चलो औरंगाबाद ! चलो औरंगाबाद ! चलो औरंगाबाद !
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी साजरी केली जात आहे. भैय्यासाहेब आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर केला. बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी बौद्धाचार्य आणि केंद्रीय शिक्षक/शिक्षिका आणि श्रामणेर इ. ची निर्मिती केली. चैत्याभूमिचे निर्माते व बौद्धाचार्य निर्मितीचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. बाबासाहेबांचे सुपुत्र व बौद्ध धम्माच्या प्रचार/प्रसारातील अग्रगण्य असणा-या 'सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त" त्यांनी धम्माला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 'दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया', महाराष्ट्र शाखा यांच्या वतीने "महाराष्ट्र राज्य शाखेचे महाअधिवेशन" अयोध्या नगरी मैदान, आर. टी. ओ. समोर, औरंगाबाद येथे २३ आणि २४ फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आले आहे. तमाम बौद्धांनी सदर धम्म अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्म प्रचार प्रसारात योगदान द्यावे. हि विनंती.
निमंत्रक :- १) मा. देवेंद्र मेश्राम, अध्यक्ष, नागपूर जिल्हा.
२) मा. डॉ. संदीप नंदेश्वर, मार्गदर्शक, नागपूर जिल्हा.
No comments:
Post a Comment