Sunday 26 January 2014

नेतृत्वाचा स्वीकार करा


((("आता सर्व गटांनी युती करावी अशी कल्पना येत आहे . बर एकवेळ युती मान्य करूया पण मृत गटांना परत सुळसुळाट करण्यासाठी त्यांना ICU मधून काढून परत त्यांच्यात जीव टाकण्याचे प्रकार आहेत."...By Pravin Jadhao)))...प्रवीण हे अगदी बरोबर आहे. युती किंवा ऐक्य म्हणणाऱ्या लोकांची राजकीय प्रगल्भता बाल्यावस्थेत आहे असे म्हणावे लागेल. ऐक्य आता अश्यक्यप्राय आहे त्यामुळे त्यावर मत प्रदर्शित करण्यात वेळ घालविणार नाही. परंतु युती ही नवी संकल्पना काही तरुणांनी मांडली त्यामुळे त्यांचे स्वागतही करू. परंतु जर राजकीय परिस्थितीचे चिंतन केले तर असे दिसून येते कि युती किंवा आघाडी ही स्वतंत्र वोट बँक असणाऱ्या पक्षांमध्ये केली जाते. आज आंबेडकरी म्हणविणाऱ्या पक्षांजवळ स्वतःची अशी स्वतंत्र वोट बँक नाही. अश्या परिस्थितीत कार्यकर्ते आणि नेते यांच्यात कितीही युती वा आघाड्या झाल्या तरी निवडणुकीवर त्याचा परिणाम पाडू शकतील असे दिसत नाही. बसपा निवडणुकीच्या सौदेबाजीत इतकी गुंतली आहे कि त्यांनी युती व आघाडी केली तर त्यांची दुकानदारी बंद व्हायची. व दाना-पाणी बंद व्हायचा अशी परिस्थिती आहे. जोपर्यंत स्वतःची स्वतंत्र अशी मजबूत वोट बँक तयार होत नाही तोपर्यंत आपापसात कितीही युती व आघाडी झाली तरी निर्णय मात्र शून्य राहील. म्हणून एकच पर्याय या समाजासमोर व कार्यकर्त्यांसमोर राहतो तो असा कि, प्रत्येकांनी वर्तमान राजकारणाचा व राजकीय परिस्थितीचा विचार करून समाजासमोर "एकनेतृत्वाची संकल्पना" ठेवावी. समाजाला कुठलेही एक नेतृत्व स्वीकारावयास सांगावे. जो नेता आंबेडकरी विचार व कृतीवर सक्षम बसत असेल त्या नेतृत्वाचा स्वीकार करा. तेव्हाच एक भक्कम वोट बँक या समाजाची तयार होईल. त्यातच या समाजाचा अभ्युदय आहे. राजकीय उभारणी त्यातूनच करता येईल.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. दी. 25 जानेवारी 2014


सत्ता ही तात्कालिक आणि अल्पकालीन असते. पण सामाजिक परिवर्तन हे दीर्घकाळ टिकणारे. समाजाचे भवितव्य अल्पकाळासाठी कि दीर्घकाळासाठी ? याचा विचार प्रत्येकाने करावा. कारण सामाजिक परीवर्तानासोबत जर सत्तेपर्यंत पोहचायचे असेल तर तत्कालीन सत्तेला व राजकीय स्वार्थाला तिलांजली द्यावीच लागते. आणि सामाजिक राजकारणाच्या प्रक्रियेत हितसंबंधी लोकांसोबतच इतर हितसंबंधी लोकांशी सौहार्दाचे संबंध निर्माण करून सत्तेकडे जायचे असते. राजकीय सामाजीकरणाची ही प्रक्रिया समजून घेतल्या शिवाय तुम्हाला तुमची भक्कम राजकीय ताकत निर्माण करता येणार नाही. कम्पुवादी राजकारण हे प्रत्येकच समाजासाठी घातक आहे याचे भान असू द्या. आणि कम्पुवादी राजकारणातून बाहेर पडून सर्वांना सोबत घेऊन चालणारे राजकारण करा. तशी मानसिकता तयार करा.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. दी. २१ जानेवारी २०१४


समाज चुकीच्या दिशेने जात नसतो. समाजाचे मानसिकीकरण करणारी यंत्रणा अपयशी ठरते तेव्हा नेतृत्वाने भूमिका घेऊन समाजाला योग्य दिशा दाखविली पाहिजे. आणि समाजाचे मानसिकीकरण करणारी यंत्रणा भक्कम केली पाहिजे....

मतस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य असल्यामुळे जोपर्यंत मानसिक परिवर्तन केले जात नाही तोपर्यंत कुणावरही आळा घालता येणार नाही. त्यासाठी संवैधानिक मानसिकीकरण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून एकसंघ भारतच नव्हे तर एकसंघ समाज निर्माण करायचा होता जो संवैधानिक प्रक्रियेतून या लोकशाहीला बळकटी देऊ शकेल. निदान याचे तरी भान प्रत्येकाने ठेवायला हवे. एवढेच...

---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. दी. २१ जानेवारी २०१४

No comments:

Post a Comment