Friday, 9 March 2012

बी एस पी की जित गुजरात से ?


बी एस पी की जित गुजरात से ?

मायावती के कार्यकर्ता आज भी ये मानने के लिए तैयार नहीं है की, बी एस पी ने उत्तर प्रदेश के आम चुनाव में जो प्रदर्शन दिखाया है वो पिछले ५ सालो में किये गए राजनीती का ही परिणाम है ! दलित राजनीती कभी भी इस देश के सत्ता पर बनी रहने की अपेक्षा नहीं की जा सकती. पर मायावती और उनके कार्यकर्ता इस भूल में थे की उनकी सत्ता फिर एक बार कमाल कर जाएगी ! वो कमाल हो भी सकता था अगर आम्बेद्कारी सिद्धांतो पर मायावती और उनकी बी एस पी ने काम किया होता ! भारत में शोषित और पीड़ित समाज के हाथ में बार बार सत्ता आएगी ये न समझे ! इस बार उत्तर प्रदेश में हार का और एक चिंतन है !
उत्तर प्रदेश के बी एस पी कार्यकर्ता बामसेफ को गालिया मारते है ! और महाराष्ट्र के बामसेफ के कार्यकर्ता बी एस पी को गला तोड़ कर समर्थन करते है ! यह कैसी विडम्बना है इसका जवाब महाराष्ट्र के बामसेफ कार्यकर्ता और उत्तर प्रदेश के बी एस पी कार्यकर्ता ने देना चाहिए !
२००७ में उत्तर प्रदेश के आम चुनाव में २०६ सीटो के साथ बहुमत मिला था ! उस चुनाव में गुजरात के नरेन्द्र मोदी उत्तर प्रदेश में बी जे पी के चुनावी सभाओ में आये थे ! नरेन्द्र मोदी उत्तर प्रदेश में बी जे पी के उम्मीदवारों का प्रचार कर रहे थे ! और बहुमत से जित हुई बी एस पी के उम्मीदवारों की ! उत्तर प्रदेश में ५ सालो के लिए सत्ता बी एस पी के हाथो में देकर नरेन्द्र मोदी चले गए ! उसके बाद मौका मिला मायावती को क्योंकि उत्तर प्रदेश के चुनाव के बाद गुजरात विधिमंडल का चुनाव हुआ ! उसमे मायावती बी एस पी के उम्मीदवारों के प्रचारों के लिए गुजरात में गई ! वह पर कुछ जगह तो बी जे पी के उम्मीदवारों को समर्थन भी दे दिया ! उस समय मायावती और नरेन्द्र मोदी एक ही सभा मंडप के निचे आये थे ! ये असलियत थी अहसान चुकाने की और उसी चुनाव में गुजरात में नरेन्द्र मोदी के नेतृत्वा में बी जे पी के हाथ में सत्ता आयी ! इसका सही मतलब यह है की नरेन्द्र मोदी उत्तर प्रदेश गए थे बी एस पी की सरकार बनाने और मायावती गुजरात गई थी नरेन्द्र मोदी की सरकार बनाने !
उसी का नतीजा यह हुआ की इस बार बी जे पी ने नरेन्द्र मोदी को उत्तर प्रदेश के चुनावी सभाओ में प्रचार के लिए आमंत्रित नहीं किया ! और उसका सही नतीजा यह हुआ की बी एस पी ८० सीटो पर ही सिमित हो गई ! मायावती का यह असली चेहरा आज भी बी एस पी के कर्यकर्तओंके नजर में क्यों नहीं आ रहा ? सत्ता आने के बाद भी अगर परिवर्तन नहीं हो सकता तो क्या हम बार बार सत्ता के सपनों में समाज को डालकर परिवर्तन के लिए इंतजार के अलावा और कुछ नहीं दे सकते ! भाइयो आम्बेद्कारी आन्दोलन मौके की तलाश में होते है और जब भी मौका मिलाता है तब यह आन्दोलन अपने सिद्धांतो पर व्यवस्था निर्माण का प्रयास करता है ! बी एस पी और मायावती ने यह क्यों नहीं किया ? परिवर्तन के लिए क्या ५० साल हाथ ने सत्ता चाहिए क्या ? इसका जवाब आप सभी मायावती के भाइयो और कांशीराम के कर्यकर्तओंसे आज मै पूछना चाहता हु ?
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर...८७९३३९७२७५

Tuesday, 6 March 2012

मायावती की हार यह दलित राजनीती की हार है ! आंबेडकरी राजनीती कि हार नही !

मायावती की हार यह दलित राजनीती की हार है ! आंबेडकरी राजनीती कि हार नही !

मुझे बडे दुःख के साथ यह कहना पड़ रहा है की, भारत में एकमात्र दलित सत्ता का बड़ा दुखद अंत हुआ है ! दुःख इस बात का भी है की एकमात्र दलित सत्ता जिसकी राजनीती की बात सारी दुनिया करती थी वो मायावती का असली दलित चेहरा फिर एक बार दुनिया के सामने दिखाई देगा ! भारत के परिप्रेक्ष में सत्ता एक ऐसी चीज है जो तानाशाही को सत्ताधारी इन्सान के मन में पैदा करता है ! चाहे फिर वो दलित हो या चाहे वो भारत की राजनीती हजारो साल से अपने हात में लिए बैठे परम्परावादी हो ! इसी मानसिकता को बदलने के लिए डॉ. बाबासाहब आंबेडकर ने नैतिकता की राजनीती की नीव रखी थी ! लेकिन बड़े दुःख से यह कहना पड़ रहा है की मायावती की दलित तानाशाहिवादी सत्ता जो बाबासाहब का नाम लेकर बार बार अपने राजनितिक वजूद को बचाने की कोशिश कर रही थी वो आज फिर एक बार असफल हुई है ! दर इस बात का भी है की दुनिया या कोई भारतीय यह न कह सके की "देखो फिर एक बार आंबेडकरी राजनीती अपनी सांख बचाने में असफल हुई है !" क्योंकि आजतक मायावती की राजनीती को आंबेडकरी राजनीती के परिप्रेक्ष में ही देखा जा रहा था ! जो की असल में बिलकुल ही आंबेडकरी राजनीती से मेल नाही खाती थी ! अपने पुरे कार्यकाल में मायावती ने यह साबित कर दिया था की सत्ता की नशा उनपर इसकदर चढ़ कर बोल रही है की उस नशा में वो अपनों को रौंध कर भी आगे निकल जाये तो भी उसे कोई गम नहीं होगा ! आंबेडकरी विचारो कि राजनीती करणे कि बात तो अलग हि थी ! अपनी गलतियो को को छुपाने के लिये जिस कदर मायावती और कांशीराम ने बाबासाहाब को बदनाम किया उसकी सही सजा आज उत्तर प्रदेश कि जनता ने मायावती को दी है ! अगर मायावती बाबासाहाब के विचारो कि राजनीती करती तो आज यह दिन उसे देखणे को नही मिलता ! दलित राजनीती चाहे कितनी बार भी हार जाये आंबेडकरी राजनीती कभी नहीं हारेगी !
इसलिए दुनिया वालो, मेरे भारत वासियों और मेरे भाइयो मै एक बात आप लोगो को आज बताना चाहता हु की आज मायावती की हार यह दलित राजनीती की हार है !
जबतक आप दलित राजनीती की बात करोगे यह उच्चवर्णीय आपके सत्ता की यही दशा करेंगे और उसके लिए आपके पास कोई जवाब नहीं होगा !
आज की मायावती की हार यह दलित राजनीती की हार है ! आंबेडकरी राजनीती कि हार नही !
तो कृपा करके कोई यह न कहे की आंबेडकरी राजनीती कि हार हुई है ! हा अगर याह कहते हो कि दलित तानाशाही राजनीती कि हार हुई है तो मुझे कोई गम नही होगा !
------डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५ 

चळवळीचे मानसशास्त्र


चळवळीचे मानसशास्त्र
---डॉ. संदीप नंदेश्वर. 8793397275
विचारांची अस्पष्टता आणि बौद्धिक मागासलेपणामुळे माणसाला स्वतःच्या विश्वापेक्षा दुसरे काहीच चांगले दिसत नाही. कुठल्याही कल्याणकारी व मानवतावादी चळवळीसाठी ते धोकादायक आहे. कारण हजारो वर्षाआधी अश्याचप्रकारे बहुसंख्य समाजाला बौद्धिक मागासलेपणाने ग्रासले असल्यामुळे किंवा जाणीवपूर्वक त्यांच्यात बौद्धिक मागासलेपणा निर्माण केल्या गेल्यामुळे शोषणाची व्यवस्था निर्माण झाली होती. आणि त्यातूनच उच्च नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ विभागणी होऊन अस्पृश्यता जन्माला आली. आधुनिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सद्यस्थितीला तशीच परिस्थिती उच्चपदस्त, उच्चशिक्षित लोकांकडून वारंवार होतांना दिसून येत आहे. अश्या माणसांना कितीही समजविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी समजून घेण्याच्या मानसिकतेच्या पलीकडची पातळी गाठली असल्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची खट्याळ उत्तरे देण्याचा त्रास घेतील परंतु विचारांतर्गत आणि मानवी परिक्षेत्रात मांडलेली वर्गवारी (अस्पृश्यता) ही माणसे बाजूला सारू शकत नाही. मानवी जीवन सर्वच पातळ्यांवर (सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक) लढतांना एखाद्या पातळीला कक्षेच्या बाहेर ठेवणे निदान परिवर्तनवादी किंवा मानवतावादाच्या पुरस्कर्त्यांना न शोभणारे लक्षण आहे. अश्या परिस्थितीत या माणसांमध्ये एक तर वैचारिक अस्पष्टता आहे किंवा बौद्धिक मागासलेपणाचे ते लक्षण आहे असेच समजून घ्यावे. जीवन जगत असतांना एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढावे लागत असते. अश्याप्रकारे अनेक पातळ्यांवर लढण्याची कुवत जी व्यक्ती स्वतःजवळ बाळगते ती व्यक्ती उद्याच्या परिवर्तनाची शिलेदार ठरते. स्वतःसोबत इतरांच्या जीवनाला विकासाचा मार्ग प्रदान करते.
आंबेडकरी चळवळ बाबासाहेबांच्या समर्थ खांद्यावर एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढा देत यशस्वी मार्गक्रमण करीत राहिली. कारण तेव्हाचा समाज आपल्या अधिकारासाठी, न्यायासाठी झपाटलेला होता. परंतु त्याचसोबत जातीवाद आणि वर्णवादाने हिरावून घेतलेली मानवतेची ओळख प्राप्त करण्यासाठी तो अधीर झाला होता. सामुहिक कल्याण हाच त्यांचा मूलमंत्र होता. बुद्धाचाही तोच मूलमंत्र होता. परंतु आधुनिक समाज अधिकार आणि न्यायाने पूर्ण झाला आहे असे वाटू लागले आहे. त्यामुळे आताच्या चळवळी ह्या स्वार्थासाठी चालविल्या जात आहेत असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे. चळवळीचे मानसशास्त्र समजून न घेतल्याने कार्यकर्ते आणि समाज चळवळीपासून दूर लोटला जात आहे. निश्चित ध्येयाअभावी चळवळीची एकसूत्रता दुभंगली आहे. समाजासाठी एकोप्याने लढणारी सामुहिक शक्ती क्षीण होऊन त्याची जागा आता व्यक्तिगत शक्तीप्रदर्शनाने घेतलेली आहे. याला समाजाचा आणि चळवळीचा विकास म्हणायचा कि -हास म्हणायचा ? कारण व्यक्तिगत शक्तीप्रदर्शनाने कधीच सामाजिक कल्याणाची पातळी गाठता येत नाही. सामुहिक शक्ती आणि एकोपा हेच कुठल्याही चळवळीचे बलस्थान असते. इतिहासाच्या पानावर बाबासाहेबांच्या हयातीत आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या काही वर्षात आंबेडकरी चळवळीत दिसून आलेली सामुहिक शक्ती आणि एकोपा आधुनिक आंबेडकरी चळवळीत पुनःश्च्य मिळविण्यासाठी व्यक्तिगत शक्तीप्रदर्षनाला मूठमाती द्यावी लागणार आहे.
चळवळ ही समूहाच्या मान्यतेवर समाजाच्या आवश्यकतेनुसार आपली भूमिका बजावीत असते. ज्या समाजाचे प्रश्न सुटलेले आहेत. त्या समाजाला चळवळीचे गांभीर्य राहत नाही. परंतु जो समाज सदैव विकासाच्या मुख्य प्रवाहांपासून दूर ठेवला गेला त्या समाजाला चळवळीपासून फारकत घेणे शक्य नाही. त्यासाठीच चळवळ सदैव समाजाच्या प्रश्नांना घेऊन लढत असते. एकदाचे आंदोलन हे तात्कालिक ठरविता येईल. परंतु चळवळ ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. समाजाच्या अस्तित्वापर्यंत चळवळ टिकून राहते. आंदोलन मात्र इप्सित धेय्य पूर्ण झाले की बंद होते. कारण आंदोलनाला घडणा-या घटनेचा आधार असतो. मात्र चळवळीला विचार आणि तत्वज्ञानाचा मजबूत, खंबीर असा पाया असतो. ही वास्तवता डोळ्यासमोर असतांनादेखील आंबेडकरी चळवळीला गोठविण्यात आले. चळवळीची शक्ती क्षीण करण्यात आली. आंदोलनाचे रूप चळवळीला प्रदान करून चळवळीची व्यापकता कमी करण्यात आली. संपूर्ण समाजाच्या एकसंघतेला छिद्रे पाडून चळवळीचे रुपांतर गटातटातील आंदोलनात करण्यात आले. आणि त्यातूनच जगाच्या पातळीवर शोषित-पिडीत-वंचित समूहाला सम्यक क्रांतीच्या बळावर न्याय मिळवून देणारी आंबेडकरी चळवळ प्रतीद्वद्वात सापडली आहे.
पक्ष, राजकारण, आंदोलने, रस्त्यावरचे संघर्ष इ. पासून आंबेडकरी चळवळ आणि आजचा आंबेडकरी तरुण दूर राहू शकत नाही. तात्कालिक समस्या सोडविण्यात ते लाभदायक ठरते यात दुमत नाही. परंतु समाजाच्या क्रमीत विकासात आजपर्यंत या सर्व गोष्टींचा लाभ होऊ शकलेला नाही. आम्ही शिक्षण घेतले पण इतरांच्या शिक्षणसंस्थेमध्ये आणि आजही घेत आहोत. आम्ही नौक-या केल्या इतरांच्या अधिकारक्षेत्रात आणि आजही करीत आहोत. क्रमीत विकासाची कुठलेही साधने आपल्या समाजाने हातात घेण्याचा प्रयत्न का केला नाही ? आम्ही राजकारण हातात घेण्यासाठी संपूर्ण चळवळीला बरबाद केले. पण राजकारणासाठी लावलेली शक्ती जर आम्ही क्रमीत विकासाची साधने हातात घेण्यासाठी लावली असती. तर आज आंबेडकरी समूह स्वयंपूर्ण बनला असता. जयंती व तत्सम कार्यक्रमासाठी लाचारी पत्करून इतरांपुढे हात पसरण्याची गरज पडली नसती. स्वतःच्या बळावर हा समाज विकासाच्या प्रक्रियेत आघाडीवर असता. इतिहासात हे घडले नाही पण आताच्या आंबेडकरी तरुणांनी तरी शिक्षणसंस्था, उद्योग, कारखानदारी, स्वयंसेवी संस्था, बाजारपेठ, ही क्रमीत विकासाची साधने हातात घेण्यासाठी आपली शक्ती लावावी. तरच भविष्याची उभारणी करता येईल.
शाब्दिक युद्धासाठी माहीर झालेली माणसे वैचारिक संघटनांच्या माध्यमातून इतरांवर मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न करतात. आधुनिक आंबेडकरी चळवळीत युवकांचे असेच काही मानसिक शोषण होत आहे. रस्त्यावरच्या लढाईसाठी यांच्याकडून अपेक्षा करता येणार नाही असेच दिसते आहे. पण देशांतर्गत घडामोडींवर यांचे किती लक्ष आहे यावर सुद्धा प्रश्नचिन्हच आहे. देश्यांतर्गत प्रत्येक घडामोडीवर आंबेडकरी तरुणांचे लक्ष असायला पाहिजे. परंतु बाबासाहेबांच्या नावाने भाजीबाजारात बसलेल्या अश्या तरुणांच्या संघटना आपल्यासोबत इतरांचेही नुकसानच करीत आहेत. समाजाचा अंधार दूर करण्याच्या काळात एकदुसा-यावर फक्त आरोप करीत सुटलेले आहेत. याच कारणांमुळे आतापर्यंत चळवळीचे नुकसान झाले आहे. आणि पुढेही तेच होणार हे दिसत असतांना यांनी डोळे बंद करून घेणे बुद्धीला न पटणारे आहे. कुणाचीही सामंजस्याची भूमिका दिसून येत नाही.  काय भूमिका घेत आहेत ? काय करायला चालले ? याचे उत्तरही त्यांनीच द्यावी.
प्रत्यक्ष व्यक्तीचे मानसशास्त्र हे चळवळीच्या मानसशास्त्रापेक्षा वेगळे असते. तसेच चळवळीचे मानसशास्त्र हे सामाजिक मानसशास्त्रापेक्षा निराळे आहे. जेव्हा व्यक्तीचे मानसशास्त्र हे चळवळीच्या मानसशास्त्रावर वरचढ ठरते तेव्हा चळवळ लयाला जाण्यास सुरुवात होते. आणि जेव्हा चळवळीचे मानसशास्त्र व्यक्तीप्रवृत्त होते तेव्हा सामाजिक मानसशास्त्र विचार, कृती व सिद्धांतापासून परावृत्त होते. सामाजिक पातळ्या सर्वांना समान लक्षाने प्रेरित करणा-या असाव्या. त्यात आम्ही भेद करतो. हा गरीब, हा श्रीमंत, ही विभागणी करून समाजाच्या सामाईक न्यायाच्या लढ्याला दूर सारतो. श्रीमंत असो कि गरीब मानव म्हणून जन्माला येणा-या सर्वच समाज बांधवाला काही सामाईक पातळ्या गाठाव्या लागतातच. आम्ही व्यक्तिवादी विचार न करता जेव्हा सामाजिक पातळीवर येऊन त्याचा विचार करतो तेव्हाच त्याचे उत्तरही सापडते. व्यक्तिवादी गरजा आणि प्रश्न वेगळे असू शकतात परंतु सामाजिक गरजा जोपर्यंत सामाईक स्तरावर येत नाही. तोपर्यंत समाजाचा संघटीत लढा उभा होऊ शकत नाही. म्हणून जोपर्यंत व्यक्तीचे मानसशास्त्र सामाजिक मानसशास्त्रात परिवर्तीत होत नाही तोपर्यंत चळवळीचे निश्चित असे मानसशास्त्र आपल्या उद्देशात सफल होऊ शकत नाही. आजपर्यंत त्याचीच प्रचीती आंबेडकरी चळवळीला आलेली आहे.
व्यक्तीचे मानसशास्त्र हे स्वार्थाने प्रेरित असते. चळवळीचे मानसशास्त्र हे सामुहिक कल्याणाने प्रेरित असते. व्यक्तीचे मानसशास्त्र व्यक्तीला जगण्याची धडपड शिकविते. चळवळीचे मानसशास्त्र व्यक्तीला कसे जगावे याचे मार्गदर्शन करते. सामाजिक क्रांतीतून आंदोलन निर्माण होते. चळवळ निर्माण होत नाही. सातत्यपूर्ण समाजाच्या क्रांतीतून झालेली आंदोलने जेव्हा एका निश्चित विचार व तत्वज्ञानाच्या चौकटीत मानवी कल्याणाचा मार्ग पत्करतात तेव्ह्या त्याला चळवळीचे व्यापक रूप प्राप्त होते. त्यामुळे तात्कालिक सामाजिक क्रांतीतून झालेली आंदोलने चळवळ होत नाही. आज समाजाला एकत्र येण्यासाठी ध्येयाची गरज आहे. विचारांची गरज नाही. कारण आंबेडकरी समूहासाठी बाबासाहेबांचे विचार हेच एकमेव विचारपीठ आहे. मात्र माणसांनी आपापली सामाजिक ध्येय वेगळी निर्धारित केल्याने गोंधळ निर्माण झालेला आहे. 
स्वतःच्या क्षमतेविरुद्ध जाऊन कुठलीही लढाई जिंकता येत नाही. हे सर्वमान्य आहे. परंतु क्षमतेच्या चक्रव्युहात सापडून इतर पातळ्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. इतकेच. जगण्याच्या संघर्षात सर्वच पातळ्या गाठाव्या लागतात मग क्षमता असो अथवा नसो. जर जगायचे असेल तर. लढल्यानंतरच क्षमता सिद्ध होत असते. समाजातील प्रत्येक माणूस हा त्या समाजाचा घटक म्हणून वावरतांना जातीच्या आणि धर्माच्या निकषावर जेव्हा त्याची हेटाळणी होते तेव्हा श्रीमंती व गरिबी असा भेद दिसून येत नाही. कायद्याच्या चौकटीत सर्व समान असतांना कायद्यांची पायमल्ली होताना न्यायासाठी जेव्हा दुटप्पी भूमिका घेतली जाते तेव्हा कुठलीच सीमारेषा आडवी येत नाही. निदान आंबेडकरी समाजासाठी या समान दुव्यांना आम्ही ओळखले पाहिजे. आमच्या समाजाचे प्रश्न समान आहेत. विचार समान आहेत. ध्येय समान आहेत. श्रद्धा समान आहेत. आदर्श समान आहेत. परंतु वर्तमानातील निष्ठा दुभंगल्या असल्याने आम्ही व्यक्तिगत पातळीवर लढत आहोत. सामुदायिक पातळीवर जेव्हा आमचा लढा सुरु होईल तेव्हा चळवळीच्या मानसशास्त्राला बळ प्राप्त होईल.
देशपातळीवर आंबेडकरी समाजाची संघटीत शक्ती भंग झाली असतांना सुद्धा आम्ही श्रेयाचे आणि स्वार्थाने प्रेरित होऊन समाज आणि चळवळीकडे बघणार असू तर चळवळीसाठी हा अत्यंत धोकादायक काळ आहे. आमचे स्वार्थ, निष्ठा बाजूला सारून बाबासाहेबांच्या प्रेरणांना केंद्रीभूत ठेऊन एकत्रित संघर्षाला तयार व्हावे लागणार आहे. आमच्या अवती भवती निर्माण झालेले गट आणि संघटनांचे जाळे बाजूला फेकून समाजाच्या हितासाठी संघटीत निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. मानवी कल्याण या एकाच ध्येयाने प्रेरित आंबेडकरी चळवळीला लागलेले फुटीरतावादाचे काटेरी मुकुट उतरवून संघर्षाच्या मैदानात एकत्र लढावे लागणार आहे. त्यासाठी व्यक्तिवादाच्या फंदात न पडता समाज निर्धारित निर्णय प्रक्रियेचा अंगीकार करावा लागणार आहे. समाजमान्यता या एकाच निकषावर चळवळीचे सरसेनापती ठरवून त्या सरसेनापतीच्या नेतृत्वात आम्हाला सैनिक म्हणून संघर्षाच्या मैदानात उतरावे लागणार आहे. आजपर्यंत नकाराची घंटा वाजवून अनेक चुली मांडल्या गेल्या. आता स्वीकाराची उदारता दाखवून एकाच घरात सुखाने गुण्यागोविंदाने नांदून दाखवावे लागणार आहे. चळवळीचे मानसशास्त्र हे एक नेतृत्व आणि एकसंघ समाज याच सूत्रावर टिकून राहील.
---डॉ. संदीप नंदेश्वर. 8793397275

Monday, 27 February 2012

पराभवाची नैतिक जबाबदारी समाजाची


पराभवाची नैतिक जबाबदारी समाजाची
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.  ८७९३३९७२७५

महाराष्ट्रात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपरिषदा आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका झाल्या आहेत. कुणाला किती ? का ? आणि कश्या ? जागा मिळाल्या याची गोळाबेरीज करण्यात सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांची नेते मंडळी व्यस्त झाली आहे. कुणाचे कमी झाले, कुणाचे वाढले, कोण कुणासोबत गेला याचा हिशोब करता करता सत्तेसाठीची जुळवाजुळव सुरु झाली. हे सर्व करतांना काहींनी जुने संबंध नाकारून, कुठे जवळ घेऊन, कुठे लिलाव करून, तर कुठे पळवून लावून, तर काहींनी काहीही झाले तरी आम्ही सोबतच अशी भूमिका घेऊन सत्तेचे समीकरण जुळविण्यात आले. काही ठिकाणी ते जुळविले जात आहे. यात सर्वसामान्य मतदारांना कुठेच विचारात घेतले जात नाही. सामाजिक अभिवृत्तीला बाजूला सारून सारेच राजकीय पक्ष सत्तेचे मालक होऊ पाहत आहेत. जनतेने दिलेला कल हा त्यांच्या निवडीचा कल होता, की पैशाचा कल होता. की आणखी कुठल्या समीकरणाचा कल होता हे सप्रमाण लोकशाहीमध्ये सिद्ध होऊ शकणार नाही. परंतु अंदाज घेतला गेला तर निश्चितच लक्षात येऊ शकते.
सकस आणि सर्वसमावेशक लोकशाही व्यवस्थेची कल्पना संविधानकारांनी केली होती. ती फक्त कल्पनाच नव्हती तर संविधानरूपी दस्ताऐवज हे त्याचे वास्तववादी चित्रण/आराखडा होय. या आराखड्याला वास्तवात उतरविण्याची किमया या गणराज्याच्या ६२ वर्षात होऊ शकली नाही आणि आता ज्यांच्या हातात ही सत्ता पुन्हा एकदा विसावली जाणार आहे ते राजकीय पक्ष या आराखड्याला वास्तवात उतरविण्यासाठी किती प्रयत्नशील आहेत. याचा विचार भारतीय जनतेने करायला पाहिजे होता. परंतु या सर्व निवडणुकांमध्ये सर्वसामान्य मतदारानेही तो विचार केला असे दिसून येत नाही.
भारतीय लोकशाहीत वर्तमानातील पक्ष, राजकीय नेते मंडळी आणि कार्यकर्ते कुठल्या निकषावर काम करीत आहेत हे भारतीय नागरिकांना चांगल्याने अवगत आहे. त्यामुळेच लोकशाहीवर आणि वर्तमान व्यवस्थेवर बोटे मोडणारी माणसे गल्लीबोळात निर्माण होतांना दिसून येत आहेत. प्रतिगामी माणसे व समाज यांच्याकडून ते होणारही हे निर्विवाद सत्य आहे. कारण त्यांना ही माणसे बदलायची नाहीत. कारण यांचेच भांडवल त्यांना पुढे कामी पडणारे आहे. त्यांना ही व्यवस्थाच बदलायची आहे. आणि ही व्यवस्था बदलून पुन्हा एकदा याच वर्तमानातील राजकीय लुटारुंच्या माध्यमातून त्यांचेच भांडवल करून शोषित-पिडीत-मागास समाजाला वेठीस धरायचे आहे. संविधान बदलायचे आहे. जो या वर्तमानातील लुटारूंना वेळोवेळी रोखू पाहतो आहे. शोषित-पिडीत-मागास वर्गाला न्याय देण्यासाठी यांना बाध्य करतो आहे. ज्यामुळे यांची जातीवादी ध्येयधोरणे पूर्ण होऊ शकत नाही. मतदानाच्या पेट्या कुणाच्या बाजूने फुटल्या ? याचे या वर्गाला काहीही देणेघेणे नाही. कारण भारतात परिवर्तनवाद्यांच्या हातात सत्ता येणार नाही यावर यांचा विश्वास आहे. त्यामुळे कुणीही आला तरी तो यांचाच शिपाई असेल, यांचाच भाऊ असेल. आणि यांच्याच इशा-यावर नाचणारा माकड असेल. मतदार यापासून किती धडा घेणार? परिवर्तनवादी यापासून काय शिकणार ? व त्या आधारावर आपली पुढली राजकीय वाटचाल आणि ध्येयधोरणे हा परिवर्तनवादी वर्ग कशी ठरवणार ? यावर पुढल्या सत्तावादी निकालाचा कल ठरणार आहे.
भारतात परिवर्तनवाद्यांचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष, मार्क्सवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्याकडे बघितल्या जाते. आजतागायत रिपब्लिकन पक्षाच्या हातात सत्ता आली नाही. काही राज्य वगळता मार्क्सवादी पक्ष आपला राजकीय प्रभाव इतर राज्यांवर पाडू शकला नाही. समाजवादी पक्षांनी काही तुरळक उदाहरण सोडले तर सत्तेसाठी वारंवार आपली भूमिका बदलत गेले. मात्र केंद्रीय सत्तेच्या परिघात कधी येऊ शकले नाही. हे वास्तव स्वीकारतांनाच आपल्याला हे लक्षात येईल की कधी सत्तेच्या परिघात तर कधी सत्तेच्या परिघाबाहेर राहून या सर्व परिवर्तनवादी पक्षांनी आपले नियंत्रण सत्तावाद्यांवरून जराही कमी होऊ दिले नाही. भारतीय संविधान अंमलात आल्यानंतरच्या ६० वर्षात शोषित-पिडीत-मागास वर्गाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक रचनेत जो काही थोडाफार आमुलाग्र परिवर्तन झालेला दिसतो ते या परिवर्तनवादी पक्षांच्या नियंत्रणामुळेच दिसून येतो. पण आज तर दिवसेंदिवस परिवर्तनवाद्यांचे नियंत्रणही कमी होऊ लागले आहे. या पक्षांच्या हातात सत्ता तर आली नाही परंतु विरोधी पक्षाची भूमिकाही आता यांच्या हातातून निसटतांना पाहून भारतीय लोकशाही धोक्यात येत आहे. असे निर्विवाद दिसून येते. कारण यानंतरची सत्ता ही तर ज्यांच्या हातात होती त्यांच्याकडेच राहील परंतु नियंत्रणाची, विरोधी पक्षांची भूमिकाही त्यांच्याच पदरात पडल्याने "चोर चोर मौसेरे भाई" अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि मग शोषित-पिडीत-मागास समाजाच्या उत्थानाचा मार्ग बंद झाल्याशिवाय राहणार नाही. संविधानाने निर्धारित केलेली कल्याणकारी राज्याची संकल्पना यांच्या विषारी बहुपाश्यात चुरगाळली जाऊन सर्वसामान्य बहुजन वर्गाला मातीमोल करण्याचा जातीवादी, धर्माधिष्ठित राजकीय पक्षांचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा होईल.
रिपब्लिकन पक्ष, मार्क्सवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्याकडून जश्या अपेक्षा केल्या गेल्या त्या सर्व अपेक्षांवर आता पाणी फिरले आहे. संविधान निर्मितीनतरच्या काही वर्षानंतरच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या मार्क्सवादी, समाजवादी व समविचारी पक्ष संघटनांना रिपब्लिक सिद्धांताच्या आधारावर "भारतीय रिपब्लिकन पक्ष" या राजकीय पक्षाची निर्मिती करण्याचा संकल्प केला होता. तो त्यांच्या हयातीत पूर्ण झाला असता तर आजची देशाची परिस्थिती काही वेगळी दिसून आली असती. आजचे राजकीय चित्र काही वेगळे असते. परंतु जे झाले नाही त्यावर आता विचार करून काहीही लाभ होणार नाही. आजच्या वास्तवाला स्वीकारून भविष्याची वाट निर्धारित करता येईल का ? याचाच विचार आता व्हायला पाहिजे. आणि आजचे वास्तव असे आहे की, मार्क्सवादी पक्ष आपले विचार, सिद्धांत आणि कृती यांची योग्य सांगड घालण्यात अपयशी ठरले आहेत. वेळोवेळी बदलणारी राजकीय भूमिका ही मार्क्सवाद्यांच्या मूळावर बसली. तशीच राजकीय लाचारी ही रिपब्लिकन पक्षाच्या लयालाही कारणीभूत ठरली. समाजवादी पक्षांनी तर ते समाजवादी आहेत की भांडवलवादी आहेत, की जातीवादी, धर्मवादी आहेत हेच इथल्या समाजाला कळू दिले नाही. त्यामुळे समाजवादाचा धिंगाणा कधीच एका वाटेने चालला नाही.
रिपब्लिकन पक्षाकडून केल्या गेलेल्या अवास्तव अपेक्षा, घरच्याच दुष्मनांनी केलेले हमले आणि दूरदर्शी नेतृत्वाचा अभाव यामुळे सामाजिक आंदोलनात अग्रेसर असतांना सुद्धा रिपब्लिकन पक्ष भारतीय राजकारणात अस्पृश्य म्हणूनच गणल्या गेला. त्यामुळे या पक्षाची जी वाताहत झाली ती सर्वांना माहित आहे. राजकीय लाचारीचा कळस झाला असतांना देखील या पक्षांच्या नेत्यांचा स्वाभिमान उंचावला जाऊ नये, त्यांचा स्वाभिमान जागा होऊ नये हे मोठे आश्चर्याचे आहे. असे असतांनासुद्धा हे सर्व परिवर्तनवादी, पुरोगामी पक्ष आपली संघटीत शक्ती एकत्र करून नव्या राजकीय परिवर्तनाची सुरवात न करता स्वगृही बेगण्या लावण्याचेच काम करीत आहेत. या पक्षांकडून बहुजन समाजाला अनेक अपेक्षा आहेत. पण वाट आहे ती फक्त या परिवर्तनवादी पक्षांमधून येणा-या एखाद्या चक्रवर्ती नेत्याची. जो या सर्व समान दुव्यांना एकत्र करून बहुजनांच्या, भारतीय नागरिकांच्या कल्याणाचा संविधानरुपी दस्ताऐवज आपल्या समर्थ खांद्यावर पेलून धरेल. तसे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाजवळ आहे. परंतु डोळसपणे हे परिवर्तनवादी पक्ष आणि समाज त्या नेतृत्वाला का स्वीकारत नाही हे न उकलणारे कोडेच आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर महाराष्ट्रात मार्क्सवादी आणि समाजवादी पक्षांचा कुठलाही प्रभाव नाही. परंतु रिपब्लिकन पक्ष इथल्या मातीत रुजला आहे. तो इथल्या जनमानसात विसावला आहे. परंतु गटबाजी, फाटाफूट आणि नेतृत्व संघर्षाने रिपब्लिकन पक्ष स्वतःच स्वतःच्या अंतयात्रेत सामील होतांना दिसून येतो. या पक्षाची वारंवार होणारी पीछेहाट महाराष्ट्रातील पुरोगामी, परिवर्तनवादी समाजासाठी चिंतेची बाब ठरला आहे. अनेक प्रयत्न, अनेक प्रयोग, अनेक वाटा सर्व काही करून या पक्षाच्या पदरी फक्त आणि फक्त निराश्याच हाती येते. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे ४ मुख्य गट आहेत असे म्हणता येईल. दादासाहेब गवई यांच्या नेतृत्वात असणारा गट आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्याकडे असणारा रिपब्लिकन गट आता शेवटचे झटके घेत आहे. मग उरतात ते रामदास आठवले याच्या नेतृत्वात काम करणारा जो सध्या शिवसेना-भाजपा महायुतीच्या तबेल्याला बांधला गेला आहे. त्या तबेल्यात चारा मिळाला काय आणि नाही मिळाला काय रामदास आठवलेला तो तबेला सोडून जाण्याची परवानगी जणू मातोश्रीवरूनच घ्यावी लागेल. असे चित्र निर्माण झाले आहे. महायुतीचा फार्स उभा करून सत्तेची स्वप्न बघणारा आठवले गट मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये १ जागा घेऊन तोंडघशी पडतो तरी राज्यसभेच्या तिकीट खिडकीवर पहिल्या रांगेत उभे राहता यावे म्हणून आठवले त्या खिडकीवर आतापासून उभे झाले आहेत. राजकीय लाचारीचा इतका किळसवाना प्रयोग समाजाच्या आणि कार्यकर्त्यांच्या कसा पचनी पडतो ? ते त्यांच्या कार्यकर्त्यांनाचा विचारावे लागेल. कारण याचे उत्तर बहुतेक त्यांच्याकडेच असावे.
मग उरतो तो फक्त एक गट जो भारिप-बहुजन महासंघाच्या नावाने प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर या दूरदर्शी, अभ्यासू नेतृत्वाच्या हातात परिवर्तनवादी आणि बहुजन वर्गाच्या अस्तित्वासाठी स्वाभिमानाची लढाई लढून दिवसेंदिवस यश संपादन करीत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात बाळासाहेबांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघाला यश संपादन करता आले. अनेक ठिकाणी सत्तेवर विराजमान होता आले. परंतु या पक्षाला एक अभिशाप लागलेला आहे. परिवर्तनवादी आणि आंबेडकरी समाज अजूनही या पक्षाकडे आशाळभूत नजरेने न बघता वारंवार दुर्लक्षित करीत आहे. इथल्या सत्तावाद्यांनी या पक्षाविषयी आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाविषयी आखलेल्या षडयंत्राला समाज बळी पडत आहे. आणि त्यामुळेच बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्षाला खिंडार पडत आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका व महानगरपालिका यांच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी घवघवीत यश संपादन करून देखील कुठल्याही प्रसिद्धी माध्यमांमधून भारिप बहुजन महासंघाची चर्चा होत नाही. मात्र १ जागा जिंकून आणणारे आठवले आणि बसपा प्रसिद्धी माध्यमांच्या नजरेच्या आड जात नाही. यावरून हे सिद्ध होते की आठवले किंवा बसपा हे इथल्या सत्तावाद्यांसाठी, जातीवाद्यांसाठी, धर्मवाद्यांसाठी धोक्याचे नाहीत. भविष्यकाळात सत्तावाद्यांची सत्ता हिसकावून लावण्याची ताकत भारिप-बहुजन महासंघ आणि बाळासाहेब यांच्याकडे आहे. आणि त्यामुळे त्यांना व त्यांच्या पक्षाला प्रसिद्धी मध्यमापासून दूर ठेऊन समाजापासून दूर सारण्याचा प्रयत्न गेल्या कित्त्येक वर्षापासून सुरु आहे. महाराष्ट्रात भारिप बहुजन महासंघाचे बसपा पेक्षा जास्त उमेदवार निवडून आले असले तरी महाराष्ट्रात आता जणू बसपाची सत्ता येणार अश्या तो-यात प्रसिद्धीमाध्यमे वावरू लागली आहेत. त्यामुळे बसपा चे कार्यकर्ते सुद्धा त्याच आविर्भावात स्वतःची पाट थोपटून घेत आहेत. वास्तव मात्र वेगळेच आहे.
या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वाटचालीकडे समाजाचे लक्ष लागून होते. परंतु रिपब्लिकन पक्षातील नेतृत्वसंघर्ष आणि सत्तेसाठीची लाचारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याने समाजाची निराशाच झाली. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी आणि आंबेडकरवादी समाजाने प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पर्याय नसल्याने बसपा कडे वळले गेले. नागपूर महानगर पालिकेत बसपा ला 12 जागा निवडून आणता आल्या.  हे बसपाची शक्ती वाढल्यामुळे किंवा महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजाने बसपला स्वीकारले आहे यामुळे नव्हे तर प्रस्थापितांना झिडकारून रिपाईच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी समाजाने केलेल्या दुहेरी रणनीतीचा भाग आहे. समाज रिपब्लिकन पक्षाविषयी अजूनही आशादायी आहे. समाज वाट पाहत आहे. नेतृत्वाची, स्वाभिमानी पर्यायाची. समाजाने आखलेल्या रणनितीतून समाज बाहेर पडण्याआधी समाजासमोर आता रिपाई चा एकमेव पर्याय इथल्या नवतरुणांनी ठेवला पाहिजे. भारिप बहुजन महासंघ आणि बाळासाहेब हा एकमेव पर्याय आंबेडकरी समाजासमोर आणि परिवर्तनवादी बहुजन समाजासमोर उभा राहू शकतो. नागपूर महानगर पालिकेत भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला गेला असता. तर बसपला नागपूर मध्ये 12 उमेदवार निवडून आणता आले नसते. भारिप बहुजन महासंघाला पूर्व विदर्भात आणि मुळात नागपूर मध्ये योग्य पदाधिकारी न लाभल्याने इथे बाळासाहेबांना आपले पाय रोवता आले नाही. अन्यथा नागपूर हाच भारिप बहुजन महासंघाचा बालेकिल्ला बनविता आला असता.
काळ कधीच थांबत नसतो. प्रत्येक प्रश्नाला उत्तरही काळच देत असतो. भारतातील राजकीय परिस्थिती या समाजाला खास करून शोषित-पिडीत-मागास समाजाला कुठल्या दिशेने घेऊन जाते,  हे परिवर्तनवादी आणि रिपब्लिकन पक्षांच्या भविष्यकालीन वाटचालीवर निर्भर राहणार आहे. आजपर्यंत नेतृत्व संघर्षाने समाज विभाजित झाला त्यामुळे आमची राजकीय संघटीत शक्ती अबाधित राहू शकली नाही. त्यासाठी नेत्यांच्या एक्याचेही प्रयोग अनेकदा करण्यात आले. थोड्याफार प्रमाणात ते यशस्वी होऊन पुन्हा निराशाच पदरी पडली आहे. त्यामुळे आता दुभंगलेला समाज, विघटीत झालेला, विभाजित झालेला समाज एकत्र, एकसंघ करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नेतृत्वांना बाजूला सारून पुन्हा समाजाला एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत एकसंघ करण्याची वेळ आली आहे. रिपब्लिकन सिद्धांताला धरून राजकीय निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आणि ही जबाबदारी इथल्या आंबेडकरी तरुणांची आहे. या समाजातल्या सुशिक्षित तरुणांची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आणि स्थापलेला एकमेव पर्याय समाजाला देऊन समाज त्या पर्यायाच्या पाठीशी उभे करण्याची जबाबदारी आता तरुणांची आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अश्या प्रत्येकच क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्काचे घर दिले आहे. त्या सर्व संस्था संघटनांना समाज रेट्याने एकत्र आणून समाजाची नव्याने वाटचाल सुरु करावी लागणार आहे. पराभूतांची विजयी मिरवणूक काढण्यापेक्षा पराभवाची नैतिक जबाबदारी समाजाने घेऊन उद्याच्या विजयाची मुहुर्तमेढ आजच्या सामाजिक एकत्रीकरणाच्या निर्णयातून करावी लागणार आहे.

डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.  ८७९३३९७२७५ 

Saturday, 18 February 2012

रिपब्लिकन जनता ऐक्य संदेश स्कूटर रैली (दीक्षाभूमि से चैत्यभूमि) दि. १४-०४-२०१२

रिपब्लिकन जनता ऐक्य संदेश स्कूटर रैली  (दीक्षाभूमि से चैत्यभूमि)
दि. १४-०४-२०१२

भारत का हर नागरिक खुद को रिपब्लिकन कहने में गर्व महसूस करना चाहिए था ! लेकिन आज इससे विपरीत परिस्थितिया देखने को मिलाती है ! डॉ. बाबासाहब आंबेडकर जी ने रिपब्लिक सिंद्धांत पर चलने वाले राजनितिक पार्टीका सपना देखा था ! आंबेडकरवादियोने इस सपने को साकार करने की कोशिश भी की लेकिन समाज संघटित न होने के कारन नेताओ पर नियंत्रण नहीं रह सका ! आज तो रिपब्लिकन ये नाम सिर्फ और सिर्फ आंबेडकरवादियों के लिए लिया जाता है ! इसलिए समाज को संघटित कर आंबेडकरी आन्दोलन को एक सही दिशा में चलने के लिए आंबेडकरी समाज के युवा वर्ग को साथ लेकर पुरे महाराष्ट्र में दि. १४ एप्रिल २०१२ से "रिपब्लिकन जनता ऐक्य संदेश स्कूटर रैली  (दीक्षाभूमि से चैत्यभूमि)" का आयोजन किया गया है ! आप सभी से विनती है की आप सभी इस कार्य में तन, मन, धन से समर्पित होकर हमारे समाज के भविष्य को सुरक्षित करने में अपना योगदान दे !

रिपब्लिकन जनता ऐक्य संदेश स्कूटर रैली  (दीक्षाभूमि से चैत्यभूमि) के
धेय्य और उद्दिष्ट
१.    भारतीय संविधान के बारे में भारतीय समाज में जागरूकता बढ़ाना !
२.    आंबेडकरी समाज का ऐक्य बनाना !
३.   मागासवर्गीय/ अनुसूचित जाती/जनजाति/ अल्पसंख्यांक समुदाय के लोगो को उनके हक़ और अधिकार के बारे में जागरूक करना !
४.   आंबेडकरी युवा वर्ग को संघटीत करना और रिपब्लिकन पार्टी की संघटित नीव रखना. लेकिन उसके पहले विघटित हुए समाज को इकट्ठा करना !
५.   देश की राजनीतिक व्यवस्था और अभी की अवस्था के बारे में लोगो में जागरुकता बढाना !
६.   डॉ. बाबासाहाब आंबेडकर के संकल्प के अनुसार "मै प्रथम भारतीय, और अंत में भी भारतीय" यह संकल्प समाज में प्रचारित और प्रसारित करना !
7.  आंबेडकरी समाज में सामाजिक, आर्थिक, राजनितिक, सांकृतिक और शैक्षणिक ढांचे की नीव रखना !
८.  बेरोजगार आंबेडकरी युवा वर्ग के लिये व्यावसायिक तौर पर मौलिक ढाचे की नीव रखना !

इन सभी धेय्य और उद्दिष्ट को लेकर यह संदेश रैली महाराष्ट्र के सभी तहसील, नगर और जिल्हो से गुजरेगी. इस रैली का समापन मुंबई में चैत्यभूमि पर होगा !

सूचना :- इस मौलिक कार्य में आप जिस किसी प्रकार से सहयोग करना चाहते है वो कर सकते है ! आपके सुझाव भी आमंत्रित है ! इस रैली को सफल बनाने के लिए हर एक सदस्य के सुझाये गए उपायों पर अमल किया जायेगा ! धेय्य और उद्धिष्ट में भी बदलाव किया जा सकता है ! 

लोकशाही विश्वविद्यालयातील अनुतीर्ण विद्यार्थी


लोकशाही विश्वविद्यालयातील अनुतीर्ण विद्यार्थी
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

व्यवस्थेच्या परिघातून जातांना प्रत्येकालाच अग्निदिव्याचा सामना करावा लागतो. यश किंवा अपयश याशिवाय दुसरे कुठलेही निकाल त्यातून मिळत नाही. भारतीय व्यवस्थेच्या संदर्भाने बोलायचे म्हटले तर मात्र यशापयशाच्या पातळ्या विरघडून पडतात. कारण एकीकडे व्यवस्था यशस्वी ठरली असा जागतिक अनुमान लावला जातो तर दुसरीकडे स्वकियांकडून व्यवस्थाच कोलमडली आहे अशी आगडोंब ठोकली जात आहे. प्रश्न काहीही असो उत्तर एकाच आणि अनेक उत्तरांचा एकाच प्रश्न अशी विचित्र परिस्थिती आज देशांतर्गत हालचालींवरून दिसून येत आहे. संविधानाच्या रूपाने देशांतर्गत व्यवस्थेला नावारूपास आलेला अभ्यासक्रम बहाल करण्यात आला असला तरीही भारतीय लोकशाहीच्या विश्वविद्यापिठातून कल्याणकारी लोकशाहीचा अभ्यासक्रम चालविला जात नाही हि खरी या देशाची शोकांतिका आहे.
                                                                               
माणूस मोठा व्हावा. माणसांचे कल्याण व्हावे. माणूस म्हणून माणसांची ओळख निर्माण व्हावी. प्रत्येकाला न्याय मिळावा. प्रत्येकाचा सन्मान व्हावा. संधी पासून कुणीही अलिप्त राहू नये. या ध्येय आणि उद्धीष्टांना अनुसरून उभी झालेली भारतीय लोकशाही या विश्वविद्यालयातील अनुतीर्ण विद्यार्थ्यांनी मोडीत काढली आहे. व्यवस्थेचे यशापयश हे ती व्यवस्था चालविण-यांवर अवलंबून असते. व्यवस्थेवर नाही. हे साधे सोपे सूत्र अवगत असतांनाही आम्ही वारंवार लोकशाही विश्वविद्यालयाच्या कल्याणकारी अभ्यासक्रमात अनुतीर्ण का होत आहोत ? याचा शोध आता प्रत्येकाने घ्यायचा आहे.

भारतीय लोकशाही ख-या अर्थाने एक विश्वविद्यालय आहे. परंतु हे विश्वविद्यालय ज्यांच्या माध्यमातून चालविले जाते ते कर्मचारीरूपी भ्रष्टाचारी वर्ग आणि निर्णय निर्धारण प्रक्रियेत सहभागी असणारे उमेदवाररुपी राजकारणाचे ठेकेदार आणि या ठेकेदारांना निविदा काढून निवडून देणारे निवड समितीरुपी भारतीय नागरिक हे कुठल्या आधारावर निवड करत आहेत. याचा गोषवारा घेणे आवश्यक ठरले आहे. जातीचा निकस हा तर यांच्या विषारी रक्ताचाच नमुना आहे. एडस सारखा महाभयंकर विषारी रोग जरी यांच्या रक्तात असला तरी उमेदवार हा जातीचा आहे म्हणून त्याला पहिली पसंती दिली जाईल. इतकी कुबुद्धी भारतीय नागरिकांमध्ये जीवाणू पसरावे तशी यांच्या रक्तातून झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीच्या विश्वविद्यालयात फक्त काही नवे वगळली तर ९९ % विद्यार्थी अनुतीर्णच झालेली आहेत. इथे पास होण्यासाठी वशिला दिला जातो. जात आणि धर्म हा पहिला हप्ता असतो पण ऐन निवडीच्या दिवशी खोके पोहचविले जातात. खोके देणारा देतो घेणारा घेतो. मग खोके देणारा पुढील ५ वर्ष खोके जमा करतो आणि घेणारा गप्प बसतो. इथे शिक्षण, योग्यता, कार्यक्षमता कशाचाच निकष लागत नाही. त्यामुळे अडाणी विद्यार्थी कल्याणकारी अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत प्रवेश करतात आणि होत्याचे नव्हते करून टाकतात.

भारतीय लोकशाहीच्या विश्वविद्यालयात आजपर्यंत प्रत्येकच (अपवाद वगळून) अनुतीर्ण होत आला आहे. असे का होते ? संविधानाच्या रूपातील अभ्यासक्रम पेलविला जात नाही की तो अभ्यासक्रम समजून घेऊन अग्निपरीक्षा देण्याची कुवत आमच्या उमेदवार विद्यार्थ्यांमध्ये नाही. जातीच्या आणि खोक्याच्या निकषाने यांनी यांची कुवतच घालवून टाकली आहे. पण त्यासोबतच मताच्या बीजगणितात आम्ही आमचे सर्व विषय गमावून बसलेलो आहोत. मतांच्या बीजगणितापेक्षा कल्याणाचे भूगोल, संधीचे समाजशास्त्र, समानतेचे भाषाशास्त्र आणि विकासाचा इतिहास आम्ही जास्त लक्षात घेणे गरजेचे होते. परंतु या विषयांकडे इथल्या नागरिकांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे आमचे उमेदवाररुपी विद्यार्थी या विषयापासून वंचितच राहिले आणि मतांच्या बीजगणितात सरस ठरले. त्यामुळे महत्वाचे विषय मागे पडत जाऊन त्यात संपूर्ण समाजच भरडत गेला.

राजकीय पक्षाचे वारूळ आज इतके फोफावत चालले आहे की त्यामुळे लोकशाहीचे शिक्षण घेतले नाही तरी चालेल, संविधानाचे अभ्यासक्रम पूर्ण केले नाही तरी चालेल, मात्र पैसा, जात आणि धर्म या तीन पदव्या ज्यांच्या जवळ आहेत तोच खरा लोकशाही विश्वविद्यालयाचा उमेदवार अशी जणू परंपराच आम्ही निर्माण करून टाकली आहे. भारतीय सामाजिक परिस्थिती आणि एकंदर सामाजिक वातावरण लक्षात घेतले तर ही परंपरा कितपत योग्य आहे ? याचा शोध आणि बोध घेतला जाऊ शकतो. राजकीय पक्षांचे हे बुजगावणे या व्यवस्थेला गिळंकृत करतील अशी पुसटशी कल्पनासुद्धा संविधानकारांनी केली नसावी. स्वतंत्र, स्वयंभू, सर्वसंपन्न, सर्वमान्य, सर्वश्रुत, सार्वकालिक संविधानाची मांडणी करतांना जगातील लोकशाही व्यवस्थांचे हे नंदनवन व्हावे अशी स्वप्ने संविधानकरांनी पाहीली होती. परंतु लोकशाही व्यवस्थेचे हे विश्वविद्यालय अनुतीर्णांचे कारखाने आम्ही कसे बनविले ? याचा विचार करण्याची गरज आता भारतीय नागरिकांवर येऊन पडलेली आहे.

भारतीय लोकशाही विश्वविद्यालयाचे यश टिकवून ठेवण्याची जबाबदारी जशी इथल्या कर्मचा-यांची आणि सत्ताधा-यांची होती तशीच हे कर्मचारी आणि सत्ताधा-यांची निवड करणा-या इथल्या जनतेची सुद्धा होती. कारण आम्हीच त्यांची निवड केली होती. फक्त या अनाडी आणि अनुतीर्ण सत्ताधा-यांना दोष देऊन चालणार नाही तर अपयशाची नैतिक जबाबदारी ही आम्हाला सुद्धा घ्यावी लागणार आहे. "दाताने ओठ चावला गेला तर दोष कुणाला द्यायचा "? तो दोष आमचा आहे. तो दोष आमच्यात नसलेल्या कुवतीचा आहे. तो दोष आम्ही केलेल्या कृतीचा आहे. तो दोष आमच्यामधल्या अज्ञानाचा आहे. आमच्यामध्ये निवड क्षमता नाही याचा तो दोष आहे. अन्यथा या विश्वविद्यालयातील उमेदवाररुपी प्रत्येकच विद्यार्थी जगाचा आदर्श बनला असता. मागील 60-70 वर्षात काय मिळविले ? आणि काय गमाविले ? याचा मागोवा घेण्यात व्यस्त राहून भविष्याला ताटकळत उभे ठेवण्यात वर्तमानासोबत भविष्यालाही आम्ही संपविणार आहोत. आता गरज आहे की आम्ही आमचे उमेदवार कुठल्या प्रक्रियेद्वारे निवडतो ? कुठल्या निकषावर आम्ही त्यांची निवड करतो ? भारतीय नागरिक म्हणून भारतीय लोकशाही विश्वविद्यालयातील उमेदवार निवड समितीचा सदस्य अशी भूमिका बजावतांना आम्ही कुठली भूमिका घेता आणि कुठले निर्णय घेतो त्यावर आपल्या लोकशाही विश्वविद्यालयाचे भविष्य निर्धारित होणार आहे.

भारतीय लोकशाही विश्वविद्यालयात प्रवेश करून राष्ट्रपती, पंतप्रधान पदाची स्वप्ने बघणारे हजारो लाखो विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देतात. काही उत्तीर्ण होतात तर काही अनुतीर्ण परंतु नैतिक सत्तेच्या परिपाठात सारेच नापास ! कारण निवडीच्या कसोट्या पूर्ण करणारा कधी आम्ही निवडला नाही आणि कुठल्याच कसोटीत न बसणारा  आम्ही कधी निवडीपासून दूर ठेवला नाही. त्यामुळे कुवत असणारा कमकुवत तर झालाच पण त्यासोबत कुवत नसणा-याने आम्हालाही कमकुवत बनवून टाकले आहे. ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. आमच्या निवडीचे निर्णय आम्हालाच बदलावे लागणार आहे. "Power corrupt man but absolute power corrupt system" हे आम्हाला चांगल्याने अवगत आहे. त्यामुळेच आम्ही  बंदराच्या हातात कोलीत देऊन आम्ही स्वतःच्या पार्श्वभागावर आग लावून घेतली आहे. म्हणून जळतो कोण ? आणि जळतो कोण ? हे सांगण्याचे धाडसही आमच्यात राहिलेले नाही. त्यापेक्षा Resposibility makes the Acountability and Acountability makes the society याला आम्ही का महत्व देत नाही. आमचे विद्यार्थी हे उत्तरदायी का नाहीत ? याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
 
आज दिवसागणिक भारतीय लोकशाही विश्वविद्यालयाचे वर्गरूपी राजकीय पक्ष निर्माण होत आहेत. बंदरांची पिलावळ रानमेवा सोडून शहरी सुखामेवा खाण्यासाठी इकडून तिकडे वारंवार कोलांडउड्या मारीत आहेत. सत्ता माणसाला भ्रष्ट करते परंतु निरंकुश सत्ता व्यवस्थेला भ्रष्ट करते. आम्ही काहींच्या हातात अशीच निरंकुश सत्ता सोपविल्याने संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट बनली. राजकीय शहाणपण आणि राजकीय समज यांच्या अभावाने भारतीय समाज पुरता पोखरला गेला आहे. भारतीय संविधानाने दिलेली लोकशाही आणि त्यासाठी करावे लागणारे राजकारण यांची सांगड घालतांना कुठेतरी भारतीय समाज अयशस्वी ठरत आहे. समाजशील राजकारण आणि सत्ताकेंद्री, सत्ताप्रभावी राजकारण यांची योग्य सांगड आणि मांडणी करण्यात सध्याच्या संविधानाच्या अभ्यासकापासून तर राजकारणाच्या सारीपाटाचे  मोहरे चालविणा-या राजकारण्यांपर्यंत सारेच अनुतीर्ण झाले आहेत.

फक्त सत्तावादी राजकारण या समीकरणातून बाहेर पडून सहभागीत्वाचे राजकारण, समाजशील राजकारणाची संकल्पना तळागाळातल्या समाजापर्यंत, माणसांपर्यंत कशी रुजविता येईल याच विचा अजूनही समाजासमोर मांडला जात नाही. तो मांडला गेला पाहिजे. संविधानाने मतदानाचा हक्क दिला म्हणून तो बजावायचा किंवा सत्तेच्या मोहमालेत कुणाला तरी सारथी करून त्या बळावर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायचे ही राजकीय गलथानपणाची मांडणी दूर सारून निवडणुका व त्याचे राजकारण याकडे बघण्याची दृष्टी जोपर्यंत भारतीय माणसाला लागत नाही तोपर्यंत भारतीय लोकशाहीचे हे विश्वविद्यालय आपल्या अंतिम उद्दिष्ठापर्यंत पोहचू शकणार नाही.  भारतीय नागरिक म्हणून आपले हक्क बजावतांना आम्ही कुठल्या आधारावर आपला प्रतिनिधी निवडतो हे सर्वश्रुत आहे. या सर्वश्रुत प्रक्रियेला जोपर्यंत आम्ही बदलणार नाही तोपर्यंत आमच्या लोकशाही विश्वविद्यालयातील उमेदवार (विद्यार्थी) उत्तीर्ण होण्याच्या सीमारेषेपर्यंत पोहचू शकणार नाही. निवडून येणे म्हणजे उत्तीर्ण होणे. किंवा सत्तेवर येणे म्हणजे सीमारेषा ओलांडणे होत नाही. म्हणून वेळ आपली आहे. वेळ आपल्याच हातात आहे. आणि उद्याचा काळही आपल्याच हातात राहणार आहे. निर्भर आहे की आपण वर्तमानात काय निर्णय घेणार आहोत आणि भविष्याचे मार्ग कसे निश्चित करणार आहोत. लोकशाही विश्वविद्यालयातील उमेदवारांचे (विद्यार्थ्यांचे) भवितव्य त्यावरच निर्भर राहणार आहे.
 
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१