Wednesday 19 October 2011

चळवळीचे शास्त्र

 चळवळीचे शास्त्र
किना-यावर बसून गरजणा-यांनो
जरा प्रवाहाच्या आत सामावून घ्या
चार भिंतीच्या आतून भडकणा-यांनो
जरा रस्त्यावरच्या लढाईचा आस्वाद घ्या

प्रवाहासोबत जगणा-यांनो 
प्रवाहाला बदलू शकत नसाल तर
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने
वाटचाल करायच्या तयारीला लागा...

सुखवस्तुच्या सानिध्यात जगणा-यांनो
तुमची चैन आणि चंगळवाद सोडू शकत नसाल तर
तुमच्या येणा-या पिढ्यांचे वार झेलण्यासाठी
आता पासून मसाज पार्लर च्या तयारीला लागा...

माझ्या गरजणा-या बरसणा-या भिमसैनिकांनो
या पापी दुनियेत जरा जपूनच वागा
चळवळीचे शास्त्र आणि विचारांचे वस्त्र
भविष्याच्या माथ्यावर कोरूनच टाका...
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर...८७९३३९७२७५

No comments:

Post a Comment