Sunday, 2 October 2011

बुद्धाच्या वाटेने

बुद्धाच्या वाटेने 
जनसागर निघाला भविष्याच्या दिशेने 
आयुष्य उजळले न्याय समतेच्या आशेने 
बदलण्या इथल्या दिशा अहिंसेच्या मार्गाने 
हा भीमसागर निघाला बुद्धाच्या वाटेने

बहुजन इथला या देवाने लुटला
जातीचा भस्मासुर धम्माने पेटविला
श्वेतपुत्रांचा काफिला दीक्षेला निघाला
लुटारुंच्या दुनियेत शांतीचा आधार जगाला

काळोखाच्या अंधारात लखलखते हा सूर्य
परिवर्तनाच्या वाटेने झगमगते हे कार्य
दिक्षाभूमीच्या पायथ्याशी जगण्याचे धैर्य
चला एक मुखाने गाऊ माझ्या भीमाचे शौर्य

प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर...८७९३३९७२७५

No comments:

Post a Comment