Wednesday, 11 February 2015

अविवेक जिंकला, विवेक हरला...

👹👹👹दिल्लीत भाजप, हिंदूत्व, आरएसएस व नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला नसून विवेकाचा पराभव व अविवेकाचा विजय झाला आहे.👹👹👹

दिल्लीतील आम आदमी पार्टी च्या विजयाने फसव्या विकासाचे राजकारण पून्हा चर्चेत आले आणि सारेच विकासाच्या "कोमात" गेले.

मात्र हेच खरे वास्तव आहे का ? काँग्रेस शून्यावर आली. इतकेच नाही तर २०१३ च्या तूलनेत १५ % मत कमी पडली. अपक्ष व इतरांच्याही मतांचा टक्का कमी झाला आणि ते सर्व मते "आप" च्या पारड्यात कशी गेली ?

दूसरीकडे भाजपा ला २०१३ ला मिळालेल्या मतात (३३ %) फक्त १ % टक्का मते कमी पडली. या निवडणूकीत भाजप ला ३२ % टक्के मते पडली आहेत. मात्र ३२ जागावरून ३ जागावर भाजप आली.

इतका फरक का पडला ? याचे सरळ उत्तर हे आहे की काँग्रेस व अन्य पक्षांना पडत असलेले deciding votes यावेळी "आप" च्या खात्यात गेली. ही मते "आप" कडे कशी गेली ? की, ही मते तिकडे वळविण्यात आली ? या प्रश्नाच्या उत्तरात दिल्लीच्या निकालाचे गूढ दडलेले आहे.

दिल्लीच्या तख्तावरून १३० वर्षाची काँग्रेस हद्दपार होऊन त्याचे पडसाद देशभर परिणाम करणारे आहे. तसेच विचारसरणीवर आधारीत प्रादेशिक व काही राष्ट्रीय पक्ष पूर्णतः नाकारले जाणे. ही अतिशय गांभिर्याची बाब आहे. पण त्यातच हिंदूत्व विचारसरणीच्या भाजपा चा मतदान टक्का कायम राहणे; सोबतच कूठलीही विचारधारा पाठीशी नसणारा "आप" पक्ष भरारी घेणे देशाच्या भविष्याला प्रश्नांकीत करणारे आहे.

यावरून हेच दिसून येते की, हिंदूत्ववादी मतदार कायम ठेवून हिंदूत्वाच्या विरोधी असणारा मतदार अविवेकी, अविचारी "आप" सारख्या प्रवाहासोबत जोडला गेला. सत्ताधारी पक्षाच्या मूळाशी विचारधारा नसेल तर राज्य विवेकाने नाही तर अविवेकाने चालविले जाणार हे नक्की. आणि ही कृती भविष्यात व्यवस्था मोडकळीस आणण्यास पोषक वातावरण निर्माण करेल. याचा विचार राजकीय भाष्यकारांकडून केला  न जाणे भारतील लोकशाहीसाठी धोक्याचे संकेत आहे.

"आप" च्या झंजावाताने विकासाचे व स्थानिक मूद्यांचे भांडवल राजकीय बाजारात सर्वांना आकर्षित करू गेले. आता या भांडवलाचा वापर सर्वच राज्यीय व राष्ट्रीय पातळीवर केला जाईल. यातून राजकीय वैचारीक व्यवस्था व पक्षप्रणाली मोडकळीस येईल.

काँग्रेस व अन्य पक्षांना संपवून, हिंदूत्वाला टिकवून अविवेक व अविचारी विदूषकांच्या हातात सत्ता सोपविण्यात अविवेकवादी यशस्वी झाले.

शेवटी नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्या उक्ती व कृतीत कूठलाही फरक नाही. दोघांचेही वैचारीक नेतृत्व करनारे एकच आहेत हे विसरू नका.

पूढील योजना 🌹"चाय पे चर्चा"🌹 या प्रस्तावीत कार्यक्रमात आखली जाईल.
🐄🐄🐄तूम्ही विकासाची चर्चा करीत रहा ! राजकीय घमंड आणि गर्वाचे गर्वहरण झाल्याचा शंखनाद करीत रहा !🐰🐰🐰

शेवटी विचार व विवेक पराभूत होईल. त्याला आम्हीच जबाबदार राहू.
...डॉ. संदीप नंदेश्वर...

No comments:

Post a Comment