Saturday 19 March 2016

शेतकरी व सामान्य माणसांनी फसविणारा अर्थसंकल्प

💸💸शेतकरी व सामान्य माणसांनी फसविणारा अर्थसंकल्प💸💸
...🌟Adv. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर

💸महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज अर्थसंकल्प सादर करून शेतकरी व सामान्य माणसांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. व शेतकरी व सामान्य माणसांच्या तोंडाला पाने पूसली.💸

💸💸२५,००० कोटी शेतकऱ्यांसाठी, ७८५० कोटी सिंचनासाठी, २००० कोटी शेततळ्यांसाठी, १,००० कोटी पिक विमा योजनेसाठी इ. आकडे फुगवून मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी आत्महत्या कशा थांबतील यावर कुठलाही विचार झालेला नाही. सावकारी जाचातून शेतकरी कसा मुक्त होईल याचाही विचार झालेला नाही. एकंदरीतच शेतकऱ्यांचे दुःख वाऱ्यावर ठेऊन या सरकारच्या अर्थसंकल्पाचा फुगा फूटला आहे.💸💸

💸💸💸सामाजिक न्याय व शिक्षण याविषयी हा अर्थसंकल्प निराश करणाराच नव्हे तर सरकारची सामाजिक न्याय व मागासवर्गिय विद्यार्थ्यांविषयी दूजाभाव करणारी मानसिकता सिद्ध करणारा ठरलेला आहे. ४०५ कोटी रू. फक्त मागासवर्गिय व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तरतूद करून मागासवर्गिय विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले. फक्त ४०५ कोटी रू. ची तरतूद राज्यातील ८०% समाजातील विद्यार्थ्यांसाठी करून मागासवर्गिय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत नकारात्मकताच या सरकारने दाखविली आहे. गरज नसतांना १७० करोड जन्मशताब्दी वर्षासाठी उधळण्याची गरज नव्हती त्याएेवजी आमदार निधीतून तो खर्च करण्यास बाध्य करून हेच १७० कोटी रू. मागासवर्गिय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केले असते तर अधिक स्वागतार्ह ठरले असते.💸💸💸

💸💸💸💸अंगणवाडी सेविकांना २ लाख रू. जिवन विमा व २ लाख रू. अपघात विमा दिला तशीच तरतूद शेतकऱ्यांसाठी केली असती तर बरे झाले असते. पण त्यावर हा अर्थसंकल्प व सरकार गप्प आहे. उलट तसे न करता या सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास मोकळे सोडले आहे.💸💸💸💸

💸💸💸💸💸मराठवाडा व विदर्भातील उद्योगांना २००० कोटी रू. तरतूद केली परंतू मागासवर्गिय उद्योगांच्या तोंडावर पाने पूसली आहेत. विदर्भाच्या नावाने केलेली ही तरतूद प्रत्यक्षात कधीच खर्च केली जात नाही. विदर्भातील ज्या उद्योगांनी सरकारकडे आधीच मागणी केली आहे. त्या उद्योगांबाबत हा अर्थसंकल्प काहीच बोलायला तयार नाही.
🌟विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याबाबतही या अर्थसंकल्पात काहीच नाही.
🌟तसेच या सरकारने सामाजिक न्याय तर वाऱ्यावरच सोडले आहे.
🌟भाकड जनावरांच्या संगोपनावर केलेली १८ कोटी ६३ लाख रू. केलेली तरतूद स्वतःहून ओढवून घेतलेली उधळपट्टी आहे. त्यापेक्षा गोहत्या बंदीच उठवली असती तर १८ कोटी ६३ लाख वाचविता आले असते.
🌟शेतकऱ्यांना पैसे कमी पडणार नाही. असे म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का ?
🌟फक्त १० कोटी रू. महीला सक्षमीकरणासाठी तरतूद करून महीलांनासुद्धा या सरकारने सापत्नुक वागणूक दिली आहे.

💸💸💸एकंदरीतच ही अर्थसंकल्प अंधारात चाचपडत जाऊन कुठेतरी धडपडत जाऊन आपटला आहे. अविवेकी, दिशाहीन, अदूरदर्शी असाच हा अर्थसंकल्प आहे असेच म्हणता येईल.💸💸💸
...🌟Adv. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर🌟

No comments:

Post a Comment