Tuesday 26 June 2012

छत्रपती माझा


रयतेचे राजा महर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या क्रांतीकार्याला विनम्र अभिवादन ! कोटी कोटी प्रणाम !

छत्रपती माझा 

रयतेचा राजा छत्रपती माझा
दिली त्याने देशाला जनकल्याणाची पावती
करू चला छत्रपती शाहूंची जयंती साजरी...!! १ !!

लोककल्याणासाठी राजे तुम्ही पेटविली ज्योत
चहूकडे जनता माझी गाते आज तुमचेच गीत
तुमच्या छायेने भिमक्रांती गाजली...
करू चला छत्रपती शाहूंची जयंती साजरी...!! २ !!

भिमक्रांती प्रकाशमान तुम्हामुळे झाली
हजारो जीवांचे मुक्तिदाता बाबासाहेब घडविलेत तुम्ही
झुगारून जातीच्या बंधनांना दिली आम्हा सावली
करू चला छत्रपती शाहूंची जयंती साजरी...!! ३ !!

आरक्षणाचे जनक बनून पेटविल्यात चुली
मनुवादी व्यवस्थेने फेकलेल्या माणसांना गोंजारून तुम्ही
दीन-दुबळ्यांसाठी केली शिक्षणाची दारे मोकळी
करू चला छत्रपती शाहूंची जयंती साजरी...!! ४ !!

घडविण्यास जीवन आमुचे वस्तीगृह बांधले
स्त्री स्वातंत्र्याचा कायदा करून इतिहास रचला तुम्ही
मोफत शिक्षणाला राजाश्रय देऊन दिली सर्वांना विकासाची संधी
करू चला छत्रपती शाहूंची जयंती साजरी...!! ५ !!

---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१ 

1 comment:

  1. बहुजनांमधे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे रयतेचे कैवारी बहुजनाचा पहिला मुलगा शिकला म्हणुन त्याची हत्तीवरुन मिरवणुक काढणारे लोकराजा राजर्षी शाहु महाराजांना जयंतीनिमित्त अँड.राज जाधव यांच्यातर्फे मानाचा मुजरा...!!!

    http://advrajjadhav.blogspot.in/2012/06/blog-post_26.html

    ReplyDelete