Friday 16 December 2011

विचारांचा प्रकाश



विचारांचा प्रकाश

संथ जगण्याला आता मी कंटाळलो आहे.
निराशावादी जीवनाला मी पेटवितो आहे.
सूर्य माझ्या बाजूला कवेत घेत असतांना...
पणतीच्या मिणमिणत्या प्रकाशात मी सूर्य बनतो आहे.

जग लखलखते आहे सूर्याच्या तेजाने
माणूस धावते आहे प्रकाशाच्या गतीने
समतावादी वारे माझ्या बाजूला वाहात असतांना...
मी जाती धर्माच्या दिव्याला कायमचा विझवितो आहे.

निळे नभ सूर्याला च्यालेंज देत आहे.
विचारांचा प्रकाश सुर्यालाही झाकत आहे.
सर्व नकार नैराश्य जग नाकारतांना...
मी भीमाच्या वाटेने बुद्धाकडे निघालो आहे...

---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर...९२२६७३४०९१ 

No comments:

Post a Comment