गावकुसाबाहेरची माणसे
गावकुसाबाहेरच्या माणसांनी
या देशाला तारले
हीच माणसे देशाचे संरक्षण करतांना
प्राणाची बाजी लावून देशासाठी लढले
लाचारीच्या फाटक्या चिंध्या फेकून देऊन
अमानुषतेच्या विश्वात स्वातंत्र्यासाठी झटले
असे माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारे
मानवतावादी जगाचे पाईक बनले
इथल्या मातीशी इमान राखून
अभिमानाने भारतीय म्हणून जगले
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर
No comments:
Post a Comment