-: प्रेसनोट
:-
डॉ.
नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची कायदेशीर चौकशी करण्यात यावी.
मा. संपादक
दै..........................
नागपूर.
नागपूर.
विषय :- नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध
महोदय,
दि. २५ ऑक्टोंबर २०१२ रोजी नागपूर येथे डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषण खंडाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन समारंभात डॉ. नरेंद्र जाधव यांनी "महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आंबेडकर साहित्य सुमार दर्जाचे आहे. पोत्यात कांदे बटाटे भरावे तसे साहित्य या खंडात भरण्यात आले आहे." असे वक्तव्य केले आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या या वक्तव्याचा 'भारतीय बौद्ध महासभा' नागपूर जिल्हा शाखेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.
डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे महत्व वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या विश्वसनीय आंबेडकरी साहित्यावर ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विखुरलेले साहित्य पुस्तक रुपात समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी केली होती. आजपर्यंत या समितीने प्रकाशित केलेल्या साहित्याला विश्वसनीय आंबेडकरी साहित्य म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. खंड २२ वगळता समितीने प्रकाशित केलेल्या साहित्याचा दर्जा विश्वसनीय असतांना डॉ. नरेंद्र जाधव त्यावर आक्षेप घेण्यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आंबेडकरी साहित्याला कांदे-बटाटे असे विशेषण लावून डॉ. नरेंद्र जाधव यांनी आंबेडकरी साहित्याचा, विचारांचा आणि बाबासाहेबांचाही अपमान केला आहे. लेखन व भाषण खंडातील साहित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांतून, हस्तलीखीतातून आणि मासिक-वर्तमानपत्रातून घेतले असतांना त्या साहित्याची विश्वसनीयता कमी करून स्वतःचे महत्व वाढविण्याचा अश्लाघ्य प्रकार नरेंद्र जाधव यांच्या माध्यमातून केला जात आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत.
डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या पुस्तकात त्यांनी साहित्यिक सरमिसळ केल्याची शक्यता यामुळे बळावत चालली आहे. जनतेच्या लक्षात ते येऊ नये. आणि लेखन व भाषण खंडाच्या आधारे त्यांच्यावर टीका होऊ नये. म्हणून त्यांनी सरळ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या साहित्यावर टीका केली असे दिसून येते. अन्यथा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या साहित्याचा टीकात्मक उल्लेख करण्याचे काहीच कारण नव्हते. डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या पुस्तकात बाबासाहेबांची अनेक भाषणे लेखन व भाषण खंडातूनच घेण्यात आली आहेत. अश्या परिस्थितीत त्यांनी लेखन व भाषण खंडाचे आणि महाराष्ट्र शासनाच्या चरित्र-साधने प्रकाशन समितीचे आभार मानने अपेक्षित होते. परंतु वैचारिक जहर पसरविण्याचा प्रयत्न करणारे डॉ. नरेंद्र जाधव विश्वसनीय साहित्यालाच गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची विश्वसनीयता लेखन व भाषण खंडातूनच तपासता येऊ शकते हे नरेंद्र जाधव चांगल्याने ओळखून आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या खंडातून पसरविलेले वैचारिक/साहित्यिक जहर झाकण्यासाठी विश्वसनीय आंबेडकरी साहित्यावर टीका केली आहे. घरामध्ये देव दडवून ठेवणारे; आंबेडकरी परिवेशात घुमणारे नरेंद्र जाधव यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांची जाहीररित्या होळी करण्यात येईल.
मागण्या :-
१) डॉ. नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांनी जाहीर माफी मागावी.
२)
चरित्र-साधने प्रकाशन समितीची जाहीर माफी
मागावी.
३) विश्वसनीय साहित्यावर टीका केल्याने आंबेडकरी समाजाच्या
भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे नरेंद्र जाधव यांनी आंबेडकरी समाजाची जाहीर माफी
मागावी.
४)
डॉ. नरेंद्र जाधव यांनी प्रकाशित केलेले साहित्य
कुणीही विकत घेऊ नये. किंवा संदर्भ म्हणून त्यांचा वापर करू नये.
५)
डॉ. नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची
कायदेशीर चौकशी करण्यात यावी.
६)
डॉ. नरेंद्र जाधव यांच्यावर Copyright कायद्याअंतर्गत
गुन्हा दाखल करण्यात यावा.
इ. मागण्यांसह हे निवेदन प्रेस, मिडिया यांच्या माध्यमातून
सरकार आणि समाजासमोर माहितीस्तव नरेंद्र जाधव यांची साहित्यिक घुसखोरी उघड करण्यासाठी
पत्रकार परिषदेसमोर ठेवण्यात आले आहे.
धन्यवाद !
निवेदन कर्ते :-
नाव सही
1. …………………………………………… ……………………….
2. …………………………………………… ……………………….
3. …………………………………………… ……………………….
4. …………………………………………… ……………………….
5. …………………………………………… ……………………….
6. …………………………………………… ……………………….
7. …………………………………………… ……………………….
8. …………………………………………… ……………………….
9. …………………………………………… ……………………….
10. …………………………………………… ……………………….
फार वाईट स्थिती आली आहे.
ReplyDelete