Monday, 7 September 2015

आरक्षणविरोधी हार्दीक पटेल वा विजय दर्डा

👇👹🔕👇👹🔕👇🔕👇🔕👇
सद्या देशात आरक्षणाविरोधात मानसिक वातावरण तयार करण्यासाठी विविध मार्ग अवलंबिले जात आहे. हार्दिक पटेल ते विजय दर्डा पर्यंतची साखळी अतिशय शिस्तबद्ध काम करीत आहे. त्यातून चिटपूट प्रतिक्रीयावादी आंदोलन करून आम्ही जिंकल्याचा उन्माद आणीत असू तर थांबा ! कुठे तरी चुकतेय...

आरक्षणाच्या समर्थनात तुमच्या प्रतिक्रीया तुष्टीकरणात आहेत. नेतृत्वाविना जंगलात भरकटलेल्या मेंढ्यांच्या कळपासारखे. एकीकडे आरक्षणाचा लाभार्थी तमाम वर्ग तुष्टीकरणात अडकलेला आहे. आरक्षण असावे की नसावे ? याविषयी हा लाभार्थी वर्ग निरूत्तर आहे. आरक्षण लाभार्थ्यामध्ये एकता नाही. तर दूसरीकडे आपल्या प्रतिक्रीयावादी आंदोलनाने आरक्षण विरोधी गट अधिक सक्रीय होऊन एकजूट होत आहे. तो पून्हा तिव्र व्हावा हेच यामागची भूमिका आहे. आम्ही "जय भिम" चा नारा देऊन किती काळ ही लढाई टिकवून धरणार आहोत. ? हा खरा प्रश्न आहे.

आरक्षणविरोधी हार्दीक पटेल वा विजय दर्डा पर्यंत थांबले आहेत असा विचार आम्ही करीत असू तर नक्कीच चुकतोय.

कारण नौकरीतील आरक्षण आमचे केव्हाचेच संपवून टाकण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गात आरक्षीत समाजाचा उमेदवार घेतला जाणार नाही असे प्रशासकीय, शासकीय व न्यायीक फतवे केव्हाचेच निघालेत. शिक्षण व नौक-यांतील आरक्षण हे फक्त तुम्हाला दिलेल्या संवैधानिक प्रतिशत पर्यंत सिमीत करून बाकीचे सर्व केव्हाचेच अकायदेशिररित्या बळकावण्यात आले आहे. आम्ही उरलोत ते फक्त रस्त्यावर जिंदाबाद मुर्दाबातचा नारा लावण्यापर्यंतच...व्हा !

विरोधक यशस्वी होतायत संघटीत समाज व संघटीत समाजाचे मुखीयाधारी नेतृत्व स्विकारून. आम्ही संघटीत होत नाही. नेतृत्वाची तर एलर्जीच जणू काही लागलेली. उरलेसुरले २-४ टाळके रस्त्यावर उतरून जिंदाबाद, मुर्दाबादच्या घोषणा लावून दिवाळखोरी दाखवण्यात अव्वल ठरतात व संपुर्ण समाजाला हेटाळणीचा विषय करून मोकळे होतात.

चळवळीचे गांभिर्य हरवून नेतृत्वहीन क्रांती, आंदोलन, चळवळी ना इतिहासात यशस्वी झाल्या, ना ही वर्तमानात  होत आहेत व ना ही भविष्यात होतील. समाजाच्या गर्भात शिरून पून्हा क्रांतीची गर्भधारणा करावी लागेल. व पूर्ण विकास झाल्याशिवाय क्रांतीच्या बाळंतपणाची घाई करणे अंगलट येण्यासारखे आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

सक्षम नेतृत्व न स्विकारल्यामुळे आरक्षीत वर्गाचे तुष्टीकरण व आरक्षण विरोधकांचे होणारे पोलरायझेशन भविष्यातील अनेक पिढ्या बर्बाद करणारे ठरेल हे समजून घेता आले तरी आम्ही नैसर्गिक बाळंतपणातून सुदृढ क्रांतीला जन्म देऊ शकू.

२-४ टाळक्यांच्या नेतृत्वविरहीत जिंदाबाद, मुर्दाबाद च्या घोषणांमध्ये ही चळवळ लयास जाऊ नये एवढीच तुर्तास अपेक्षा !
...डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
👆👆👆👆👆👆👆👆👆👆🎤

No comments:

Post a Comment