, therefore, that such description is not formally or specifically adopted to distinguish one state from another, or to emphasis the character of our state is no reason, in my opinion, why we should not insert now at this hour, when we are making our constitution, this very clear and emphatic description of that state.  The secularity of the state must be stressed in view not only of the unhappy experiences we had last year and in the years before and the excesses to which, in the name of religion, communalism or sectarianism can go, but I intend also to emphasis by this description the character and nature of the state which we are constituting today, which would ensure to all its peoples, all its citizens that in all matters relating to the governance of the country and dealings between citizen and government the consideration that will actuate will be the objective realities of the situation, the material factors that condition our being, our living and our acting.  For that purpose and in that connection no extraneous considerations or authority will allowed to interfere, so that the relation between man and man, the relation of the citizen to the state, the relations of the states inter se may not be influenced by those other considerations which will result in injustice or inequality as between the several citizen that constitute the people of India”.
प्रोफ. के. टी. शहा संविधान सभेत केलेल्या भाषणात म्हणतात, “आपण जे संविधान तयार करीत आहोत त्या संविधानाच्या चौकटीत धर्मनिरपेक्ष शब्दाला कुठेही स्थान देता येणार नाही हे सत्य आहे. परंतु कुठल्याही संविधानाचा आराखडा हा त्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या मान्यतेनुसार तयार व्हावा.  मागील काही वर्षातील धर्मांधतेचे, संप्रदायवादाचे आणि वर्गवादाचे जे काही वाईट अनुभव आले आहेत आणि जे भविष्यातही येण्याची संभावना आहे त्या आधारावर राज्याच्या धर्मनिरपेक्षतेला आम्ही महत्व दिले पाहिजे. भारतीय संविधानाचे जे स्वरूप व वैशिष्टे आम्ही आज तयार करीत आहोत त्यात धर्मनिरपेक्षता स्वीकारली गेली तर व्यक्ती व्यक्ती, नागरिक व शासन यांच्या जगण्यात व व्यवहारात धर्मनिरपेक्षतेला मान्यता प्रदान करता येईल. ज्यामुळे कुठल्याही सरकारला किंवा कुठल्याही व्यक्तीविशेषाला नागरिकांवर धार्मिक वा सांप्रदायिक प्रभाव टाकता येणार नाही.  याचा परिणाम असा होईल कि देशातल्या नागरिकांनी जे संविधान तयार केले त्या नागरिकांमध्ये आपापसात अन्याय व असमानतेची भावना निर्माण होणार नाही.”
प्रो. के. टी. शहा यांच्या प्रस्तावाला नाकारतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, Sir, I regret that, I cannot accept the amendment of prof. K. T. Shaha.  My objections stated briefly are two.  In the first place, the constitution as I stated in my opening speech in support of the motion I made before the house is merely a mechanism for the purpose of regulating the work of the various organs of the state.  It is not the mechanism whereby particular member or particular parties are installed in office.  What should be the policy of the state?  How the society should be organized in it social and economical sides are matters which must be decided by the people themselves according to time and circumstances.  It cannot be laid down in the constitution itself, because that is destroying democracy altogether.  If you state in the constitution that the social organization of the state shall take a particular form, you are, in my judgment, taking away liberty of the people to decide what should be the social organization in which they wish to live.  It is perfectly possible today, for the majority people to hold that the socialist organization of society is better than the capitalist organization of society.  But it would be perfectly possible for thinking people to devise some other form of social organization which might be better than the socialist organization of today or of tomorrow.  I do not see therefore why the constitution should tie down the people to live in a particular form and not live it to the people themselves to decide it for themselves.  This is one reason why the amendment should be opposed.  The second reason is that the amendment is purely superfluous.  My hon’ble friend prof. shaha does seem to have taken into account the fact that apart from the fundamental rights, which we have embodied in the constitution, we have also introduced other sections which deal with directive principles of policy.  If my hon’ble friend where to read the article contents in part IV, he will find that both the legislature as well as the executive have been placed by this constitution under certain definite obligation as to the form of their policy.  Now, to read only article 31, which deal with this matter.  It says the state shall in particular direct its policy towards securing – i) that the citizens men and women equally have the right to an adequate means of livelihood.  ii)  that the ownership and control  of the material resources of the community are so distributed as best to sub serve the common good.  iii)  that the operation of the economic system does not result in the concentration of wealth and means of production to the common detriment.  iv)  that there is equal pay for equal work for both men and women.   There are some other items more or less in the same strength.  What I would like to ask prof. shah is this, if these directive principles to which I have drawn attention are not socialistic in their direction and in their containt, I fail to understand what more socialism can be.  Therefore my submission is that, these socialist principles are already embodied in our constitution and it is unnecessary to accept this amendment.
डॉ. बाबासाहेब म्हणतात, "भारतीय संविधान हे कुण्या एका राजकीय पक्षाला किंवा धर्माला किंवा विशिष्ट समुदायाला लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले नाही. भारतीय संविधान हे असे mechanism आहे जे शासनाच्या व राज्याच्या विभिन्न अंगामध्ये चालणाऱ्या कार्याला नियंत्रीत ठेवणारे आहे. संसदेत विशिष्ट व्यक्ती वा पक्षाला प्रस्थापीत करणारे हे mechanism नाही. किंवा त्यासाठी या देशाचे संविधान तयार करण्यात येत नाही.  राज्याचे धोरण काय असेल व समाज त्याच्या सामाजिक व आर्थिक उद्धीष्टासाठी कशाप्रकारे संघटीत होईल, हे त्या त्या वेळेच्या परिस्थितीवर निर्भर करेल. हे आताच भारतीय संविधानात समाविष्ट करणे म्हणजे भारतीय लोकशाहीला आताच संपविणे असे होईल.  जर राज्यातल्या सामाजिक संघटनांनी कुठली एक विशिष्ट प्रणाली स्विकारली पाहीजे हे आजच संविधानात अंतर्भुत करणे म्हणजे माझ्या दृष्टीने सामाजिक संघटनांचे स्वातंत्र्य हिरावून घेणे असे होईल. अशा स्थितीत नागरिकांना कसे जगायचे आहे हे संविधानाने बंधिस्त न करता त्यांना त्यांनी ठरविल्याप्रमाणे जगू द्यावे. असे मला वाटते. संविधानात समाविष्ट मुलभूत अधिकार व राज्यनितीची मार्गदर्शक तत्वे लक्षात घेतली तर येणाऱ्या सरकारला आम्ही धोरण निश्चितीसाठी उत्तरदायी बनविले आहे. त्यामुळे यापेक्षा समाजवादाचे दुसरे रूप कुठले असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे प्रो. के. टी शहा यांनी मांडलेल्या ठरावाला माझा विरोध आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रनिष्ठा व देशातील नागरिकांवर असलेला विश्वास उच्चकोटीचा होता हेच यातून दिसून येते.  कायद्याची बंधने लादून समाज नियंत्रीत करण्यापेक्षा समाजाला मुलभूत स्वातंत्र्य बहाल करून शासनाला नागरिकांसाठी कल्याणकारी धोरण आखण्यास बाध्य करणे, यावर त्यांचा विश्वास होता. धर्मासाठी माणूस नसून माणसासाठी धर्म आहे. त्यामुळे स्वतंत्र संविधानिक भारतात धर्मवाद, पंथवाद राहणार नाही असे त्यांना वाटत होते. सरकार अशा कुठल्याही धर्मवादाला व पंथवादाला प्रोत्साहन देणार नाही अशी त्यांची अपेक्षा होती. व जनता अशा लोकांना किंवा पक्षाला किंवा संघटनांना थारा देणार नाही यावर त्यांचा विश्वास होता. परंतु कालौघात त्यांचा अपेक्षाभंग झाला. याचे मोठे उदाहरण द्यायचे झाले तर "हिंदू कोड बिल" पारित होण्यास इथल्या धर्मवाद्यांनी केलेला विरोध व त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला कायदामंत्री पदाचा राजिनामा हे होय.
भारतीय समाजात धर्मांधता पराकोटीची असतांना बदललेल्या परिस्थितीला अनुसरूण समाजपरिवर्तनाची अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती. त्यात त्यांचा उदात्त हेतू होता. परंतू त्यांच्या उदात्त हेतूला इथल्या राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी व प्रत्यक्ष जनतेनेही लक्षात घेतले नाही. लोकशाहीतून समतामुलक समाज निर्मितीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कल्पना आम्ही मोडीस काढली. त्याचेच परिणामस्वरूप आजही आम्ही समाजात धार्मिक तेढ वाढतांना पाहत आहोत.
देशातल्या सामाजिक व राजकीय संघटनांची धर्मांधता पराकोटीला जातांना पाहून १९७६ ला ४२ व्या संविधान संशोधनाने भारतीय संविधानाच्या प्रस्तावणेत "धर्मनिरपेक्ष व सामाजवाद" या दोन शब्दांचा अंतर्भाव करण्यात आला. परंतु आजही त्यामागचा हेतू पुर्णत्वास आलेला नाही.  त्याची काही उदाहरणे द्यायची झाली तर आषाढी एकादषीच्या दिवशी "पंढरीच्या विठ्ठलाची" शासकीय पुजा केली जाणे व राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हाताने प्रथम पूजा करणे किंवा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असतांना राष्ट्रपतीच्या बंगल्यात गणपतीची प्रतिष्ठापणा होणे व गणेशोत्सव साजरा होणे किंवा हल्लीच्या सरकारचे मुस्लीमद्वेषी, दलितद्वेषी वक्तव्ये ही सर्व उदाहरणे संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्वाला छेद देणारी आहेत. त्यामुळे संविधानात एखादे विशिष्ट तत्वाचा अंतर्भाव केल्याने किंवा दुरूस्ती करून ते बंधनकारक केल्याने बदल घडून येतो असे दिसून येत नाही.
२५ नोव्हेबर १९४९ ला संविधानसभेला संविधान सुपूर्द करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य यादृष्टीने लक्षात घेणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "अतिशय महत्प्रयासाने तयार केलेल्या या भारतीय संविधानाचे यशापयश हे निव्वळ संविधानावर अवलंबून राहणार नाही. संविधानाचे यशापयश हे संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यकर्त्यांवर अवलंबून राहील. संविधान कितीही चांगले असले तरी त्या संविधानाची अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते योग्य नसतील तर महत्प्रयासाने तयार केलेल्या संविधानाचा हा डोलारा भविष्यात कोलमडून पडेल." डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विधान आज आपणा सर्वांसाठी एक संदेश देणारे आहे. ज्या राज्यकर्त्यांची निवड आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून करतो ते राज्यकर्ते योग्य नसतील तर "धर्मनिरपेक्षते"सारखे कितीही डोलारे उभे करून आम्ही धर्मवादाला रोखण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. तो कोलमडून पडेलच. लोकशाहीत अंतिम सार्वभौम सत्ता जनतेत निहीत आहे. ती जनता व लोकशाहीतील नागरीक जागृत नसतील, ती जागरूकता त्यांच्यात नसेल तर कायद्याचा वापर व अंमलबजावणी करणारे हे स्वतःच्या स्वार्थासाठी व फायद्यासाठीच कायद्याचा वापर करतील.  व सामान्य जनता, नागरिक हे न्यायापासून वंचितच राहतील. धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीतही हेच घडले व घडत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धर्मवादी की धर्मद्वष्टे, धर्मद्वेषी की धर्मनिरपेक्ष हे सिद्ध करू पाहणारे दोन वर्ग समाजात काम करीत आहेत. महापूरुषांच्या विचारांचा स्वतःच्या निहीत स्वार्थासाठी वापर करू पाहत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत तर हे नेहमीच निदर्शास येते. राष्ट्रभक्त, समाजप्रेमी, पराकोटीचे मानवतावादी, समतावादी या अंगाने बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार केल्यास त्यांचे विचार वर्तमानाला दिशादर्शन करतांना दिसून येतील. नुकतेच पाश्च्यात्य लेखक जेफरसन यांनी इंग्रजी वृत्तपत्रात लिहीलेल्या लेखात म्हटले आहे की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र न स्विकारता व्यक्तीपरोक्ष व घटनापरोक्ष स्विकारले गेले आहेत. त्यामुळे जगातल्या या सर्वोच्च संविधानकाराच्या विचारांचा भारताला लाभ घेता आला नाही." आम्ही एखाद्या विचाराला कसे स्विकारतो व कसे अंगिकारतो त्यावर त्या विचाराचे लाभ निदर्शनास येत असतात. भारताला व भारतीय समाजाला अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. त्यांनी संविधानात समाविष्ट केलेल्या धर्मनिरपेक्ष तत्वांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. Social, economic and Political JUSTICE and EQUALITY of status and opportunity, LIBERTY of thoughts, expression, belief, faith and worship यात निहीत असलेली धर्मनिरपेक्षता  समाजात वृद्धींगत करणे गरजेचे आहे. त्यासोबतच मुलभूत अधिकारात समाविष्ट कलम १४, १५, १६, १७, १८,१९, २३, २४, २५ यातील उद्देशही धर्मनिरपेक्ष समाजनिर्मिती हाच आहे. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धार्मिक कायद्यांपेक्षा uniform civil code ला प्राधान्य देणारे होते. घटनेच्या कलम ४४ अनुसार त्याचा स्पष्ट उल्लेखही केला गेला आहे कि देशातल्या नागरिकांसाठी uniform civil code तयार करण्याची जबाबदारी ही सरकारची राहील.
त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानात आवश्यक वाटत होता की, त्यांचा त्या शब्दाला विरोध होता याचे संविधानसभेतील दाखले देऊन संसदेत वादंग निर्माण करण्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानातील इतर कलमात समाविष्ठ असलेल्या धर्मनिरपेक्ष तत्वांचा अंगिकार करून भारताला एकसंघ ठेवणे हेच सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. आजही संविधानातील निहीत धर्मनिरपेक्ष तत्वांची व त्यांच्या अंमलबजावणीची प्रकर्षाने गरज आहे हेच यातून दिसून येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मचिकित्सा ही एखाद्या विशिष्ट धर्म, पंथ, संप्रदायाच्या पलीकडली होती.  त्यांचे धर्मचिकित्सेबद्दलचे विचार आकलनापलीकडे आहे. त्याचे आकलन करून घ्यायचे असेल तर निरपेक्ष भावनेतूनच ते समजून घेता येईल.  व त्यावरच या देशाचे भवितव्य निर्भर करेल.
"आज धर्मनिरपेक्षता की बात हूई,
कल संविधान की बात होगी,
विषमता और सामाजिक भेदाभेद को चूर चूर करना
लोकतंत्र की गहराई और जनता पर निर्भर होगा
जब तुम और मै मानवता की गुहार लगाएंगे,
तभी स्वातंत्र्य, समता, न्याय और बंधूता की सही पहचान होगी"
*********
Adv. डॉ. संदीप नंदेश्वर

८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१.