Tuesday, 5 June 2012

सर्वोच्च भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध देशद्रोही

सर्वोच्च भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरुद्ध देशद्रोही
-----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.  मो. नं.  9226734091 
एन सी आर टी च्या पुस्तकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानजनक व्यंगचित्रावरील आंदोलनाची शाई पुसली जात नाही तोच नव्या वादाला तोंड फोडल्या गेले आहे. आई बी एन आणि हिस्टरी च्यानल ने "१९४७ नंतर महात्मा गांधी नंतरचा सर्वोच्च भारतीय कौन" अश्या विषयाच्या अनुषंगाने जनमत निवड चाचणी घेण्यात येत आहे. ही चाचणी जाणीवपूर्वक घेतली जात आहे. जिथे महात्मा गांधींना आधीच सर्वोच्च ठरवून त्यांच्यानंतरचा सर्वोच्च भारतीय कौन ? असा विषय दिला आहे. मुळात गांधींना सर्वोच्च कुणी ठरविले ? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. सर्वोच्च भारतीय ठरवितांना कुणाच्या आधी ? आणि कुणाच्या नंतर ? अशी विभागणी न करता जर सरसकट सर्वोच्च भारतीय कौन ? अशी मांडणी केली गेली असती. किंवा तशी जनमत चाचणी घेतली गेली असती तर त्यात काहीच वाईट ठरले नसते. परंतु या जनमत चाचणी ने समाजात मोठा वाद निर्माण केला आहे. महापुरुषांना ज्यांनी या देशासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान दिले अश्यांना काही व्यक्तिवादी माणसांच्या पंक्तीत बसवून करोडो लोकांच्या भावनांना ठेच पोहचविण्यात आली आहे. ही जनमत चाचणी पूर्वनियोजित आहे. तेव्हाच गांधीजीला आधीच सर्वोच्च ठरवून नंतर इतरांना ठरविण्याचा वायफळ प्रयत्न केला जात आहे.
मुळात भारताच्या इतिहासात गांधीजी कधीच सर्वोच्च ठरू शकत नाही. वेळोवेळी त्यांनी घेतलेली भूमिका आणि महात्मावादी (निष्फळ/कलंकित) वृत्ती ही देशाच्या हिताची कधीही नव्हती. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या विकासासाठी आणि संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी घेतलेली राष्ट्रीय भूमिका सदैव लाभदायक ठरली आहे. इतिहासाला फुसून टाकण्याचा हा प्रयत्न करणे म्हणजे गांधीचे महात्म्य टिकवून ठेवून भारताच्या नवनिर्मितीमध्ये ज्या ज्या क्रांतिकारकांनी आणि महापुरुषांनी/महात्म्यांनी योगदान दिले. त्यांचे योगदान नाकारणे हे आहे. इथले पुरोगामी आंदोलन देशाच्या अस्मितेला टिकवून ठेवण्यासाठी लढत असतांना फक्त एका व्यक्तीविषेशाला समोर ठेवून त्या आधारावर इतरांना किंवा दुस-याला सर्वोच्च ठरविणे म्हणजे या देशातल्या अस्मितेला धोक्यात घालणे आहे. ही कृती जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. जगात आजपर्यंत एखाद्या माणसाला आधीच सर्वोच्च ठरवून नंतर इतरांना सर्वोच्च ठरविन्यासारखी अश्या प्रकारची कुठलीही जनमत चाचणी घेण्यात आली नाही. हे भारतातच शक्य होऊ शकते हे इतल्या व्यक्तिवादी, जातीय, विषमतावादी मानसिकतेने दाखवून दिले आहे.  भारताच्या निर्मितीत जितके योगदान महात्मा गांधींनी दिलेले नाही त्यापेक्ष्य कितीतरी पट जास्त योगदान इतरांनी दिलेले आहे. ज्योतिबा फुले, सावित्री फुले, रानडे, कर्वे, आगरकर, गायकवाड, शाहू महाराज अशी अनेक नावे घेता येतील. आणि २० व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठे राहिले आहे.
गांधी विरुद्ध आंबेडकर हा वाद २० व्या शतकातील महत्वपूर्ण विषय राहिलेला आहे. एकीकडे तळागाळातल्या समाजाला मानवतेची ओळख मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला लढा ! तर दुसरीकडे स्वताच्या समाजातील बांधवांना गुलामीच्या बंधनात झोकून, त्यांची यथास्थित परिस्थिती टिकवून ठेऊन देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी उभारलेला लढा ! एकीकडे सामाजिक सुधारणेची गरज असतांना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून लढणारा परंपरावादी समूह तर दुसरीकडे पश्च्यात्या संस्कृतीच्या सानिध्यात राहून हजारो वर्षापासून चालत आलेली भारतीय जातीय व धार्मिक असमानता दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात उभा झालेला परिवर्तनवाद्यांचा लढा ! हा संघर्ष तेव्हाही होता आणि आता पण आहे. याचेच प्रतिक म्हणून अश्याप्रकारची जनमत चाचणी लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणा-या मिडियाच्या माध्यमातून उभा करण्यात आलेला आहे. इथला मिडिया किती खालच्या स्तरावर जाऊन इथल्या समाजवादी/परिवर्तनवादी महापुरुषांना इतिहासजमा करून गांधीजीला मोठे करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करीत आहे.
थोडे इतिहासाचे अवलोकन केले तर असे दिसून येईल की, १९१८ ला साउथब्युरो कमिशन समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे प्रतिनिधित्व करतांना दिलेली साक्ष आणि दिलेले निवेदन त्यांना भारत आणि भारतीयांविषयी किती पराकोटीची आपुलकी होती हे जगाने आणि प्रत्यक्ष भारतीयांनी अनुभवले आहे. तेव्हा तर गांधींचा सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय असा कुठलाही जन्म देशाच्या आंदोलनात झालेला नव्हता. गांधीजी कुठल्याही पटलावर नसतांना बाबासाहेब जागतिक पातळीवर जाऊन पोहचले होते. १९१८ ला साउथब्युरो कमिशन समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील एकूण परिस्थितीचे केलेले विश्लेषण लक्षात घेऊनच १९१९ ला मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यातील तरतुदी करण्यात आल्या होत्या. ज्यामुळे भारतीयांना मर्यादित प्रतिनिधित्व बहाल करून मर्यादित वैधानिक स्वातंत्र्य बहाल करण्यात आले होते. कदाचित हा इतिहास इथल्या प्रस्थापितांना आणि सत्तावाद्यांना आणि त्यांच्या हातातील बाहुल्या असलेल्या मिडीयाला पुसून टाकायचा असेलही. परंतु जगाने अजूनही तो पुसून टाकलेला नाही. म्हणूनच ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने जगातील विश्वनिर्मात्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ४ था क्रमांक जागतिक जनमत चाचणी घेऊन संशोधनाअंती बहाल केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतावादी लढ्याची ठिणगी म्हणून १९२४ ला सुरु केलेले मूकनायक आणि बहिष्कृत भारत हे जागतिक दर्जाचे ठरले होते. १९२७ ला मानवतावाद भारतीय समाजात पसरविण्यासाठी विषमतावादी अमानवी मनुस्मृतीचे दहन करून जगाला मानवतावादाचा संदेश दिला होता. तेव्हा गांधी कुठे होते ? तेव्हा गांधींची स्थिती काय होती ? हे इतिहासाच्या पानांमध्ये लिहून ठेवली आहे.(ख-या इतिहासात). १९२८ ला गांधी ज्या कमिशन च्या विरोधात उभे झाले होते त्याच सायमन कमिशन समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती विषद केली. एक निवेदन देऊन यानंतर या देशातली व्यवस्था कशी असायला पाहिजे याची मांडणी केली. ब्रिटीश सरकार या देशातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सुधारणांसाठी काय करता येईल यासाठी सायमन कमिशन ची नेमणूक करते आणि त्याच सायमन कमिशन ला गांधीच्या नेतृत्वातील कांग्रेस विरोध करून देशाच्या विकासाच्या वाटेत रोडा निर्माण करते. असे हे गांधीजी या देशाचे सर्वोच्च कसे ठरतात ? याचे उत्तर शोधूनही सापडत नाही.
१९३०, ३१, ३२ ला झालेल्या गोलमेज परिषदेला गांधींनी विरोध केला. बहिष्कार टाकला होता. पण जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इथल्या शोषित पिडीत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या देशातल्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर असलेल्या समाजाला मुख्य धारेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गांधी आणि त्यांच्या पिलावळीच्या हातात असलेली सत्ता त्यामुळे खिळखिळी होणार आहे. हे लक्षात आल्यावर गोलमेज परिषदेला बहिष्कार टाकलेले बहुरूपी गांधी पुन्हा १९३१ ला गोलमेज परिषदेमध्ये शामिल होऊन डॉ. बाबासाहेबांच्या विरोधात गोलमेज परिषदेत रान माजवितात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेपुढे, त्यांच्या राष्ट्रीय भूमिकेपुढे, देशाच्या निर्मितीच्या योजनेपुढे गांधीजी जेव्हा सपशेल अपयशी ठरतात तेव्हा गोलमेज परिषदेसमोर बाबासाहेबांसमोर घुटने टेकून भारतात परत आल्यावर आमरण उपोषणाला बसतात. जागतिक परिषदेत जिंकता येत नाही म्हणून स्वकीयांच्या भावनांचा बळावर उपोषणाचे अस्त्र उपसणारे गांधीजी सर्वोच्च भारतीय कसे काय बनू शकतात ? याचे उत्तर शोधूनही सापडणार नाही.
जागतिक स्तरावर वसाहतवादी भूमिकेविरुद्ध जागतिक महायुद्धाने जमीन तयार केल्याने सर्व वसाहती देश स्वतंत्र होण्याच्या मार्गावर असतांना गांधींनी सतत विरोध केला आणि त्वरित स्वातंत्राची मागणी लावून धरली. याउलट बाबासाहेबांच्या दूरदृष्टीतून या देशाला स्वातंत्र्य लवकरच मिळेल हे माहित असल्याने त्यांनी ब्रिटिशांकडून जितके जास्त शक्य होईल तितके जास्त सामाजिक, आर्थिक परिवर्तन घडवून आणून शोषित पिडीत समाजाला प्रस्थापितांच्या समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला. फक्त राजकीय सत्ता न मिळविता समाजाच्या कल्याणासाठी जितके जास्त ब्रिटिशांकडून पदरात पाडून घेता येईल ते मिळविण्याचा प्रयत्न केला. पण गांधीच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य लढा लढणा-यांनी सदैव सत्तेचीच मागणी केली. याची तुलना आजच्या परिस्थितीशी केली तर असे दिसून येईल की आज इथले प्रस्थापित राजकीय पक्ष सत्तेसाठी हपापलेले असल्यामुळे वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून सत्तेवर विराजमान होण्याचा प्रयत्न करतात. आणि समाजाच्या विकासाला दुर्लक्षित करून देशवासीयांची प्रताडणा करतात. हेच सर्व प्रकार तेव्हा गांधीच्या नेतृत्वात सत्तेसाठी केल्या गेले. आणि सर्वंकष देशाच्या विकासाला आणि समाजाच्या कल्याणाला धाब्यावर बसवून गांधींनी सत्तेसाठी समाजाच्या कल्याणाला ताटकळत ठेवले. समाजाच्या कल्याणाला ताटकळत ठेवणारा नेता महात्मा कसा झाला ? आणि हाच महात्मा आज देशाचा सर्वोच्च भारतीय कसा बनला ? आम्हाला विचार करावा लागेल. देश कुठल्या वैचारिक आणि ऐतिहासिक प्रदूषणाच्या वाळवंटातून जात आहे ? कसे ठरविणार आम्ही सर्वोच्च भारतीय ?
आज ज्या प्रकारे जनमतातून सर्वोच्च भारतीय ठरविण्याचा अश्लाघ्य प्रकार काही वाहिन्यांच्या माध्यमातून सुरु झालेला आहे. ते पाहून इथली व्यवस्था, इथली सरकार, इथले प्रस्थापित, इथला मिडिया डॉ. बाबासाहेबांच्या योगदानाला पुसून टाकण्याचा अमानवी प्रयत्न करीत आहेत. "मी प्रथम भारतीय आणि अंततः भारतीय" असा देशप्रेमाचा राष्ट्रीय नारा देणारा डॉ. बाबासाहेबांशिवाय दुसरा कुठलाही नेता/महापुरुष/महात्मा या देशात तेव्हाही झाला नाही आणि नंतरही झाला नाही. आजही असा नारा देणारा कुठलाही नेता अस्तित्वात नाही. इतका जाज्वल्य राष्ट्राभिमान असणारा दुसरा कुणीही या देशात पैदा झाला नाही. मग या देशाला मानवतावादी, समानतावादी, न्यायप्रिय संविधान बहाल करणारे, विषमतेच्या खाईतून देशाला बाहेर काढून नागरिकत्वाच्या समान धाग्यात बांधणारे, सर्वंकष देशाच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय दुसरा कौन सर्वोच्च भारतीय ठरू शकेल ? महात्मा गांधी आधीच सर्वोच्च कसे ठरले ? देशात जागतिक कीर्तीचा कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतांना, आणि ते तेव्हाही सिद्ध होते, आजही सिद्ध झालेले असतांना पाश्चात्य देशातून संविधान लिहिण्यासाठी कायदेतज्ञ आणू पाहणा-या गांधींमध्ये किती देशभक्ती होती ?
ही जनमत चाचणी फक्त इतक्यापर्यतच मर्यादित नाही. तर २०१४ ते २०१९ ची ही तयारी तर नाही ना ? कुठेतरी षड्यंत्राचा भाग म्हणून इथल्या परिवर्तनवाद्यांनी या घटनांकडे बघितले पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरू असोत की अलीकडचा सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडूलकर. कुणालाही सर्वोच्च भारतीय म्हणून ठरविण्याचा निर्णय जनतेला ठरवू द्यायला पाहिजे. पण कुणाच्या तरी नंतर असे निर्धारित करून नव्हे.  प्रत्येकाचे योगदान हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोलाचे असले तरी डॉ. बाबासाहेबांचे योगदान हे या सर्वांच्या पंक्तीत बसणारे नाही. देशाच्या नवनिर्मितीमध्ये जितके योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. तितके योगदान या पर्यायांमध्ये देण्यात आलेल्या एकाही माणसांचे नाही. पण तरीसुद्धा त्यांना या रांगेत बसविणे म्हणजे बाबासाहेबांच्या असामान्यत्वाला, त्यांच्या विद्वत्तेला आणि या देशाप्रती असलेल्या योगदानाला सामान्य करणे होय. म्हणून आम्ही या व्यवस्थेच्या आणि प्रसारमाध्यमांच्या षडयंत्राला बळी न पडता या देशद्रोही कृतीचा आणि इतरही अनेक महापुरुषांचे अपमान करणा-या या कृतीचा निषेध करून शक्य तितक्या लवकर ही जनमत चाचणी थांबविली पाहिजे. तेव्हाच या देशातल्या सर्वोच्च भारतीयांना खरा न्याय देता येईल. या देशातल्या सर्वोच्च भारतीयांप्रती इथली व्यवस्था कृतघ्नता दाखवत असली. तरी आम्ही आमच्या उद्धारकर्त्या महापुरुशांप्रती कृतघ्न होऊन चालणार नाही. परिवर्तनवादी आंदोलनातील महापुरुशांनीच या देशाला तारून धरले. घडविले. निर्मिले. हा देश त्यांच्या कार्याला सदैव नतमस्तक होत राहील. सर्वोच्च भारतीय कौन ? हे या देशातल्या ख-या भारतीयांच्या हृदयावर कोरलेले आहे. त्यामुळे कुणी कितीही ? कुणाच्या आधी ? आणि कुणाच्या नंतर ? कुणाला तरी ? सर्वोच्च करून मग इतरांना सर्वोच्च भारतीय ठरविण्याचा प्रयत्न केला. तरी त्यांच्या षड्यंत्रात ते यशस्वी होऊ शकणार नाही. जोपर्यंत इथले खरे भारतीय आजही इथल्या ख-या इतिहासाचे साक्षीदार म्हणून जगत आहेत. इतिहास आमच्या रक्तात वाहतो आहे. धमन्या आजही या देशाचे रक्षण करण्यासाठी सरसावत आहेत. या देशाच्या मातीत जन्मलेले, या देशाला मानवतावादी संस्कृती बहाल करणारे, माणसांना माणसांची ओळख देणारे, या देशाचे/ भारताचे खरे आणि सर्वोच्च भारतीय आहेत. हे निर्विवाद सत्य कुणीही नाकारू शकत नाही. आणि ते नाकारण्याचा अव्यवहारी, अपौरुषेय प्रयत्न कुणी करू नये एवढी सम्यक विनंती !
ôôôôôô
-----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.  मो. नं.  9226734091 

9 comments:

  1. अरविंद बनसोडे, पोर्ट ब्लेअर7 June 2012 at 16:00

    ! जयभीम !
    डॉ संदीप सर, खरोखरच आपला वरील लेख हा सर्व संपन्न व विश्लेषित असून भारतीय देशात समाजविकास रोखणारी मनुवादी नीती अराजकता माजवून फक्त स्वार्थ साधणाऱ्या भडव्या मनुवाद्याना बसवलेली जबरदस्त, मजबूत आणि देशाच्या कानाकोपऱ्यात गुंजणारी चपराक आहे यात काडीमात्र शंका नाही. Really great. Lot of thanks. मनुवादी मिडियाच्या greatest Indian च्या सर्वेक्षण विरोधात आपण सुरु केलेल्या कार्याला व आपल्या नेतृत्वाखाली लवकरात लवकर यश येवो.

    ReplyDelete
    Replies
    1. बाबासाहेबांचे पिडीत समाजाच्या उत्थानासाठीचे व संविधान निर्माणातील कार्य अतुलनीय च आहे, पण माझ्या वाचनात(कदाचित माझे वाचन कमी असेल म्हणून)बाबासाहेबांनी स्वातंत्र्य लढ्यात कुठं आणि कोणते योगदान दिले याबाबत काहीच माहिती मिळाली नाही, तुम्हाला याबाबत काही माझे अद्यान दूर करता आलं तर नक्की रिप्लाय करा🙏

      Delete
    2. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वातंत्र लढ्यातील योगदानावर स्वतंत्र लेख लिहून आपण वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. तोपर्यत ब्लॉग वाचत राहा. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

      Delete
  2. he he he, ya purn lekhat ambedkaranche naav nimmya vela pan nahi jitkya vela gandhinche ahe... tumchya mate vait jari asale tari te tumhala prasannach hotil, valya suddha mara mara mhanun valmiki jhala... asha karato tumhin suddha sudharal

    ReplyDelete
  3. Mr. Suraj Desai or Anonymous aap jo bhi ho shyayad aap ko bahot bura lag raha hai. lekin duniya ka itihas kya manta hai ye jyada important hai. gandhi kya tha aaur aambedkarji kya the yeh is article me kafi achhe se samajaya gaya hai. lekin fir bhi aap jaise logo ko nahi samajha sakate kyonki tum jaisee log hi to is vyawastha ki asali paidaish ho. jaha paida hue ho wahi rahoge.

    ReplyDelete
  4. gandhi me aisa kuchh nahi hai jo ham ya yah desh le sake. buddha se silence ka principle liya par kabhi nam nahi liya. sabhi principle kisi se chore gaye par nam kabhi liya nahi aisa chor gandhi hamara aadarsh nahi ho sakata. to dusari taraf babasahab aaur buddha ko puri duniya apna rahi hai.

    ReplyDelete
  5. https://play.google.com/store/apps/details?id=aman.bhimnelson.ambedkar&hl=en

    ReplyDelete