Tuesday 4 October 2011

खरे भारतीय

 
खरे भारतीय
 
सुटाबुटात वावरणारे 
गावभर उघडे नागडे फिरले 
अंगावरचे कपडे फेकून 
इथे महात्मा म्हणून जगले 
 
फाटक्या चिंधीतले  माझे भीमराव
संपूर्ण विश्वाचे विद्वान बनले
माणसांच्या लढ्यासाठी अहोरात्र झटणारे
बाबासाहेब संपूर्ण जगाने पाहिले
 
आपल्याच बांधवांचे हक्क नाकारणारे
ढोंगी साधू येरवड्याने अनुभवले
देशाला स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे
सामाजिक स्वातंत्र्याला नाकारत बसले
 
स्वातंत्र्य दिले ज्यांच्या हाती
त्यांनीच त्यांना संपवितांना
'हे राम' मुखात घातले
माणसांपेक्षा धर्मावर प्रेम करणारे
जाती-पातीत देशाला विसरले
 
माणसांसाठी धर्माच्या गोष्टी करणारे  
देश विकाया निघाले
धर्माच्याच नावाने दहशतीसाठी
जागो जागी बॉम्बगोळे फोडू लागले
 
अरे...!
लेखणीतून देश उभा करतांना
जागतिक कीर्तीच्या संविधानाला मान मिळू लागले
इथल्या भीमरावांच्या बच्च्यांनी, ख-या भारतीयांनी 
आपले धर्मग्रंथ या देश्याच्या संविधानाला मानले
 
प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.

1 comment: