प्रज्ञेचा विजय
आम्ही जगतो टीकेच्या प्रांतात
एका मनस्वी सुर्यासमान, ता-यांना दीपविण्यासाठी
जळणा-या तप्त निखा-यांना पेलतांना
जेव्हा चामडीची ढाल बनते
तेव्हा हत्तीचे सोंड फोडणारे सुडाधारी दरवाजे
आम्हाला नमन करून जातात
पंचशीलेचा झेंडा हातात घेऊन
आम्ही शिरतो त्या मरणयात्रेच्या चक्रव्युहात
तेव्हा आमच्यातल्या अभिमन्यू चा विजय होतो
कर्णाची धरुर्विद्या अधिक धारदार होते
एकलव्याचा गुरु आत्महत्या करतो
आणि अंगुलीमालातल्या प्रज्ञेचा विजय होतो.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
No comments:
Post a Comment