Sunday 26 January 2014

Constitutional Morality

(((आता आपल्याला आंबेडकरी समूहाबाहेर येऊन इतर बहुजन समाजाला सोबत घेऊन त्याचं नायकत्व आपल्याला स्वीकाराव लागेल त्यातच यश मिळू शकेल...By Pravin Jadhav))) 101 % खरे आहे. जे फार पूर्वी व्हायला पाहिजे होते. पण नाईलाजाने आता ते या पिढीला म्हणावे लागते किंवा ते करायला प्रवृत्त व्हावे लागते. आमच्या डोक्यातील विचार, आचार व कृती आराखडा कुणीही मिटवू शकणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे आम्ही हिंदू म्हणविणाऱ्या बहुजनांमध्ये गेलो तरी त्यांच्यात परिवर्तन करू पण आपल्यात त्यांच्यामुळे परिवर्तन होणार नाही. हे खंबीरपणे जोपर्यंत हा आंबेडकरी समूह समजून घेत नाही तोपर्यंत बहुजन समाजाचे नायकत्व आंबेडकरी माणसाकडे येणार नाही. हिंदुप्रणीत बहुजनांच्या आदर्श (देव / मंदिर) व संस्कृतीत दर्शक किंवा पाहुणे म्हणून आपण एक भाग बनलो म्हणजे आपल्यातला आंबेडकरवाद किंवा buddhism संपला असा अर्थ निघत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर Constitutional Morality च्या संबंधाने बोलतांना म्हणतात कि "Recognition of Pluralism is the part of Cultivation of Constitutional Morality in India" वैविध्यतेला मान्यता दिल्यानेच या देशात संवैधानिक नैतिकतेची रुजवण करता येईल. असे म्हणणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनीच आता ठरवावे कि आम्हाला एकाला चलो रे स्वीकारायचे कि वैविध्यतेला स्वीकारून संवैधानिक नैतिकतेची रुजवण करतांना बहुजनांचे नेतृत्व स्वीकारायचे. निर्णय समाजाला घ्यायचा आहे. निर्णय नवशिक्षित पिढीला घ्यायचा आहे. निर्णय वर्तमानातील उच्चशिक्षित पिढीला घ्यायचा आहे.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. दी. 24 January 2014.

No comments:

Post a Comment