देश अराजकतेच्या दिशेने..."बोलो गर्व से हम देशद्रोही है"
हिंदुत्ववादी, आरएसएस, बिजेपीच अराजकतावादीे प्रयोग यशस्वी होतील की नाही याची पर्वा न करता त्यांनी शंखनाद केला. देशातील साऱ्या पुरोगाम्यांना बाजूला सारून हिंदूत्ववाद्यांना एकत्र करण्याचा प्रयोग केला. देशातील वेगळा विचार करणारे सर्व पूरोगामी देशोद्रोही ठरविण्याचा प्रयोग केला. व पूरोगाम्यांची शक्तीही विभागली. जेएनयू मधील कन्हैय्या चे कथीत देशद्रोही प्रकरण पुढे आणले. मुळात हैद्राबाद मधील रोहीत वेमुला प्रकरणाचा दूसरा टप्पा जेएनयू मधून त्यांनी पूढे रेटला. व अतिशय शिताफीने रोहीत प्रकरणातील आंदोलनकर्त्यांमध्ये रोहीत प्रकरणाला दडपण्यासाठी कन्हैय्या जेएनयू प्रकरण पुढे केले असा प्रचार व प्रसार केला. या प्रचाराला बळी पडून रोहीत आंदोलनकर्त्यांत संभ्रम तयार होऊन कन्हैय्या प्रकरणाला ते रोहीत प्रकरणाशी कनेक्ट न करता जेएनयू प्रकरणातून अलिप्त राहीले. त्यांची ही अलिप्तता पून्हा आरएसएस व बिजेपी ला लाभदायक ठरली. या दोन्ही प्रकरणातील काही तार्कीक मुद्दे समजून प्रतिक्रांती ला समजून घेतल्याशिवाय आंदोलन पूढे रेटता येणार नाही.
१) रोहीत खून प्रकरणाने सरकारी दडपशाही पूढे आली. विद्यार्थी तरूण वर्ग सरकारच्या विरोधात रस्त्यावर आला. त्याला विचलीत करण्याचा प्रयत्न केला गेला.
२) रोहीत व कन्हैय्या (हैद्राबाद व जेएनयू) दोन्ही प्रकरणात देशद्रोही कार्यवाह्या असा समान धागा पकडण्यात आला.
३) रोहीत प्रकरणात देशद्रोही कार्यवाह्या सिद्ध करता आल्या नाही म्हणून रोहीतच्या खूनाच्या विरोधात सरकारच्या दडपशाहीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या जेएनयू तील स्कॉलर आंबेडकरी व मॉर्क्सवादी विद्यार्थ्यांच्या माथी देशविरोधी नारे मारून त्यांना देशद्रोही कसे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला.
४) दलित, मुस्लीम यांना देशद्रोही ठरविण्यासोबतच मॉर्क्सवादी व आंबेडकरवादी विचारांनाही देशद्रोही ठरविण्याचा व तशी मानसिकता तयार करण्याचा प्रयोग झाला.
५) सरकारी निर्णय व कार्यवाह्यांच्या विरोधात जाणारे देशद्रोही व अन्य देशभक्त असा भेद रचला गेला.
६) थंड झालेल्या एबीविपी ला सक्रीय करून मद्रास, हैद्राबाद, दिल्ली येथे नेतृत्वाची संधी दिली. त्याच्यात जहाल हिंदूत्ववाद निर्माण करून विद्यार्थी व तरूण वर्गाला पुढच्या सामाजिक लढाईत उतरविले गेले.
७) मिडीया व तत्सम माध्यमातून रोहीत, कन्हैय्या प्रकरणाचा निषेध करणाऱ्या तमाम नेत्यांना, कार्यकर्त्यांना, विचारकांना देशविरोधी म्हणून देशासमोर मांडले गेले.
८) रोहीत व कन्हैय्या प्रकरणाला वेगवेगळे करून समविचारी कार्यकर्त्यांमध्ये उघड फूट पाडण्यात आली.
९) देशहिताच्या नावावर वैचारीक स्वातंत्र्याची गळचेपी करून अघोषीत आणिबाणी लावली गेली आहे.
१०) पुढल्या काही वर्षात आरएसएस व भाजपला जे काही करायचे आहे त्याचा प्राथमिक प्रयोग व मानसिकीकरणाला सुरवात केली गेली.
११) पुढील काळातील षडयंत्राची पार्श्वभूमी तयार करून आराखडा आखण्यात आला आहे. इ. इ.
पुढील काळात अनेक गोष्टी पुढे येतील. अशा परिस्थितीत पुरोगामी कार्यकर्त्यांना विनंती आहे की रोहीत व कन्हैय्या प्रकरणाला वेगवेगळे न समजता एकत्रीत लढले पाहीजे. रोहीत प्रकरणाच्या पार्श्वभूमिवरच कनैय्या प्रकरण निर्माण केले गेले आहे. सद्या सोशल मिडीया वरून वायरल होणाऱ्या विडीयो वरून याची सत्यता पडताळून पाहता येईल. रोहीत प्रकरण व त्याविषयीचे आंदोलन कन्हैय्याच्या त्या सर्व विडायोमधून दिसत आहे. त्यामुळे षडयंत्र ओळखून संघटीत लढाईला सज्ज रहा. आता तर या सरकारने ठरविलेल्या सर्वच देशद्रोह्यांना न्यायालयाने निर्दोश ठरविले आहे.
🔛🔛🔛दि. २३ फेब्रूवारी २०१६ ला दिल्लीला झालेल्या मोर्चात मा. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्नात मोठ्या संख्येने तरूण सहभागी झाला व या सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात ताकत निर्माण केली. ही ताकत टिकवून ठेवा कारण परत एकदा राष्ट्रवादाचा सूर आळवला जात आहे. सावधान व्हा !🔛🔛
दि. २०/०३/२०१६
...अँड. डॉ. संदीप नंदेश्वर...
No comments:
Post a Comment